वीज पडून होणारे मृत्यु राज्य
आपत्ती म्हणून घोषित करण्याबाबत.
मृत व्यक्तींच्या वारसदारांना
केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF/NDRF) च्या सुधारीत निकष आणि दरानुसार मदत देणेबाबत...
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
(मदत व पुनर्वसन)
शासन निर्णय क्रमांक :- आव्यप्र-२०१७/प्र.क्र.२१९/आव्यप्र-१
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : ४ ऑक्टोंबर, २०१७
वाचा:- १. गृह
मंत्रालय, भारत सरकार यांचे आदेश क्रमांक No ३३-५/२०१५- NDM-I, दि. ३०/०७/२०१५
२. महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक सीएलएस-२०१५/प्र.क्र.४०/म-३,
दि. १३.०५.२०१५.
प्रस्तावना
:-
गेल्या काही वर्षापासून राज्यामध्ये मान्सून
कालावधीमध्ये मृत्यूमुखी पडणाया लोकांच्या संख्येत वाढ झाली
आहे. बहुतांशी लोक वीज पडून मृत्युमुखी पडलेले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या
मानकानुसार वीज पडून होणाया मृत्युचा समावेश नैसर्गिक
आपत्तींच्या यादीत नसल्याने या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसदारांनी मदत देता
येत नाही.
गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी राज्य आपत्ती
प्रतिसाद निधीबाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनूसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाने निर्गमित केलेल्या आपत्तींच्या यादीत ज्या आपत्तींचा समावेश नाही मात्र,
राज्यांना त्या आपत्तीस वारंवार तोंड द्यावे लागते अशा आपत्ती राज्य कार्यकारी समितीच्या
मान्यतेने राज्यस्तरावर राज्य आपत्ती म्हणून घोषित करावी. राज्याने अशी आपत्ती घोषित
केल्यानंतर एस.डी.आर.एफ. च्या निकषा नुसार देय असलेली मदत आपत्तीग्रस्तांना तसेच मृतांच्या
नातेवाईकांना देय असेल, याबाबत राज्यशासनाने पारदर्शीपणे निर्णय घेणे आवश्यक आहे.’
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिनांक
३१.०५.२०१७ रोजी झालेल्या बैठकीत वीज पडून होणारे मृत्यु ही राज्य आपत्ती म्हणून घोषित
करण्यास मान्यता दिली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेस
अनुसरून वीज पडून होणारे मृत्यु याचा समावेश राज्य आपत्तीच्या यादीत समाविष्ट करण्याची
आणि आपदग्रस्तांना मदत अनुज्ञेय करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या
विचाराधीन होती.
शासन
निर्णय:-
गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक
सूचना विचारात घेवून राज्यात वीज पडून होणारे मृत्यु या आपत्तीचा समावेश राज्य आपत्तीच्या
यादीत करण्यास आणि आपदग्रस्तांना आणि दरानुसार मदत अनुज्ञेय करण्यास शासन मान्यता देण्यात
येत आहे.
वीज पडून मृत झाल्यास योग्य त्या प्राधिकायांने मृत्युचे कारण प्रमाणित करण्याच्या अधिन राहून
मृत व्यक्तींच्या वारसांना रु. ४,००,०००/- (रुपये चार लाख फक्त) इतकी मदत अनुज्ञेय
राहील.
अंपगत्वाचे प्रमाण व त्याच्या कारणाबाबत शासकीय
दवाखाना/इस्पितळातील वैद्यकीय अधिकायाने
प्रमाणित केल्यास ४० ते ६० टक्के अपंगत्व असल्यास रु. ५९,१००/- आणि ६० टक्क्यापेक्षा
अधिक अपंगत्व असल्यास रु. २,००,०००/- इतकी मदत अनुज्ञेय राहील.
एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीकरीता इस्पितळात
दाखल झाल्यास रु. १२,७००/- आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरीता इस्पीतळात दाखल झाला
असल्यास रु. ४,३००/- इतकी मदत अनुज्ञेय राहील.
वीज पडून बाधीत झालेल्या व्यक्तींना २२४५ नैसर्गिक
आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य या मुख्य लेखाशिर्षाखाली केंद्र शासनाच्या नैसर्गिक
आपत्ती (SDRF/NDRF) च्या सुधारीत निकष आणि दरानुसार
निधीचे वितरण राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत व पुनवर्सन विभागामार्फत केले जाईल.
वरील आदेश हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या
दिनांकापासून लागू होतील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर उपलब्ध करण्यात
आला असून त्याचा संकेतांक २०१७१००४१५०५००७३१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व
नावाने.
(श्रीरंग
घोलप)
अवर
सचिव, महाराष्ट्र शासन
No comments:
Post a Comment