राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत
‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण
मुंबई, दि. १३ : विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोरपणे तयारी करण्यात आली असून जिल्हास्तरावर यंत्रणा सज्ज झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणेच्या तयारीच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे. ‘दिलखुलास’ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून आणि न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारण होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची मुलाखत गुरूवार दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी घेतली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी संजय शिंदे यांची मुलाखत शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक समरजीत ठाकूर यांनी घेतली आहे.
No comments:
Post a Comment