*अलिबाग*
रायगडमध्ये समुद्रकिनारी वसलेले एक ऐतिहासिक व निसर्गरम्य शहर म्हणजे *अलिबाग*....जिथला इतिहास व निसर्गरम्यता अनुभवण्यासाठी दर आठवड्याला हजारो पर्यटक भेट देतात.
ज्या शहरात.... *हिरकोट किल्ला* व *कुलाबा किल्ला* आहे.
शिवराज्याभिषेकासाठी महाराजांची हिंदवी स्वराजची राजधानी असलेल्या रायगडची राजधानी *अलिबाग* आहे.
शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख असलेले *कान्होजी आंग्रे*,सुप्रसिद्ध मूर्तिकार *पद्मभूषण विनायक करमरकर*,*महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी*,थोर समाज सुधारक *पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी*, भारताचे माजी *सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य* भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे वडील *रमेश तेंडुलकरांसारखे* दिगज्ज ज्या मातीने दिले ते *अलिबाग*.
*कान्होजी आंग्रे* आमची शान आहेत
*शिवकालीन बालाजी मंदिर* आमचे देवस्थान आहे.
*बैलांची व घोड्यांची शर्यत* आमचा नाद आहे.
*कबड्डी* आमच्या रक्तात आहे
जिल्ह्यात *पहिल्या रिक्षा आल्या* ते शहर *अलिबाग* आहे.
जिल्ह्यातील पहिला *छापखाना* आला ते शहर *अलिबाग* आहे
ब्रिटिशांनी बांधलेले *लाइटहाऊस* ज्या समुद्रात आहे ते शहर *अलिबाग* आहे.
*पापा भाई पठाण* या मुस्लिम बांधवाने *सार्वजनिक गणपतीची* स्थापना करून *हिंदू-मुस्लिम एकतेचा* धडा शिकवला ते शहर *अलिबाग* आहे.
जिथे एकही *दंगलीची* नोंद नाही ते शहर *अलिबाग* आहे.
जगाला इंटरनेटने जोडण्यासाठी जगातील २६ वेधशाळांचा वापर केला गेला त्यातील एक वेधशाळा *अलिबागची भूचुंबकीय वेधशाळा* व मुंबईची कुलाबा वेधशाळा होती. त्यामुळे भारतातील पहिले इंटरनेट आले ते शहर मुंबईसोबतच *अलिबाग* आहे.
*कुलाबा*, *हिरकोट*, *सागरगड*, *खान्देरी*, *उंदेरी* आणि *आगरकोट* असे सहा किल्ले असणारा तालुका *अलिबाग* आहे.
*लोकमान्य टिळक*, *डॉ.बाबासाहेब आंबेडकर*, *साने गुरुजी*, *महात्मा गांधी* यांच्या *पदस्पर्शाने* पावन झालेली भूमी *अलिबाग* आहे.
ज्यावेळी रोहा, उरण, मुरुड आणि कर्जत ला एसटी नव्हत्या त्यावेळी त्यांना एसटी सेवा पुरवणारा डेपो *अलिबाग* आहे.
जिल्ह्यातली सर्वात जुनी *153 वर्षाची* 1864 साली स्थापन झालेली *नगरपालिका अलिबाग* आहे.
ज्या *कनकेश्वर* डोंगरावरून मुंबई दिसते त्या कनकेश्वर डोंगराचा तालुका *अलिबाग* आहे.
तुम्ही तर म्हणाल *अलिबाग* हे फक्त *ऐतिहासीक शहर* आहे पण अस नाही पण *अलिबाग* आजही *इतिहास* रचत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत येणारे व *उद्याची मुंबई* म्हणून ओळखले जाणारे शहर हे *अलिबाग* आहे.
*आदेश बांदेकर*, जय मल्हार मधील खंडोबाची भूमिका साकारणारे *देवदत्त नागे*, सारेगमप लिटील चॅम्पस मधील *मुग्धा वैशंपायन*, इंडियाज बेस्ट ड्रामेबाज मधील *सई कांबळे* अश्या कित्येक कलाकारांचे शहर *अलिबाग* आहे.
*सचिन तेंडुलकर*, *रवी शास्त्री* व बॉलीवूड किंग *शाहरूख खान* अश्या कित्येक दिग्गजांचे बंगले असणारे शहर *अलिबाग* आहे.
जिथून मुंबई ला बोटनी जायला 45:00 मिनिटे लागतात त्या मांडवा जेट्टीचा तालुका *अलिबाग* आहे.
जिथल्या *नारळी-पोफळ्यांची झाडं*, *समुद्रकिनारा* याची भुरळ पर्यटकांना पडते व जिथल्या *ताज्या मच्छिवर* पर्यटक ताव मारतात ते शहर *अलिबाग* आहे.
इथे *सर्व जाती धर्माचे* लोक गुण्या गोविंदाने राहतात.
इथे *हुंडा* घेत नाही व देत नाही.
इथे शेतकरी *आत्महत्या* करत नही.
इथली लोक *परिपूर्ण व समाधानी* आहेत.
म्हणून *आमचा अलिबाग तालुका* खास आहे
आणि *अलिबागकर* असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
ज्याप्रमाणे समुद्रातील शंख किनाऱ्यापासून कितीही लांब नेला तरी त्यात लाटांचा आवाज राहतो।
त्याच प्रमाणे पर्यटक *अलिबाग* पासून कितीही दूर गेले तरी *अलिबागची* निसर्गरम्यता त्यांच्या हृदयात साठून राहते।
वेलकम, क्षणभर विश्रांती, अशा अनेक चित्रपटांची शूटिंग केली गेली व आज हि केली जात आहे ते शहर *अलिबाग* आहे.
इतकं सगळं असूनही जर कोणी *अलिबाग से आया क्या* बोलणार असेल तर मी अभिमानाने सांगतो... *होय मी अलिबागहुन आलो आहे*.
"आम्ही बागेत घरे उभी केली व
शहर वसविले...
इतरांना तर शहरात बाग
लागते. हीच आमची खासियत."
No comments:
Post a Comment