Wednesday, 13 November 2024

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची भेट

 मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील

माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची भेट

 

मुंबईदि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या तयारीच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षक समीर वर्मासत्यप्रकाश टी. एल.तसेच केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी भेट देऊन माहिती घेतली.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

केंद्रीय निरीक्षकांनी माध्यम कक्षाच्या नियोजनबद्ध कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. कक्षात दररोज येणाऱ्या विविध वृत्तपत्रे व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांची नोंद घेण्याचीजाहिरातींचे अवलोकन करण्याची पद्धत याविषयीही त्यांनी जाणून घेतले. सोशल मीडियावर मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या फेसबुकएक्सइन्स्टाग्रामव इतर सोशल मीडियावरील जाहिराती व पोस्ट्सवर लक्ष ठेवण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

प्रसार माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात यांनी कक्षाच्या कामकाजाची माहिती दिली.

0000

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi