Wednesday, 14 May 2025

असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार

 असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार

- राज्यमंत्री ॲड.आशिष जवस्वाल

महाराष्ट्र सरकार कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असूनआजवर अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. विशेषतः असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार करण्यात येत आहे. आज राज्यातील १,७२,००० कामगार मंडळात नोंदणीकृत असून६५ लाख रुपयांचा वार्षिक निधी संकलित होतो. या निधीचा उपयोग विविध क्रीडासामाजिक आणि आर्थिक कल्याणकारी योजनांकरिता केला जात असल्याचे कामगार राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले. अधिकाधिक कामगारांना मंडळात सहभागी करून त्यांना आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून कामगारांचे जीवनमान उंचावणे आणि संकटग्रस्त कुटुंबांना आधार देण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बजाज ऑटो लिमिटेड मधील मल्टिस्किल ऑपरेटर श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांना २०२३ चा कामगार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर ५१ कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात आले. कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन यांनी केले. यावेळी श्रमकल्याण युग या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आाले.

कामगारांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास शासन कटिबद्ध

 कामगारांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास शासन कटिबद्ध

 कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवत असूनकामगारांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिकक्रीडा आणि संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेणे व त्यांना प्रोत्साहन देणेहा पुरस्कारमालिकेचा उद्देश असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी यावेळी केले.

कामगार मंत्री फुंडकर म्हणाले कीराज्यभरातून निवडलेल्या ५१ गुणवंत कामगारांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले असून२०२३ चा कामगार भूषण’ पुरस्कार बजाज ऑटो लिमिटेडवाळूज (छत्रपती संभाजीनगर) येथील श्रीनिवास कोंडीबा कळमकर यांना प्रदान करण्यात येत आहे. 

कामगार चळवळीतील योगदानाबाबत मंत्री फुंडकर यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा गौरव केला. भारतातील पहिली संघटित कामगार संघटना स्थापन करून त्यांनी कामगार चळवळीचा पाया घातल्याचे ते म्हणाले.

कामगार कल्याणासाठी राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देताना ते म्हणाले कीकामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीपरदेश शिक्षणासाठी योजनाक्रीडा स्पर्धानाट्य स्पर्धातसेच कौशल्य प्रशिक्षण व उद्योगांसोबत भागीदारीतून रोजगार संधी निर्माण करण्यावर शासन भर देत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून मोठ्या कंपन्यांमध्ये संधी मिळावीयासाठी आयटीआयमधून प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

आज राज्यात केवळ १० टक्के संघटित तर ९० टक्के असंघटित कामगार आहेत. या असंघटित कामगारांच्या हितासाठी स्वतंत्र आयुक्तालय तसेच विविध मंडळे कार्यरत आहेतअसे सांगून त्यांनी कामगारांनी शासनाच्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

कामाबरोबरच स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यावाअसे आवाहन त्यांनी कामगारांना केले.

राज्यपालांच्या हस्ते कामगार भूषण आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण

 राज्यपालांच्या हस्ते कामगार भूषण आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण

----

विकसित महाराष्ट्र 2047 च्या स्वप्नपूर्तीत कामगारांची भूमिका मोलाची ठरेल

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

 

मुंबई, दि. 13 : कामगारांच्या मेहनतीमुळेच महाराष्ट्राचा विकास शक्य झाला आहे. विकसित महाराष्ट्र 2047’ च्या दिशेने वाटचाल करीत असताना आणि एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा ध्यास घेतलेला असताना या स्वप्नपूर्तीत कामगारांचा वाटा केवळ गरजेचा नाही तर अनिवार्य आहेअसे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू स्टेडियमकामगार क्रीडा भवनप्रभादेवी येथे आयोजित कार्यक्रमात 36 व्या कामगार भूषण पुरस्कार व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. 

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकरकामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालआमदार मनिषा कायंदेमनोज जामसुदकरकामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनराज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरेकामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोडसंचालक रोशनी कदमकल्याण आयुक्त रविराज इळवे तसेच कामगार आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

राज्यपालांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध उपक्रमांचे यावेळी कौतुक केले. आरोग्यशिक्षणकौशल्य प्रशिक्षणक्रीडा व मनोरंजनाच्या क्षेत्रात मंडळाने उचललेली पावले उल्लेखनीय आहेत. मुंबईत तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडासुविधा इतर जिल्ह्यांतही उपलब्ध करून दिल्या पाहिजेतअसे ते म्हणाले.

महिलांसाठी चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. शिलाईहस्तकला अशा कौशल्यांद्वारे कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जात आहेअसे सांगत राज्यपालांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाशी भागीदारी करून नव्या प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना करण्याचे आवाहन केले.

राज्यपाल म्हणालेकामगारयुनियन आणि उद्योजक यांच्यात सामंजस्यसंवाद व शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी कामगार विभागाने पुढाकार घेत राहणे आवश्यक आहे. येथील जनतेची एकजूट आणि निर्धार ही महाराष्ट्राची खरी ताकद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

चिंचघाट उपसा सिंचन योजनेतील तांत्रिक बाबी

चिंचघाट उपसा सिंचन योजनेतील तांत्रिक बाबी पूर्ण करून योजनेला गती द्यावी - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. १३ : चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता करून देणे आहे. त्यामुळे या योजनेतील तंत्रिक बाबी पूर्ण करून प्रकल्पाला गती द्यावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मंत्रालय येथे चिंचघाट उपसा सिंचन योजनेसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी महसूलमंत्री श्री बावनकुळे बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉ.संजय बेलसरे, मुख्य अभियंता श्री. पराते व नागपूरचे संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, चिंचघाट उपसा सिंचन प्रकल्पामुळे अवर्षणग्रस्त भागास पाण्याची उपलब्धता होणार आहे. या योजनेतून कुही तालुक्यातील सर्वसाधारण क्षेत्रातील 18 गावातील एकूण 3715 हे. क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. या प्रकल्पास आवश्यक असणाऱ्या मंजुरी, तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, असेही महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले. चिंचघाट उपसा सिंचन प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी जलसंपदा विभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील , असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

महाविद्यालयीन युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी.https://draft.blogger.com/blog/post/edit/1399828905104575368/6713228031554116574

 महाविद्यालयीन युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर

सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

 

मुंबई, दि. 13 : आपत्ती व्यवस्थापनवैद्यकीय सेवापोलीस दलअग्निशमन दल  यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास रक्तदान करूनदेशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी,राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी  'MY भारतपोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी.असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीनेकेंद्रीय मंत्री  डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यातील राष्ट्रीय सेवा योजना NSS पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन  बैठक झाली. यावेळी राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,   https://mybharat.gov.in/pages/civil_registration या लिंकवर नोंदणी सुरू आहे.  नोंदणी करताना विद्यार्थी आठवड्यातून किती दिवस आणि किती तास सेवा देऊ इच्छितात हे देखील नमूद करू शकतात. ही नोंदणी जिल्हा स्तरावर केली जाणार असूनसंबंधित माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही देण्यात येणार आहे. आपत्तीकालीन  किंवा युद्धजन्य परिस्थितीत या सिव्हिल डिफेन्स वॉरिअर्सची मदत घेता येणार आहे. देशासाठी उभे रहा सिव्हिल डिफेन्स वॉरिअर व्हा हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

0000

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा - मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे

 महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा

मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे

प्राप्त निधी शंभर टक्के खर्च करण्याचे निर्देश

मुंबईदि. १३ : महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

    महाराष्ट्र सागरी मंडळ येथे मंडळाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस सागरी मंडळाचे कार्यकारी अधिकारी पी प्रदीपप्रशासकीय अधिकारी प्रदीप बढिये यांच्यासह मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

    बंदर वापरण्याचे थकलेले शुल्क वसुलीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले कीथकबाकीदारांना फक्त नोटीस पाठवून वसुली होत नसेल तर पुढील योग्य ती कार्यवाही करावी. विभागाचा महसूल वाढवण्यासाठी जाहिरात होर्डिंग्ज उभारणीजागांचे भाडे यामध्ये सुधारणा करावी. जास्तीत जास्त निधी खर्च करावा जेणेकरून पुढील वर्षी जास्तीच्या निधीची मागणी करता येईल, असे श्री. राणे यांनी सांगितले.

