Monday, 18 November 2024

राज्यातील लोकसभेच्या 16 - नांदेड या एका लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

 3. राज्यातील लोकसभेच्या 16 - नांदेड या एका लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकूण

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या

1

16 नांदेड लोकसभा मतदार संघ

9,78,234

9,30,158

154

19,08,546

19

 

 

         I.            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे.

       II.            निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे.  या मनुष्यबळाचे सरमिसळीकरण (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

      III.            मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही        सरमिसळीकरण (Randomization) देखील झाले आहे. तसेच या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची   विधानसभा मतदारसंघनिहाय सिलींग करण्यात आले आहे.  

     IV.            संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

      V.            मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

     VI.            85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरात प्राप्त अर्जांपैकी 86,462 अर्ज मंजूर करण्यात आले. दिनांक 16.11.2024 पर्यंत गृह मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

   VII.            आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाले तर उचित कार्यवाही करण्यात येत आहे.

  VIII.            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता  मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.   

     IX.            मतदान करण्याकरीता सर्वसाधारण वेळ सकाळी 07.00 ते संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत आहे. तसेच संध्याकाळी 06.00 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन क्रमांक देऊन त्यांना मतदान करु देण्यात येईल.

      X.            मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी सर्व 288 विधानसभा मतदार संघामध्ये शांतता काळ आहे. सबब या विधानसभा मतदार संघांमध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच त्या मतदार संघातील रहिवासी नसलेली व राजकीय प्रचारासाठी आलेली राजकीय व्यक्ती त्या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

         राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता सर्व तयारी झालेली आहे. या निवडणूकीमध्ये  मोठया प्रमाणात          मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज

 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज

- मुख्य निवडणूक अधिकारी एसचोक्कलिंगम

मुंबईदि. 17 : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहेएकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहेराज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहेमतदानाची वेळ ही सकाळी 7:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत राहीलसंवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेतप्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एसचोक्कलिंगम यांनी केले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2024 बाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे :-

 

अ.क्र.

मतदार संघांची संख्या

मतदान केंद्रे

सहाय्यक मतदान केंद्र

 

क्रिटीकल मतदान केंद्रे

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या

बॅलेट युनिट (बीयु)

कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट

1

288

100186

241

990

4,136

1,64,996

1,19,430

1,28,531

 

 

राज्यातील एकूण 1,00,427 इतक्या मतदान केंद्रांपैकी, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान 67,557 इतक्या मतदान केंद्रांवर वेबकास्टींग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

2. मतदारांची संख्या

अ.क्र.

मतदारांचा तपशील. (दिनांक 30.10.2024 रोजी)

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकूण

1

मतदारांची संख्या

5,00,22,739

4,69,96,279

6,101

9,70,25,119

2

दिव्यांग (PwD) मतदार

3,84,069

2,57,317

39

6,41,425

3

सेना दलातील मतदार (Service Voters)

1,12,318

3,852

-

1,16,170

 

Sunday, 17 November 2024

8,85,56,75,90,000.00/- ची संपत्ती असलेल्या रतन टाटा यांच्या निधनापूर्वीचे शेवटचे शब्द.....*

 * *8,85,56,75,90,000.00/- ची संपत्ती असलेल्या रतन टाटा यांच्या निधनापूर्वीचे शेवटचे शब्द.....* 


मी उद्योग जगतातील यशाच्या शिखरावर पोहोचलो आहे. माझे जीवन हे इतरांच्या दृष्टीने एक यश आहे. मात्र, कामाशिवाय मला इतर कोणताही आनंद मिळाला नाही. पैसा हा एकमेव सत्य आहे जो मी वापरतो.  


या वेळी रुग्णालयाच्या बेडवर पडून आणि माझे संपूर्ण आयुष्य लक्षात ठेवून मला कळते की मला अभिमान होता ती ओळख आणि पैसा मृत्यूपूर्वी खोटा आणि निरुपयोगी झाला आहे.  


आपण आपली कार चालविण्यासाठी किंवा पैसे कमविण्यासाठी एखाद्याला भाड्याने घेऊ शकता. पण, तुम्ही एखाद्याला दुखावण्यासाठी आणि मरण्यासाठी भाड्याने घेऊ शकत नाही.  


गमावलेल्या भौतिक वस्तू परत मिळू शकतात. पण एक गोष्ट आहे जी हरवल्यावर कधीच सापडत नाही आणि ती म्हणजे "जीवन".  


आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपण असू, कालांतराने आपल्याला त्या दिवसाचा सामना करावा लागेल जेव्हा एक दिवशी आपले हृदय थांबेल.  


आपल्या कुटुंबावर, जोडीदारावर आणि मित्रांवर प्रेम करा...


त्यांच्याशी चांगले वागा, त्यांच्याशी फसवणूक करू नका, कधीही बेईमानी किंवा विश्वासघात करू नका.  


जसजसे आपण मोठे होत जातो आणि शहाणे होत जातो तसतसे आपल्याला हळूहळू लक्षात येते की 300 किंवा 3000 किंवा 2-4 लाख रुपयांची घड्याळ घालून सर्व घड्यालात एकच वेळ प्रतिबिंबित होते.  


आपल्याकडे 100 किंवा 500 ची पर्स असली तरी -आत सर्वकाही समान आहे.  


आपण 5 लाखाची कार चालवतो किंवा 50 लाखाची कार चालवतो. मार्ग आणि अंतर एकच आहे आणि आपण आपल्या ठरवलेल्या ठिकाणीच पोहोचतो.  


