राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये
समाविष्ट करून घेतलेल्या लाभार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण १८१८/प्र.क्र.५९/ना.पु. १६-अ
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दि. १९ जाने. २०१९
वाचा :-
१. शासन परिपत्रक क्रमांक : संकिर्ण - २०१६/प्र.क्र.
१६५/१/ना.पु.१६-अ, दि. ३० जुलै २०१६
२. शासन परिपत्रक क्रमांक : संकिर्ण - २०१६/प्र.क्र.
१६५/२/ना.पु.१६-अ, दि. ३० जुलै २०१६
प्रस्तावना
:-
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा
समावेश करण्याकरीता राज्यातील पात्र शिधापत्रिकांचे Digitization करुन घेण्याची कार्यवाही सध्या
राज्यात सुरु आहे. अशाप्रकारे Digitization करण्याकरीता राष्ट्रीय अन्नसुरक्षा
योजनेमध्ये समावेश करयासाठी नागरिकांकडून त्यांना शिधापत्रिका देण्याकरीता जे forms भरून घेण्यात येतात, त्यांची
पात्रतेच्या निकषांवर आधारीत छाननी करण्यात येते. तद्नंतर पात्र शिधापत्रिकांचे Digitization करण्यात येते. forms भरून घेणे हे शिधापत्रिकांचे
Digitization
करणे यांस बराच कालावधी लागत असल्याने ज्या नागरीकाने form भरून दिला आहे, त्या नागरिकास
त्याच्या शिधापत्रिकेचे Digitization झाले असल्याबाबत व तो सवलतीच्या
दराने अन्नधान्य प्राप्त होण्याचा प्रत्यक्ष लाभ घेण्यास पात्र ठरत असल्याबाबत त्या
नागरीकास जाणीव होत नसल्याने तो नागरीक/लाभार्थी धान्य घेण्यास रास्तभाव दुकानापर्यंत
येवू शकत नाही. त्यामुळे अशा नागरिकांमध्ये ते सवलतीच्या दराने अन्नधान्य प्राप्त होण्याचा
प्रत्यक्ष लाभ घेण्यास पात्र झाले असल्याबाबत जागरुकता येण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय
स्तरावर कशाप्रकारे जनजागृती करण्यात यावी याबाबतच्या सूचना देण्याची बाब शासनाच्या
विचाराधीन होती. त्याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-
शासन
परिपत्रक :-
१. राज्यात सर्व जिल्ह्यांत दरमहा नियमितपणे अन्न दिनाचे
व अन्न सप्ताहाचे आयोजन करण्यात यावे.
२. रास्तभाव दुकानाबाहेर Digitization होवून नव्याने अन्नधान्याचा
लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी त्या दुकानास जोडलेल्या
इतर पात्र लाभार्थ्यांच्या नावासह सर्वांना अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यावी.
३. नवीन पात्र लाभार्थ्यांच्या यादीसह सर्व पात्र लाभार्थ्यांची
यादी दुकानाबाहेर अवलोकनार्थ उपलब्ध करून दिली असल्याबाबत संपूर्ण गावात दवंडी देण्यात
यावी.
४. प्रत्येक ग्रामसभेमध्ये विशेषत दि. २६ जानेवारी
२०१९ रोजी त्या गावातील Digitization होवून नव्याने अन्नधान्याचा
लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन करावे.
५. ज्या लाभार्थ्यांनी forms भरून दिले आहेत व त्यांचे
Digitization
पूर्ण झाले आहे, त्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळणार असल्याबाबतची
अशा लाभार्थ्यांची यादी रास्तभाव दुकानाबाहेर उपलब्ध करून देण्यात आल्याबाबत विविध
प्रसारमाधमांद्वारे जनजागृती करावी.
६. ज्या लाभार्थ्यांनी form
भरताना त्यांचे
दूरध्वनी क्रमांक/भ्रमणध्वनी क्रमांक दिले आहेत, त्या लाभार्थ्यांना त्या क्रमांकावर
कळविण्याची जबाबदारी तहसिलदार यांनी संबधित पुरवठा निरीक्षकाकडे सोपवावी.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात
आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१९०११९१७५१०८०८०६ असा आहे. हा आदेश डिजीटल
स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व
नावाने.
(स.श्री.सुपे)
शासनाचे सह सचिव
No comments:
Post a Comment