Wednesday, 8 May 2019

अजब तुझे सरका र-सब घोडे बारा टक्के


अजब तुझे सरका र-सब घोडे बारा टक्के
                              जागो जनता जागो
      शासन सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ होऊन त्यांचे जीवन सुफल व सफल व्हावे यादृष्टीने शासन निर्णय अंमलात आणली जातात. प्रशासकीय अधिकारी ही आपल्या  अलौकिक बौध्दिक ज्ञानाच्या जोरावर प्रशासनाचा कारभार चालवितात. प्रत्येक खात्याचा प्रशासकीय अधिकारी आपले अलौकिक बौध्दिक ज्ञानसंपदा अगाध आहे याची चूणूकही दाखवितात. आता हेच बघा ना
      विधि व न्याय विभागाची अधिसुचना दि २३/२/२०१८ अन्वये ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न रु ८५०००/-पेक्षा अधिक नसेल अशी व्यक्ती निर्धन व्यक्ती असेल व ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न रु १,६०,०००/- पेक्षा अधिक नसेल अशी व्यक्ती समाजातील दुर्बल घटकातील व्यक्ती असेल .
       आयकर विभागाने निर्देशित केलेली आयकर उत्पन्न मर्यादा रु २,५०,०००/- पर्यंत करमुक्त आहे. तदनंतर कर भरावा लागतो.
      तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय दि ९/१/२०१९ अन्वये आर्थिकदृष्या मागासवर्गीय विदयार्थ्यांना देण्यात येणारी शालांत परिक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरिता पालकांची उत्पन्न मर्यादा रु ८,००,०००/-पर्यंत वाढविली आहे.
      याचाच अर्थ वार्षिक उत्पन मर्यादा रु ८५०००/-निर्धन व्यक्ती, तर समाजातील दुर्बल घटकातील व्यक्ती रु १,६०,०००/- व वार्षिक उत्पन्न रु ८,००,०००/- असलेली व्यक्तीचा पाल्य आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय समजला जातो. याचाच अर्थ महिना रु ६६,६६६/- कमवत असलेली व्यक्ती व महिना रु. ७०८३/- कमवत असलेली निर्धन व्यक्ती, व महिना रु १३,३३३/- कमवत असलेली समाजातील दुर्बल घटकातील व्यक्तीच्या उत्पन्नाचे अवलोकन केले असता लक्षात येईल की, रु ८,००,०००/- आठ लाख उत्पन्न असणारी व्यक्ती ही आयकर विभागाचे निर्णयानुसार उत्पन्न मर्यादा रु २,५०,०००/- पेक्षा अधिक असल्याने करपात्र ठरते. असे असतांना आर्थिकदृष्या मागासवर्गीय कसे ? 
म्हणूनच अजब तुझे सरका र सब घोडे बारा टक्के. जागो जनता जागो.


1 comment:

  1. 🚩🚩🚩🚩🚩🚩
    इतिहासाच्या पानावर , रयतेच्या मनावर , मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज .......⛳
    शिवजयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! 🙏🏽
    ⛳⛳⛳⛳⛳⛳

    ReplyDelete

Featured post

Lakshvedhi