Saturday, 16 November 2024

मतदार जनजागृतीसाठी मतदारांशी विविध माध्यमातून संवाद निवडणूक यंत्रणामार्फत राज्यभरात जनजागृतीवर भर

 मतदार जनजागृतीसाठी मतदारांशी विविध माध्यमातून संवाद

निवडणूक यंत्रणामार्फत राज्यभरात जनजागृतीवर भर

        राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी प्रशासन सज्ज झाले आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक यंत्रणा सर्वांना आवाहन करत आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याचं मतदानाचं प्रमाण वाढावं असं उद्दिष्ट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समोर ठेवलंय आणि त्यासाठी राज्यभर मतदार जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर

           लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली. या निवडणुकांत राज्याची मतदानाची टक्केवारी ६६.०५ टक्के होती. यावेळी नंदूरबार जिल्ह्यात ७२.९४ टक्केकोल्हापूर मध्ये ७१.७८ टक्के  गडचिरोली मध्ये ७०.५५ टक्के मतदान झाले तर मुंबई शहर राज्यात सर्वात कमी मतदान झालेला जिल्हा असून या जिल्ह्यात ५१ टक्के इतके कमी मतदान झाले होते. राज्यातील मुंबई शहर जिल्ह्यातील कुलाबा मतदारसंघमुंबई उपनगर जिल्ह्यातील कलिना मतदारसंघठाणे जिल्ह्यातील अंबरनाथपुणे येथील पुणे  छावणी (कंटोनमेंट) येथे सर्वात कमी मतदान झाले होते. मतदान कमी असलेल्या जिल्ह्यात मतदान वाढविण्यासाठी प्रशासन विविध जनजागृतीवर भर देत आहे.

स्वीप उपक्रमामुळे मतदानात वाढ

              'स्वीपया उपक्रमामुळे तृतीय पंथीय मतदारांची २०१९ मध्ये २५९३ इतक्या संख्येवरून ते ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत ५९४४ इतकी नोंद झाली आहे. त्याचबरोबर युवा मतदारांची निवडणूक प्रक्रियेत अधिक सक्रिय होण्यासाठी निवडणूक प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहे त्यामुळे युवा मतदारांचीही मोठ्या संख्येतही वाढ होत आहे. अमरावती जिल्ह्यात विविध स्वीपच्या उपक्रमांमुळे  २०१९ च्या विधानसभा निवडणुकात ६०.३६ टक्के, सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत ६३.५८ टक्के इतके मतदान झाले. नाशिक जिल्ह्यात देखील मतदान जनजागृतीमुळे ६१.७४ टक्केवरून गेल्या लोकसभेत ६४.२१ टक्के इतके मतदान झाले आहे.                                                         

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi