Thursday, 2 May 2019

नागरीक मी भारत देशाचा

Kadak कविता कोणाची माहिती नाही पण विचार पटले म्हणून share करत आहे.
***
नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं आयतं पाहिजे .....!! 

 वीज कधी वाचवणार नाही
 बील मात्र माफ पाहिजे .....!
 झाड एकही लावणार नाही
 पाऊस मात्र चांगला पाहिजे .....!! 

 तक्रार कधी करणार नाही
 कारवाई मात्र लगेच पाहिजे .....!
 लाचेशिवाय काम करणार नाही
 भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे .....!! 

 कचरा खिडकीतून बाहेर टाकीन
शहरात मात्र स्वच्छता पाहिजे .....!
कामात भले टाईमपास करीन
दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे .....!! 

 धर्माच्या नावाने भले काहीही करीन
देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे .....! 
मतदान करताना जात पाहीन
म्हणेल, जातीयता बंद झाली पाहिजे .....!! 

 कर भरताना पळवाटा शोधीन
 विकास मात्र जोरात झाला पाहिजे .....! 
नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं आयतं पाहिजे .....!!

                                                                                           __ कवी अज्ञात

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi