Wednesday, 14 May 2025

खेलो इंडिया युथ गेम्स 2025,रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके

 खेलो इंडिया युथ गेम्स 2025


रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने


जिंकली 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके


· परिनावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्ष


 


नवी दिल्ली, दि. 13 : खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये मुंबईच्या परिना राहुल मदान पोटरा हिने 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके पटकावून आपली क्षमता सिद्ध केली. तिने केलेल्या या कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


खेलो इंडिया युथ गेम्स 2025 अंतर्गत दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम सामन्यांमध्ये देशातील तरुण जिम्नॅस्ट्कांनी कला, संतुलन आणि लयबद्धतेचा अप्रतिम संगम सादर केला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या परिना युवा खेळाडूने तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक पटकावली तर दिल्लीची रेचलदीप हिने सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या.


 रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम सामन्यांमध्ये महाराष्ट्राने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य पदक आपल्या नावावर केले. तर दिल्लीने 1 रौप्य आणि 3 कांस्य पदके या स्पर्धेत मिळवली. हरियाणाने 1 कांस्य पदक मिळवण्यात यश मिळवले.


ऑल अराउंड फायनल: परिनाचे परफेक्शन, महाराष्ट्राची दुहेरी विजय


31 जिम्नॅस्ट्कांमध्ये झालेल्या वैयक्तिक ऑल अराउंड फायनलमध्ये महाराष्ट्राच्या परिना हिने 83.650 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या सहकारी शुभा श्री उदय सिंह मोरे हिने 80.200 गुणांसह रौप्यपदक, तर दिल्लीच्या रेचल दीप हिने 75.850 गुणांसह कांस्यपदक मिळवले.


हूप इव्हेंट: परिनाचे दुसरे सुवर्ण, दिल्लीला रौप्य


हूप इव्हेंटमध्ये परिनाने आपला दबदबा कायम ठेवत दुसरे सुवर्णपदक जिंकले. दिल्लीच्या रेचल दीप ने रौप्यपदक मिळवले, तर महाराष्ट्राच्या देवांगी हर्षल पवार हिला कांस्यपदक मिळाले.


बॉल इव्हेंट: किमायाने चमक दाखवली, परिनाला रौप्य


बॉल इव्हेंटमध्ये महाराष्ट्राच्या किमाया अमलेश कार्ले ने सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या परिना ला रौप्य, तर दिल्लीच्या रेचल ने यावेळी कांस्यपदकांची कमाई केली.


रिबन इव्हेंट: परिनाचे तिसरे सुवर्ण, दिल्ली पुन्हा कांस्यवर


रिबन इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा परिनाने लयबद्ध प्रदर्शन करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. शुभा श्री हिला रौप्य, तर रेचल दीप ने पुन्हा कांस्यपदक जिंकून दिल्लीसाठी गौरव मिळवला.


क्लब्स इव्हेंट: शुभा श्रीने दाखवली ताकद, हरियाणाच्या मिष्काने मिळवले स्थान


क्लब्स इव्हेंटच्या अंतिम सामन्यात शुभा श्री ने सुवर्णपदक, परिना ने रौप्य आणि हरियाणाच्या मिष्का ने दिल्लीच्या रेचल दीप ला मागे टाकत कांस्यपदक जिंकून आपली उपस्थिती नोंदवली.


000000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi