Monday, 27 May 2019

जनजागर


जनजागर

१.   नैसर्गिक रंगाची उधळण पर्यावरण पुरक सण समारंभ साजरे करा.
      गोविंदा, रंगपंचमी, लग्नसमारंभ वा इतर प्रासंगिक कार्यक्रमात केमिकल्स चे रंग एकमेकांना लावून आनंदोत्सव साजरा करतात. परंतू हेच रंग डोळयांना, शरिराला हानी पोहोचवतात व प्रसंगी विद्रुपतेचा ही सामना करावा लागतो ज्यामध्ये बालक, युवक युवतींचा जास्त समावेश असतो. ह्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करा व ज्यामुळे त्वचेची हानी होणार नाही व त्वचा सतेज सुंदर दिसेल हयाकडे लक्ष देऊन आयूर्वेदीक व पर्यावरणपुरक सणसमारंभ साजरे करा. 
१)   हळद, चंदन- हळदीचे पाणी व पावडर एकत्र करा, आंबेहळद वापरल्यास अतिउत्तम
२)   मेहंदी-कात टाकून पेष्ट बनवा लाल रंग तयार करा तसेच गाजर,बिट, टोमॅटो, पलाश फुलांचाही वापर करु शकता. प्राजक्ताची, जास्वंदाच्या फुलांचाही वापर करता येईल.
     ३)   पालक, कोथींबीर, पुदिनाची पेष्ट बनवून हिरवा रंग तयार करा
     ४)   आवळा पावडर लोखंडी भांडयात टाकून काळा रंग तयार करा.
     ५)   दुध दही चा वापर करावा.
     ६)   चॉकलेट मेल्ट करुन दुधाचा वापर करुन चॉकलेटी रंग तयार करा.

२.   नागरिकांकरिता सिटीझन पोर्टल मोबाईल अॅप्लीकेशन
     महाराष्ट्र पोलीस दलामार्फत सिटीजन पोर्टल अॅप्लीकेशन सुरु करण्यांत आले असून खबर पाहणे, हरविलेल्या व्यक्ती, अटक आरोपी, अनोळखी मृतदेह अशी माहिती उपलब्ध होते. त्याचप्रमाणे तक्रार नोंदवून सदयस्थिती,कार्यक्रम विनंती, निवेदन, संप विनंती, मिरवणूक विनंती, उत्सव परवानगी असे अर्ज ऑनलाईन करु शकता. ह्यासाठी गुगल प्ले स्टोअर सिटीजन पोर्टल सिलेक्ट करुन अॅप डाऊनलोड करुन आपली वैयक्तिक महिती भरुन युजर आयडी तयार करुन सुविधांचा लाभ घेऊ शकता.

३.   सायबर क्राईम जन जागृती
संगणक, स्मार्ट फोन सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरांच्या माध्यमातून सायबर गुन्हे टाळण्यासाठी दक्षता.
      १.   संपूर्ण खात्री पटल्याशिवाय फ्रेड रिक्वेस्ट स्विकारु नका.
      २.   संगणक, लॅपटॉप वरील डेटा सुरक्षित राहण्यासाठी अॅन्टीवायरस वापर  
करा. वेळोवळी पासवर्ड बदला.
     ३.    अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंक्स उघडू नका, त्या डिलीट करा.
     ४.    सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करा. वेळावेळी साईटस अॅप्लीकेशन लॉग
आऊट करा.
५.   बॅेकेचे खाते, एटीएम, डेबिट, क्रेडीट, पॅन कार्ड, आधारकार्डची अनोळखी मोबाईल दुरध्वनी धारकांना माहिती देऊ नका. व्हॉटसअॅप, फेसबुक, टिवटर, इन्टाग्राम इ. माध्यमाव्दारे लोकेशन शेअर करणे टाळा.
६.   लॉटरी, बक्षिस, ईमेल, कॉल, एसएमएस आल्यास भूलथापांना बळी पडू नका. दुर्लक्ष करा.
७.  धार्मिक भावना भडकविणारे संदेश व्हिडीया, छायाचित्रे किंवा अश्लील साहित्य पोष्ट करु नका.
८.   फॉरवर्ड शेअर करणे टाळा. तसेच नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये असे गुन्हे असल्यास संपर्क साधा.



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi