सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 14 May 2025
चिंचघाट उपसा सिंचन योजनेतील तांत्रिक बाबी
चिंचघाट उपसा सिंचन योजनेतील
तांत्रिक बाबी पूर्ण करून योजनेला गती द्यावी
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. १३ : चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता करून देणे आहे. त्यामुळे या योजनेतील तंत्रिक बाबी पूर्ण करून प्रकल्पाला गती द्यावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मंत्रालय येथे चिंचघाट उपसा सिंचन योजनेसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी महसूलमंत्री श्री बावनकुळे बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉ.संजय बेलसरे, मुख्य अभियंता श्री. पराते व नागपूरचे संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, चिंचघाट उपसा सिंचन प्रकल्पामुळे अवर्षणग्रस्त भागास पाण्याची उपलब्धता होणार आहे. या योजनेतून कुही तालुक्यातील सर्वसाधारण क्षेत्रातील 18 गावातील एकूण 3715 हे. क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे.
या प्रकल्पास आवश्यक असणाऱ्या मंजुरी, तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, असेही महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
चिंचघाट उपसा सिंचन प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी जलसंपदा विभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील , असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...
No comments:
Post a Comment