Thursday, 9 May 2019

वय वर्ष ६५ पुर्ण असणाऱ्या नागरिकांना दिली जाणार स्मार्ट कार्ड

  • एस टी महामंडळाचा नविन उपक्रम
  •  वय वर्ष ६५ पुर्ण असणाऱ्या नागरिकांना दिली जाणार स्मार्ट कार्ड.....
  •  यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चार हजार किलोमीटरचा प्रवास फ्री .....
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्तुत्य उपक्रम....

     
    
   यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
    १.आधार कार्ड
    २. मतदान ओळखपत्र
    ३. सोबत स्वतः ती व्यक्ती.
    ४. नाममात्र ५५ रू फी
कृपया सर्व जेष्ठ व्यक्तींनी सदर कागदपत्रे घेऊन नजीकच्या बस स्थानकात  स्वतः जावे.

माझी कन्या भाग्यश्री

















Wednesday, 8 May 2019

गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती













विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग च्या युवक व युवतींकरीता मोटार वाहन चालक व वाहन प्रशिक्षण योजना


विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग च्या युवक व युवतींकरीता मोटार वाहन चालक व वाहन प्रशिक्षण योजना राबविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग
शासन निर्णय क्रमांक : मोवाप्र-२०१८/प्र.क्र.९३/विजाभज-१
विस्तार भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ३२
दिनांक : ११ ऑक्टोबर, २०१८

प्रस्तावना :-
राज्यातील वाहनांची वाढणारी संख्या, वाहतूक व्यवस्था, रस्ते व दिवसेंदिवस लोकांचा पर्यटनाकडे वाढणारा कल लक्षात घेता, वाहन व्यवसायामध्ये रोजगाराची मोठया प्रमाणात संधी निर्माण होत आहे. तथापि, विजाभज, इमाव व विमाप्र समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असून त्याबरोबरच बेरोजगारीचे प्रमाणसुध्दा जास्त आहे. हे पाहता या बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळावे, जेणेकरून त्यांना शाश्वत रोजगाराचे साधन उपलब्ध होऊन त्यांना स्थिर जीवन जगता यावे यासाठी विजाभज, इमाव व विमाप्र मधील युवक युवतींसाठी मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
उपरोक्त बाबी विचारात घेता विजाभज, इमाव व विमाप्र मधील युवक युवतींकरीता विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण या विभागामार्फत मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना राबविण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.
शासन निर्णय :-
१-    विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यातील उमेदवारांना मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना राबविण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
२-    सदरहू योजनेच्या अटी व शर्ती, लाभार्थी निवडीचे निकष, अर्जाचा नमूना, बंधपत्र, करारनामा व इतर कागदपत्र इ. बाबी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ, “ब, “क, “ड आणि “इ प्रमाणे राहतील.
३-    सदरहू योजना राबविण्यासाठी राज्यस्तरावर ई-निविदा प्रसिध्द करणे व तद्‌नुषंगिक पुढील सर्व कार्यवाही संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे यांचे स्तरावरून करण्यात यावी.
४-    सदर योजना राबवितांना ई-निविदेद्वारे प्रत्येक प्रादेशिक विभाग स्तरावर एका संस्थेची निवड करून त्या संस्थेमार्फत सदरहू योजना राबविण्याची कार्यवाही करावी.
५-    संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे यांचे स्तरावरून ई-निविदा प्रसिध्द करण्यासाठीचे विहित नमुन्याचे प्रपत्र “अ, “ब, “क, “ड, “इ व “ई सोबत जोडले आहेत.
६-    या योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांची निवड ई-निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. ई-निविदा प्रसिध्द करणे, ई-निविदा उघडणे, तांत्रिक बाबींची शहानिशा करणे व पात्र निविदा धारकांची माहिती संकलित करून व तुलनात्मक तक्ता तयार करून शासनास सादर करण्यासाठी संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
७-    प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण संस्थांची अंतीम निवड करण्याचे अधिकार शासनाचे राहतील.
८-    यासठी सर्व सहायक आयुक्त, समाज कल्याण यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
९-    या योजनेवर होणारा खर्च लेखाशिर्ष “२२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अपल्पसंख्यांक यांचे कल्याण, १०२-आर्थिक विकास, (०१) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांचे कल्याण, (०१)(०१) संगणक, वाहन चालक, सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण आणि राज्य केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण (२२२५ई८०१)(कार्यक्रम)(दत्तमत)(मागणी क्र. झेडजी-३)” याखाली टाकण्यात येऊन मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा.
१०-   सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८१०१२१७२१४९७९२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(भा. र. गावित)
  सह सचिव, महाराष्ट्र शासन











अजब तुझे सरका र-सब घोडे बारा टक्के


अजब तुझे सरका र-सब घोडे बारा टक्के
                              जागो जनता जागो
      शासन सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ होऊन त्यांचे जीवन सुफल व सफल व्हावे यादृष्टीने शासन निर्णय अंमलात आणली जातात. प्रशासकीय अधिकारी ही आपल्या  अलौकिक बौध्दिक ज्ञानाच्या जोरावर प्रशासनाचा कारभार चालवितात. प्रत्येक खात्याचा प्रशासकीय अधिकारी आपले अलौकिक बौध्दिक ज्ञानसंपदा अगाध आहे याची चूणूकही दाखवितात. आता हेच बघा ना
      विधि व न्याय विभागाची अधिसुचना दि २३/२/२०१८ अन्वये ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न रु ८५०००/-पेक्षा अधिक नसेल अशी व्यक्ती निर्धन व्यक्ती असेल व ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न रु १,६०,०००/- पेक्षा अधिक नसेल अशी व्यक्ती समाजातील दुर्बल घटकातील व्यक्ती असेल .
       आयकर विभागाने निर्देशित केलेली आयकर उत्पन्न मर्यादा रु २,५०,०००/- पर्यंत करमुक्त आहे. तदनंतर कर भरावा लागतो.
      तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय दि ९/१/२०१९ अन्वये आर्थिकदृष्या मागासवर्गीय विदयार्थ्यांना देण्यात येणारी शालांत परिक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरिता पालकांची उत्पन्न मर्यादा रु ८,००,०००/-पर्यंत वाढविली आहे.
      याचाच अर्थ वार्षिक उत्पन मर्यादा रु ८५०००/-निर्धन व्यक्ती, तर समाजातील दुर्बल घटकातील व्यक्ती रु १,६०,०००/- व वार्षिक उत्पन्न रु ८,००,०००/- असलेली व्यक्तीचा पाल्य आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय समजला जातो. याचाच अर्थ महिना रु ६६,६६६/- कमवत असलेली व्यक्ती व महिना रु. ७०८३/- कमवत असलेली निर्धन व्यक्ती, व महिना रु १३,३३३/- कमवत असलेली समाजातील दुर्बल घटकातील व्यक्तीच्या उत्पन्नाचे अवलोकन केले असता लक्षात येईल की, रु ८,००,०००/- आठ लाख उत्पन्न असणारी व्यक्ती ही आयकर विभागाचे निर्णयानुसार उत्पन्न मर्यादा रु २,५०,०००/- पेक्षा अधिक असल्याने करपात्र ठरते. असे असतांना आर्थिकदृष्या मागासवर्गीय कसे ? 
म्हणूनच अजब तुझे सरका र सब घोडे बारा टक्के. जागो जनता जागो.


जग कस अजब आहे


पाठ्यपुस्तक बदलण्याची माहिती


Featured post

Lakshvedhi