Friday, 11 February 2022

 मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे


प्रलंबित प्रकरणांसाठी १४ ते २८ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीm

             मुंबई, दि. ११: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर समितीमार्फत जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांसाठी दिनांक १४ ते २८ फेब्रुवारी पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

            ज्या अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी शैक्षणिक व सेवा विषयक प्रस्ताव सादर केलेला आहे व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर समितीकडे ज्या अर्जदारांचे जात प्रस्ताव अद्यापही कागदपत्रे, पुराव्या अभावी प्रलंबित आहेत, अशा सर्व अर्जदारांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत समितीकडून कळविण्यात आलेले आहे.ज्या अर्जदारांनी अद्यापही त्रुटींची पूर्तता न केल्याने प्रकरणे प्रलंबित आहेत.अशा प्रलंबित प्रकरणांसाठी दिनांक १४ ते २८ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

            प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत त्रुटीपूर्तता करण्यासाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत त्रुटींची पूर्तता केली जाणार नाही अशी सर्व प्रकरणे फेब्रुवारी २०२२ अखेर बंद करण्यात येतील. तसेच संबंधित अर्जदारांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास नव्याने प्रस्ताव सादर करावा लागेल.तरी विहित कालावधीमध्ये संबंधित अर्जदारांनी त्रुटी पूर्तता करावी, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.        

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi