Thursday, 14 November 2024

देहविक्री व्यवसायातील महिलांचा शंभर टक्के मतदानाचा संकल्प

 देहविक्री व्यवसायातील महिलांचा शंभर टक्के मतदानाचा संकल्प

 

मुंबईदि. १३ : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. या महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमात स्वीप’ समन्वय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशीमुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी पल्लवी तभानेसहायक निवडणूक अधिकारी स्मिता सावंतअपने आप स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालक अभिलाषा रावतनागपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बारवकर आणि प्रसिध्दीमाध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात उपस्थित होते.

विजयकुमार सूर्यवंशी यांनी महिलांना संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचे महत्त्व समजावून सांगितले. "मतदान हा आपला अधिकार आहे. आपण सर्वांनी एकजूट होऊन मतदान करून लोकशाहीला सुदृढ बनवण्यास हातभार लावावा," असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी प्रत्येक मतदाराने मतदारयादीत आपले नाव तपासून शंभर टक्के मतदान साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले.

सहायक निवडणूक अधिकारी पल्लवी तभाने यांनी मतदानाचे महत्त्व पटवून देत, "मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे," असे सांगितले. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ दरम्यान मतदान होणार असूनत्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना वोटर स्लिपचे वितरण करण्यात आले. उपस्थित महिलांसोबत प्रश्नावली आणि बक्षीसांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक निवडणूक अधिकारी स्मिता सावंत यांनी केले  सूत्रसंचालन वसीम शेख यांनी केले आणि आभार अपने आप संस्थेच्या पूनम अवस्थी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0000

आचारसंहिता काळात नव्याने स्थानिक विकास निधीचे वितरण नाही -

 आचारसंहिता काळात नव्याने स्थानिक विकास निधीचे वितरण नाही

- मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

 

मुंबईदि. १३ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या काळात विधानसभा अथवा विधानपरिषदेच्या सदस्यांना स्थानिक विकास निधी नव्याने दिला जाणार नाहीअशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली आहे.

 

राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक तसेच लोकसभेसाठी पोटनिवडणुका होत आहेत. या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून स्थानिक विकास निधीबाबत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नव्याने विकास निधी दिला जाऊ नयेनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले नसेल अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरू करण्यात यावेतथापि निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झाले असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईलअसे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 

या सूचनांनुसार काम समाधानकारकरित्या पूर्ण झाले असेल अशा प्रकरणी देयके अदा करण्यास बंधन असणार नाहीअसेही आयोगामार्फत कळविण्यात आल्याचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

Wednesday, 13 November 2024

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण मुंबई,

 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत

दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण

मुंबईदि. १३ : विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोरपणे तयारी करण्यात आली असून जिल्हास्तरावर यंत्रणा सज्ज झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणेच्या तयारीच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे. दिलखुलास’ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून आणि न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारण होणार आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची मुलाखत गुरूवार दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी घेतली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी संजय शिंदे यांची मुलाखत शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक समरजीत ठाकूर यांनी घेतली आहे.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची भेट

 मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील

माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची भेट

 

मुंबईदि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या तयारीच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षक समीर वर्मासत्यप्रकाश टी. एल.तसेच केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी भेट देऊन माहिती घेतली.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

केंद्रीय निरीक्षकांनी माध्यम कक्षाच्या नियोजनबद्ध कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. कक्षात दररोज येणाऱ्या विविध वृत्तपत्रे व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांची नोंद घेण्याचीजाहिरातींचे अवलोकन करण्याची पद्धत याविषयीही त्यांनी जाणून घेतले. सोशल मीडियावर मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या फेसबुकएक्सइन्स्टाग्रामव इतर सोशल मीडियावरील जाहिराती व पोस्ट्सवर लक्ष ठेवण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

प्रसार माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात यांनी कक्षाच्या कामकाजाची माहिती दिली.

0000

 

मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी दिव्यांग ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सुविधा

 मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी दिव्यांग

ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सुविधा

- जिल्हाधिकारी संजय यादव

 

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी आवश्यक मागणी सक्षम ॲपवर नोंदवावी

मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन व्यवस्था

 

मुंबईदि. १२ : आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मुंबई जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुविधा मिळविण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांनी सक्षम ॲपद्वारे आवश्यक मागणी नोंदवावीअसे आवाहन जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी व्हीलचेअरव्हॅनईको व्हॅनदिव्यांग सुलभ बसेसटॅक्सीतसेच मतदान केंद्रांवर जिन्यांवर चढण्यासाठी सरकत्या व्हीलचेअर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मतदानाच्या दिवशीपर्यंत सक्षम ॲपवर दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानासाठी सुविधा मागणी नोंदविता येणार आहे. सक्षम मोबाईल ॲपवर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची सुविधेसाठी मागणी नोंदविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले.