आपण ज्या घरात राहतो, ते 300 चौरस फूट असो किंवा 3000 चौरस फूट - एकटेपणा सर्वत्र सारखाच असतो.  


तुम्हाला कळेल की तुमचा खरा आंतरिक आनंद या जगाच्या भौतिक वस्तूंपासून येत नाही.  


तुम्ही फर्स्ट क्लास किंवा इकॉनॉमी क्लासमध्ये उड्डाण करता, जर विमान खाली पडले तर तुम्ही देखील त्याच्याबरोबर खाली जाल.  


तर.. मला आशा आहे की तुम्हाला कळेल, तुमचे मित्र, भाऊ आणि बहिणी आहेत, ज्यांच्याशी तुम्ही बोलता, हसता, गाता, आनंद आणि दुःख शेअर करता,... हेच खरे सुख !!  


आयुष्यातील एक अविस्मरणीय सत्य:  


फक्त श्रीमंत होण्यासाठी मुलांना शिकवू नका. त्यांना आनंदी राहायला शिकवा. जेव्हा ते मोठे होतील तेव्हा त्यांना गोष्टींची किंमत कळेल, मूल्य नाही.  


जीवन म्हणजे काय


जीवनाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तीन ठिकाणे आहेत:  

- रुग्णालय  

- तुरुंग  

- स्मशानभूमी 


हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेवर, आपल्या आरोग्य पेक्षा चांगले काहीही नाही हे लक्षात येईल.  

तुरुंगात तुम्हाला दिसेल की स्वातंत्र्य किती अमूल्य आहे.  

आणि श्मशानभूमीत तुम्हाला कळेल की जीवन काहीच नाही.  


आज आपण ज्या भूमीवर चालत आहोत ती उद्या आपली नाही.  


* आतापासून नम्र व्हा आणि आम्हाला जे मिळाले त्याबद्दल आमच्या पालकांचे आभार मानूया.*  


* हा संदेश इतर कोणाशीही शेअर करता येईल का? आणि मी माझे आई-वडील, भाऊ, बहिणी, सर्व नातेवाईक, शेजारी मित्र, कुटुंब, माझा समाज, माझा देश या सर्वांवर प्रेम करतो.

*सर्वांचे कल्याण,मंगल होवो. प्रत्येकाच्या भल्यासाठी.🙏*

आपला हक्क अपली जबाबदारी


 

Saturday, 16 November 2024

पहिल्या विधानसभेत आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला आमदार

 पहिल्या विधानसभेत आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला आमदार

आतापर्यंत स्थापन झालेल्या विधानसभेच्या कार्यकाळात पहिल्या विधानसभेत तीस इतक्या भरघोस संख्यने महिला आमदार सभागृहात होत्या. त्यानंतरच्या कुठल्याच विधानसभेत इतक्या मोठ्या संख्येने महिला आमदार राहीलेल्या नाहीत. त्याच्या खालोखाल १९७२ -७८ या कार्यकाळातील चौथ्या विधानसभेत २८ तर आणि सन २०१९- २०२४ मध्ये चौदाव्या विधानसभेत २७ इतक्या महिला आमदारांची संख्या बघायला मिळाली. आतापर्यंतच्या चौदा विधानसभांच्या कार्यकाळात सर्वात कमी महिला आमदार या सन १९९०-९५ मध्ये कार्यरत आठव्या विधानसभेत ६ तर १९७८-८० या कालावधीत कार्यरत पाचव्या विधानसभेत केवळ

८ महिला आमदार होत्या. म्हणजेच पहिल्या विधानसभेच्या १९५७ ते १९६२ या साली महिला आमदारांची संख्या ही सर्वात जास्त राहिलेली आहे. महिला आमदारांचे प्रमाण वाढत असल्याचे आश्वासक चित्र पुढच्या विधानसभेच्या कार्यकाळात बघायला मिळत नाहीये तर सातत्याने हे प्रमाण तीसच्या आत राहिलेले असून त्यात चढउतार झालेले दिसते.

महिला मतदारांची संख्या

 महिला मतदारांची संख्या

सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन २०१९ साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे ९२५ इतकेहोते. हे प्रमाण वाढवण्याकरिता महिला मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व त्यामुळे २०२४ मध्ये या प्रमाणात ९३६ अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतकी झाली आहे. म्हणजे एकूण मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात महिला मतदारांचा टक्का हा जवळपास पन्नास टक्के इतका आहे. राज्यात विविध जिल्हयात महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारां इतकी काही ठिकाणी त्या पेक्षा जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….

 विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत

आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….

 

विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर काही उमेदवारांची ही दुसरी तिसरीचौथीवेळ असणार आहे. सन १९५७ ते १९६२ या कालावधीत पहिली विधानसभा स्थापन झाल्यापासून ते आताच्या चौदाव्या विधानसभे पर्यंत म्हणजे गेल्या ६७ वर्षांत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहात सहभाग घेण्याची संधी आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदारांना मिळालेली आहे. भारतात सर्व नागरिकांसोबतच मतदार म्हणून महिला मतदारांना ही मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मात्र आपल्याला विनासायस मिळालेल्या मतदानाच्या या अधिकारासाठी जगातील किती तरी देशांतील महिलांना प्रदिर्घ लढा द्यावा लागलेला आहे. ब्रिटनअमेरीकाव इतर अनेक देशांत महिला मतदारांना आपल्या मतदानाच्या अधिकारासाठी शंभर ,दिडेश वर्ष लढा देऊन मग तो अधिकार प्राप्त झालेला आहे.

Featured post

Lakshvedhi