श्री. राणे म्हणाले कीथकित शुल्क वसुली सोबतच पोर्ट ऑपरेटरना येणाऱ्या अडचणीवरही मंडळाने तोडगा काढावा त्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. यासंदर्भात बैठक आयोजित करावी. दर आकारामध्ये एकसूत्रता ठेवावी.

             यावेळी बंदरांमधील गाळ काढणेबंदराची क्षमता वाढवणेपूर्ण क्षमतेने बंदर चालवणे या विषयही चर्चा करण्यात आली.

खेलो इंडिया युथ गेम्स 2025,रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके

 खेलो इंडिया युथ गेम्स 2025


रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने


जिंकली 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके


· परिनावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्ष


 


नवी दिल्ली, दि. 13 : खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये मुंबईच्या परिना राहुल मदान पोटरा हिने 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके पटकावून आपली क्षमता सिद्ध केली. तिने केलेल्या या कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


खेलो इंडिया युथ गेम्स 2025 अंतर्गत दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम सामन्यांमध्ये देशातील तरुण जिम्नॅस्ट्कांनी कला, संतुलन आणि लयबद्धतेचा अप्रतिम संगम सादर केला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या परिना युवा खेळाडूने तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक पटकावली तर दिल्लीची रेचलदीप हिने सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या.


 रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम सामन्यांमध्ये महाराष्ट्राने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य पदक आपल्या नावावर केले. तर दिल्लीने 1 रौप्य आणि 3 कांस्य पदके या स्पर्धेत मिळवली. हरियाणाने 1 कांस्य पदक मिळवण्यात यश मिळवले.


ऑल अराउंड फायनल: परिनाचे परफेक्शन, महाराष्ट्राची दुहेरी विजय


31 जिम्नॅस्ट्कांमध्ये झालेल्या वैयक्तिक ऑल अराउंड फायनलमध्ये महाराष्ट्राच्या परिना हिने 83.650 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या सहकारी शुभा श्री उदय सिंह मोरे हिने 80.200 गुणांसह रौप्यपदक, तर दिल्लीच्या रेचल दीप हिने 75.850 गुणांसह कांस्यपदक मिळवले.


हूप इव्हेंट: परिनाचे दुसरे सुवर्ण, दिल्लीला रौप्य


हूप इव्हेंटमध्ये परिनाने आपला दबदबा कायम ठेवत दुसरे सुवर्णपदक जिंकले. दिल्लीच्या रेचल दीप ने रौप्यपदक मिळवले, तर महाराष्ट्राच्या देवांगी हर्षल पवार हिला कांस्यपदक मिळाले.


बॉल इव्हेंट: किमायाने चमक दाखवली, परिनाला रौप्य


बॉल इव्हेंटमध्ये महाराष्ट्राच्या किमाया अमलेश कार्ले ने सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या परिना ला रौप्य, तर दिल्लीच्या रेचल ने यावेळी कांस्यपदकांची कमाई केली.


रिबन इव्हेंट: परिनाचे तिसरे सुवर्ण, दिल्ली पुन्हा कांस्यवर


रिबन इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा परिनाने लयबद्ध प्रदर्शन करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. शुभा श्री हिला रौप्य, तर रेचल दीप ने पुन्हा कांस्यपदक जिंकून दिल्लीसाठी गौरव मिळवला.


क्लब्स इव्हेंट: शुभा श्रीने दाखवली ताकद, हरियाणाच्या मिष्काने मिळवले स्थान


क्लब्स इव्हेंटच्या अंतिम सामन्यात शुभा श्री ने सुवर्णपदक, परिना ने रौप्य आणि हरियाणाच्या मिष्का ने दिल्लीच्या रेचल दीप ला मागे टाकत कांस्यपदक जिंकून आपली उपस्थिती नोंदवली.


000000000

Featured post

Lakshvedhi