भौतिक सुविधारॅम्पआणि व्हिलचेअर

दिव्यांग मतदारांकरिता मतदान केंद्रावर सुव्यवस्थित पोहचण्याकरिताइमारतीत अधिक सहजपणे प्रवेश करण्यास किंवा भिन्न उंचीच्या भागात सुलभतेने पोहचण्यासाठी प्रत्येक मतदार केंद्राच्या दर्शनी भागामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी प्रवेशसुविधा रॅम्पच्या माध्यमातून सुलभ केली जाणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेत मदतीशिवाय सहभाग घेता यावा यासाठी ब्रेल चिन्हे असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) देखील उपलब्ध असतील. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिका, मतदार स्लिप ब्रेल लिपीमध्ये वाटण्यात आलेली आहे. अंध मतदारांकरिता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ब्रेल डमी, डमी मतपत्राला प्रत्येक मतदार केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दिव्यांग मित्र आणि मोफत वाहतूक व्यवस्था

दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी दिव्यांग मित्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या ६७१ स्वंयसेवकांची नेमणूक मतदारांना मदत करण्यासाठी केली आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी १० विधानसभा मतदारसंघात मोफत बस सुविधा असेल. दिवसभर १० रिंगरूटवरील २४३ मार्गांवर दिव्यांग मतदारांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.

मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी नियुक्त समन्वयक दिलीप यादव (मो. क्र. ९५९४१४४९९९) यांच्याशी संपर्क साधल्यास वाहन सुविधा उपलब्ध केली जाईल. दिव्यांग मतदारांनी रांगेत उभे न राहता मतदानाचा हक्क बजावावायासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.  मुंबई शहर प्रशासन आणि दिव्यांग समन्वय अधिकारी यांच्यामार्फत सर्व दिव्यांग मतदारांना या सुविधांचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काळजीपूर्वक वाचा* *कृपया वाचायला चुकवू नका….* आरोग्यं विषयक

 *काळजीपूर्वक वाचा* 

*कृपया वाचायला चुकवू नका….* 

*👏वृद्ध लोक जेव्हा जास्त बोलतात तेव्हा त्यांची थट्टा केली जाते, परंतु डॉक्टर त्यास आशीर्वाद म्हणून पाहतात : डॉक्टर म्हणतात की सेवानिवृत्तांनी (ज्येष्ठ नागरिकांनी) अधिक बोलले पाहिजे कारण सध्या स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. अधिक बोलणे हा एकमेव मार्ग आहे. ज्येष्ठ नागरिक अधिक बोलण्याचे किमान तीन फायदे आहेत.*


*👏प्रथम:- बोलण्याने मेंदू सक्रिय होतो, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात, विशेषत: पटकन बोलत असताना, यामुळे स्वाभाविकपणे विचारांना गती मिळते आणि स्मरणशक्ती सुधारते. गैर-मौखिक ज्येष्ठ नागरिकांना स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.*


*👏दोनः - जास्त बोलल्याने तणाव कमी होतो, मानसिक आजार टाळता येतो आणि तणाव कमी होतो. अनेकदा काहीही न बोलता सर्वकाही हृदयात ठेवणे, गुदमरल्यासारखे आणि अस्वस्थ वाटणे, म्हणूनच, प्रौढांना अधिक बोलण्याची संधी देणे चांगले आहे.*

*👏तीनः - भाषणामुळे चेहऱ्याच्या सक्रिय स्नायूंचा व्यायाम होतो, घशाचा व्यायाम होतो, फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि डोळा आणि कानांना इजा पोहोचवणारे चक्कर आणि बहिरेपणाचे छुपे धोके कमी होतात.*


*थोडक्यात एक सेवानिवृत्त, म्हणजेच ज्येष्ठ नागरिक म्हणून, अल्झायमरपासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जास्तीत जास्त लोकांशी बोलणे आणि सक्रियपणे संवाद साधणे. यावर दुसरा उपाय नाही.*


 *(10 ज्येष्ठ नागरिकांना पाठवणे )*🙏🙏🙏

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४१३६ उमेदवार

 राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४१३६ उमेदवार

 

मुंबईदि. १२ : राज्यातील विधानसभा निवडणुका २८८ मतदारसंघांमध्ये होणार आहेत या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल. राज्यात एकूण ४१३६ उमेदवार आहेत ज्यामध्ये ३७७१  पुरूष३६३  महिला आणि अन्य २ उमेदवार आहेत.

राज्यातील एकूण उमेदवाराचे नाव, पत्ता, राजकीय पक्ष, मतदारसंघ आदी संपूर्ण यादीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

Featured post

Lakshvedhi