मल्टिमिडीयाचा वापर
स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांशी विविध माध्यमांतून संवाद साधला जात आहे. यात मल्टिमीडियाचा प्रभावी वापर आणि थेट जनसंपर्क अशा दोन्ही पद्धतींचा समावेश आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी अठरावं वरीस मोक्याचं, इथे सगळी बोटे सारखी आहेत, मधाच्या बोटाला बळी पडू नका, निर्धार महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा, अशा आकर्षक संदेशांचा वापर केला जातोय. हे संदेश शासकीय आणि नागरी सेवांच्या सहकार्यानं राज्यभर पोहोचवले जात आहेत. राज्यातली माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाची ८०० होर्डिंग, वाहतूक कार्यालयाच्या राज्यभरातील शाखांमधील होर्डिंग, राज्यभरातील महानगरपालिकांचे ३ हजारांपेक्षा जास्त डिजीटल डिस्प्ले, सार्वजनिक बस सेवा पुरवणाऱ्या १००० पेक्षा जास्त बस आणि १५०० पेक्षा जास्त इतर वाहने, ११०० पेक्षा जास्त बस स्थानकं, सुमारे ५ हजार स्वच्छता वाहनांवरून होत असलेल्या घोषणा, मध्य आणि पश्चिम रेल्वे तसंच मेट्रो रेल्वे सेवेद्वारा रेल्वेगाड्यांमधल्या घोषणा - फलाटांवरील जाहिरातींचे डिस्प्ले इतकी याची व्याप्ती मोठी आहे. इतकंच नाही तर महानगर - टाटा पॉवर - बेस्ट वीज सेवा यांच्याद्वारे २० लाखांपेक्षा जास्त देयकांवर तसंच राज्य भरातील महानगर पालिकांनी पाठवलेल्या ८ लाख मालमत्ता करांच्या देयकांवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरात स्वरुप संदेशांमधून, राज्यभरातील लाखो कुटुंब म्हणजे कोट्यवधी मतदारांपर्यंत मतदान करण्याचं आवाहन थेट पोहचत आहे.
No comments:
Post a Comment