Thursday, 2 May 2019


हरवलेले ते गवसले

     आज प्रत्येक व्यक्तीचे जीवन तणावपूर्ण झालेले आहे. प्रत्येक व्यक्तीने घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपला दिनक्रम आखलेला आहे. पण या तणावपूर्ण जीवनातून थोडे बाहेर म्हणजे आपले हरविलेले क्षण, आपले ते उत्साही बालपण आपण पुन्हा जगलो तर......... काय हरकत आहे असा एक दिवस जगायला???
     असचं हरवलेले बालपण ते शाळेचे दिवस पुन्हा एकत्र अनुभवण्यासाठी आम्ही मित्र मैत्रिणींनी गेट टुगेदर करायच खूप वर्षापासून ठरवल होत. पण योगच येत नव्हता. पण यावर्षी मात्र आमच्या एका मैत्रिणीने आमच गेट टुगेदर करायचे अगदी मनावरच घेतल. काहीही झाल तरी पुन्हा सर्वांना एका दिवसासाठी तरी एकत्र आणायच तिने ठरवल.  त्याप्रमाणे तिने आम्हांला फोन करून तिची ही योजना सांगितली. आम्हां सर्व मित्र मैत्रिणींना तिची ही योजना ऐकून खुप आनंद झाला. तिने सर्व काही तयारी करण्याची जबाबदारी घेतली तिचा हेतु एकच होता की, सर्वानी एकत्र भेटाव. त्याप्रमाणे १ मे हा सुट्टीचा दिवस पाहून सर्वांनी भेटायच ठरवले. आमची जी इयत्ता १० वी ची बॅच होती त्यामधील बहुतेक जणांना आम्ही फोन करून ही योजना सांगितली. परंतु सर्वांनाच येणे शक्य नाही कारण त्यांनी सुट्टीचे आधिच प्रोग्राम ठरविले होते.
     पण आम्ही जेवढे मित्र मैत्रिणी शाळेमध्ये close होतो त्यांनी मात्र आधिच ठरवले होते की जास्त कुणीही नाही आले तरी आपण मात्र नक्कीच भेटायचं. त्याप्रमाणे महिनाभर आधी आमची तयारी सुरु झाली. किती वाजता भेटायच? काय-काय करायचं? जेवणाचा मेनू काय ठरवायचा इत्यादी.
     प्रत्येक जण अतुरतेने १ मे ची वाट पाहू लागला. अखेर १ मे उजाडला. सकाळपासूनच आमचे एकमेंकांना फोन करणे सुरु झाले. आमचे काही मित्र मैत्रिणी पुणे-मुंबई येथे राहत असल्यामुळे त्यांना सारखे फोन करून विचारत होतो कुठ पर्यंत आलात? पण सुट्टीचा दिवस असल्यामुळे ट्रॅफिक पण खुप होते. आम्ही जवळचे मित्र मैत्रिणी मात्र आधिच येवून सर्व तयारी करून बाहेरून येणा-या आमच्या मित्रांची अतुरतेने वाट पाहू लागलो. आमच्या ज्या मैत्रिणीेन हा कार्यक्रम आखला होता ती तर सकाळ पासूनच तयारीला लागली होती. तिने तिच्या निसर्गरम्य वाडीत वनभोजनाची तयारी खुपच छान केली होती. खाडीतील कालवांचे सुक, तांदळाची भाकरी, भात आणि चिकन असा मस्त पैकी चुलीवरच्या जेवणाचा आम्ही स्वाद घेतला.
     शहारातील आमच्या मित्रांना या ग्रामीण जीवनाचा पुनश्च आनंद लुटता आला. आम्ही सर्वजण भेटता क्षणी शाळेतील हरवलेले दिवस आम्हांला आठवले. आमच्या वर्गातील इतर मित्र-मैत्रिणींचे किस्से, बालपणीचे खेळ, आमच्या शिक्षकांचे मार्गदर्शन इ. आठवणीने गप्पा रंगून गेल्या. गप्पा टप्पामध्ये आम्ही इतके दंग झालो की वेळ कसा निघून गेला कळलच नाही. त्या निसर्गरम्य वातावरणात जेवण करताना पण खुप छान वाटले. तो क्षण तिथेच थांबू दे असेच सर्वांना वाटत होते.
     परतीच्या वेळी प्रत्येक जण उत्साही आनंदी मनाने घरी जायला निघाले. परंतु मन मात्र तिथेच रेंगाळले होते. आज २५ वर्षापूर्वी मित्र-मैत्रिणींसोबत घालविलेले क्षण पुन्हा अनुभवायला मिळाले. निघताना सर्वानी एकच ठरविले की, यापुढे दरवर्षी गेट टुगेदर करायचे आणि सर्वांनी पुन्हा पुन्हा भेटायच अगदी जीवनाच्या शेवटपर्यंत आणि हरवलेले क्षण पुन्हा पुन्हा अनुभवायचे एकत्र येवून. - गीता





5 comments:

Featured post

Lakshvedhi