Saturday, 16 November 2024

राज्यस्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रम

 राज्यस्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रम                                 

       मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं भारत निवडणूक आयोगाच्या 'स्वीपकार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय मतदारजागृती उपक्रमांचा प्रारंभही झाला. मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाचं सादरीकरणनिवडणूक गीताचं सादरीकरण - त्यावरचं नृत्यटपाल विभागाकडून विशेष पाकीट - शिक्क्याचं अनावरणमतदारांना प्रतिज्ञाअसे उपक्रम राबवले. महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सदिच्छादूत श्रीगौरी सावंत आणि दिव्यांग मतदार सदिच्छादूत निलेश सिंगीतराज्याच्या निवडणूक गीताचे संगितकार गायक मिलिंद इंगळेगायक राहुल सक्सेनारॅपर सुबोध जाधवक्रिकेटपटू अजिंक्य रहाणेअभिनेत्री वर्षा उसगांवकर,  दिग्दर्शक रोहित शेट्टीअभिनेत्री अनन्या पांडेहास्य कलाकार भारती सिंगहर्ष लिंबाचियाअभिनेते मनोज जोशीअभिनेता बजाज आनंदअभिनेत्री सोनाली खरेअभिनेता अली असगर यांच्यासह सामाजिक आणि कला क्षेत्रातल्या अनेक नामांकित व्यक्तिमत्वांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदारांना आपला मताधिकार बजावण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमातच, केंद्रीय संचार ब्यूरोच्या प्रादेशिक कार्यालयाच्या फिरत्या मतदार जनजागृती वाहनालाही हिरवा झेंडा दाखवला गेला. हे फिरत वाहन राज्यातील मतदानाचं अल्प प्रमाण असलेल्या १५ जिल्हे आणि १३३ मतदारसंघांमध्ये जनजागृती करत आहे. या फिरत्या वाहनाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियामतदान केंद्राचं ठिकाण समजून घेणंआदर्श आचारसंहिताआचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीउमेदवारांविषयी जाणून घेणं याविषयी मतदार जागृती केली जातेय.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi