Saturday, 16 November 2024

आचारसंहिता भंगाच्या ७,७८४ तक्रारी निकाली ५५७ कोटी ७६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 आचारसंहिता भंगाच्या ७,७८४ तक्रारी निकाली

५५७ कोटी ७६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबईदि. १६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ७ हजार ८२० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ७ हजार ७८४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

 

५५७ कोटी ७६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसेदारूअमली पदार्थमौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५५७ कोटी ७६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे

Friday, 15 November 2024

बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई"

 #"बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई" 


  डाव्या बाजूला वळून विठूमाऊलीने बघितले रखुमाईची जरा वेगळीच गडबड दिसली. मग विठूमाऊलीने विचारले. "काय माई गडबड कसली भक्तजणाच्या स्वागतासाठी काही वेगळी नवीन का तयारी?" 


    रखुमाई मग हळूच म्हणाली, "माऊली जाऊन येते मी चार दिवस माहेरी.आईची सय येते भारी."


 "अग हे ग काय? कार्तिकी एकादशी चार दिवसावर आली. भक्तजणाची वारी उभी आता वेशीवरी. तु जवळ नसल्यावर भक्तजण होईल ग बावरे."


   तुमचे आपले काहितरीच भक्तजणाचे प्रेम फक्त माऊलीवरी. टाळ मृदंगाच्या गजरात फक्त माऊली दुमदुमते. मी या स्वरात कुठेच नसते.


   अग वेडाबाई हे कोणी तुझ्या मनात भरवले.नवीन पिढीचे वारे का तुझ्या डोक्यात शिरले?नाही हो नाथा नाही, कोणी कशाला सांगायला हावे, मीच अनुभवते.


   आषाढी कार्तिकीला मला पंढरपुरात सगळा भार उचलावा लागतो. जो तो येतो मलाच विचारतो. माई बरोबर झाली ना तयारी? कोठे उणीव नाही ना, माऊली नाराज नको व्हायला!


     इथे पण सगळ्यांना तुमच्या नाराजीची काळजी.तरीही सोडून देते. मी पण हातातलं काम सोडते सगळे व्यवस्थित होते आहे ना पडताळून येते. अहोरात्र कामात व्यस्त असते.


   तुम्ही आपले कंबरेवर हात ठेवून फक्त सुचना देतात.सगळ्या कामाचे श्रेय घेऊन बसतात. मन कोठे तरी दुखावत.परत वारकरी येतात, तुमच्या पायावर डोके ठेवतात, "धन्य झालो माऊली" म्हणून समाधान मानतात.


  अलोट गर्दी मंदिरी मिळाला वेळ तर माझ्या पायी त्यांचा माथा विसावतो. भक्तजण कायम तुमच्याबरोबर मला गृहीत का धरतो?


  माऊली खरे सांगु सगळे बदलय आता!आताची माई, माऊली पेक्षा चार काकण जास्त आहे. ती ते सिध्द करते. मुख्य म्हणजे बोलून दाखवते.


  खर सांगू माऊली मला पण हेच दु:ख आहे. मी सगळे व्यवहार सांभाळते.कोठे काय, कधी, याची मी तुम्हांला जाणिव करून देते. भक्तांचे गार्‍हाणं ध्यानात ठेवते. पण माऊली मी कुठेच का नसते?


   आता माझाही स्वाभीमान दुखावत आहे. मी केलेले कार्य माझेच हेच मलाही सिध्द करायचे आहे. किती दिवस तुमच्या बाजूला तटस्थपणे उभी राहू तेही मन मारून?


    माझ्या अस्तित्वाची मला जाणीव झाली. आता ही आषाढी वारी निभावली मी, आता ही कार्तिकी वारी तुम्ही एकटेच निभावून न्या. तुम्हांलाही कळू द्या आणि भक्तजणालाही? बघा जमतंय का? जाऊन येते माहेरी!


    "अग माई,नको हा हट्ट करू? सतत तुझ्या जवळ असण्याची सवय मला लागली तुच तर 'हे नका करू ते नका करू' करून मला आयतोबा बनवलेस!अग नारी शिवाय नर म्हणजे मीठा शिवाय स्वयंपाक ग!" 


   नको करू हा अट्टाहास, तुझ्या शिवाय माझा काय संसार? दोघे मिळून तर सांभाळतो आहोत जगताचा कारभार.


   एवढेसे कारण माई तुला नाराज व्हायला.चल आज पासून तु सांभाळ सगळ्या जगताची धुरा,मी निवृत्ती घेतो.भक्तजणांचे गाऱ्हाणी ऐकून घे, मार्ग दाखव. सगळे सगळे तुच कर.फक्त मी, तु कोठेही येऊ देऊ नकोस. मी दुरून फक्त परिक्षण करतो. रुप पालटून घेऊ चालेल?


    नको, नको नाथा जमणार नाही मला. एवढी मोठी जबाबदारी, मी कसे सांभाळू एवढा भक्ताच्या लोंढा?


    उगाच आपलं बोलले पण आता समजले. ज्यांचे त्याचे काम ज्यांनी त्यानी करावं, कोणतेही काम मोठं छोटे नसते.भगवंत कुवतीप्रमाणे वाटून देतो. सगळ्यांनी हातभार लावायचा आणि हा संसाराचा गाडा चालवायचा.


   पटलं ना मग! पण नाथा आता एक मात्र होईल. या विठूमाऊली बरोबर रखुमाई पण भक्ताच्या मुखी सदा राहील.


  तुच ऐक जरा भक्त जणांचा नाम घोष,"जय जय विठोबा रखुमाई"खरय हो मी माझ्या विचारात सगळे विसरले होते बाई! 


   खरे सांगु तुला एक माई, जसा चष्मा घालावा तसं जग दिसते.डोळे आणि कान यात चार बोटाचे अंतर असते. सुजाण आहेस जास्त विस्तारून सांगायची गरज नाही.


   नाथा, नाथा म्हणत रखूमाई मनातला अविचाराचा पसारा आवरत, भरलेले गाठोडे (अहो माहेरी जाण्यासाठी) उलगडून आवरू लागली.मनातल्या अंहपणा व्देष, मत्सराचे गाठोडे बांधून वळचणीला टाकले.


     भक्तजण जवळ आले होते. टाळ चिपळ्यांसहित मधूर स्वर कानी पडत होते. "माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी!"..बाप आणि आई माझे विठ्ठल रखूमाई! 


   रखुमाईचा स्वर जड झाअला.माझीच लेकरं,हा कसला मला भेदभाव सुचला? चुक झाली नाथा, माऊली! माईचा कंठ दाटून आला.तिने डोळ्याला पदर लावला.


   माई सावर स्वतहाला गालातल्या गालात हसत विठूमाऊली बोलली,


   "विठोबा राजा रखुमाई राणी,चंद्रभागेला झुळझुळ पाणी.उभा विटेवरी कर कटेवरी भजन करती वारकरी.


 नाथा,नाथा म्हणत रखुमाई देखील लाजली.


©️ ®️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे


  "कार्तिकी एकादशी निमित्त लेख विठूमाऊली चरणी

  समर्पित!" 

 माऊली माऊली 🙏🙏

उखाणा मावशीचा

 


बालदिन रोजदिन असावा

 *बालदिन*


🌈


रस्त्याने चालताना दगड दिसला , पायांनी भिरकावत तो दूर न्यावासा  वाटला , तर तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! ! 


आईस्क्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची इच्छा झाली , तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! 


पाऊस पडतोय , पावसात भिजायची,पावसाचे तुषार वर उडवायची इच्छा झाली , तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! 


रस्त्यात  मित्र मैत्रीण पाठमोरी दिसले , मागून जाऊन त्यांच्या खांद्यांना पकडून 'भॉ ssss क ' करायची इच्छा झाली तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! 


कोणाचा तरी तळपाय उघडा दिसला , गुदगुल्या करायची इच्छा झाली तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !


आणि .....


काही दिवस 'कट्टी' झाल्यावर 'बट्टी' घ्यायची तीव्र इच्छा झाली तरच तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! !

अमेरिकेचे अवास्तव कौतुक करणाऱ्यांनी हा 👇👇लेख जरूर वाचावा

 *अमेरिकेत घरी स्वयंपाक करणे बंद झाल्यावर काय झाले….?*

अमेरिकेचे अवास्तव कौतुक करणाऱ्यांनी हा 👇👇लेख जरूर वाचावा...

      1980 च्या दशकातील प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी अमेरिकन लोकांना चेतावणी दिली.

       स्वयंपाकघर खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यात आले असून, सरकारनेही वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेतल्यास कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्याची प्रासंगिकता नष्ट होईल.

पण तो सल्ला फार कमी लोकांनी ऐकला.

*घरी स्वयंपाक करणे बंद झाले आणि बाहेर ऑर्डर करण्याच्या सवयीने बरीचशी अमेरिकन कुटुंबव्यवस्था नष्ट झाली ...!*

घरात स्वयंपाक करणे म्हणजे कुटुंबाला एकत्र ठेवणे, आपुलकीने जोडणे. पाककृती ही केवळ कला नाही... ! तर ते एक कौटुंबिक संस्कृती आणि समाधानाचे केंद्र आहे... !

         घरात जर स्वयंपाकघर नसेल आणि फक्त बेडरूम असेल तर ते कुटुंब नाही त्याला वसतिगृह किंवा हॉटेलच म्हणावे लागेल !

           स्वयंपाकघर बंद करून एकच बेडरूम पुरेशी आहे असे वाटणाऱ्या अमेरिकन कुटुंबांचे काय झाले...?

     1971 मध्ये, 71 टक्के यूएस कुटुंबांमध्ये मुलांसह जोडीदार होते, परंतु आज, पन्नास वर्षांनंतर, ही संख्या 20 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, कुटुंबे आता नर्सिंग होममध्ये राहतात.

अमेरिकेत 15% स्त्रीया  एकट्या राहतात.

12% पुरुष कुटुंबात एकटेच राहतात.

19% घरांची मालकी फक्त वडिलांची किंवा आईची आहे.


केवळ 6% कुटुंबात पुरुष आणि महिला एकत्र आहेत.

   अलिकडच्या काळात जन्माला आलेल्या  बाळांपैकी 41% शिशु अविवाहित स्त्रियांपासून जन्माला आली आहेत त्यापैकी निम्म्या अपरिपक्व मुली शाळेत जाणाऱ्या आहेत, ही अतिशय गंभीर वस्तुस्थिती आहे... 


41% ही खूप मोठी आकडेवारी आहे. म्हणजेच अमेरिकेत  कौमार्य असे काही उरले  नाही...

परिणामी, अमेरिकेत  सुमारे 50 टक्के पहिले विवाह घटस्फोटात,


   67 टक्के द्वितीय विवाह आणि 

74 टक्के तृतीय विवाह समस्याग्रस्त आहेत.

*फक्त बेडरूम म्हणजे कुटुंब नाही.*

 स्वयंपाकघर नसेल तर....

 युनायटेड स्टेट्स हे तुटलेल्या लग्नाचे उदाहरण आहे.

         *आपल्या देशातील नागरिकांना कायमस्वरूपी खाद्यपदार्थ दुकानातून विकत घेण्याची सवय लागली तर इथली कुटुंबव्यवस्था देखील अमेरिकेप्रमाणे नष्ट होईल कुटुंबे उद्ध्वस्त झाली की मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडते.*

बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीर लठ्ठ आणि बेढब बनते मग लहान-मोठे आजार, इन्फेक्शन आदी समस्या उद्भवतात व खर्च देखील वाढतो ...

*घरात स्वयंपाक करणे आणि घरातील सदस्यांसोबत बसून खाणे हे कुटुंब व्यवस्थेसाठी हिताचे आहे!*

अर्थव्यवस्थेसाठी शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य देखील आवश्यक आहे.

म्हणूनच *पुर्वजांनी आम्हाला बाहेरचे न खाण्याचा सल्ला दिला पण……………*

*आज आपण आपल्या कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवतो... स्विगी, झोमॅटो, उबेर यांसारख्या फूड सर्व्हिस कंपन्यांकडून दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी शरीराला लहान-मोठे आजार होऊ देणारे अन्न खाण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर करतो...*

*अगदी उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय लोकांमध्येही आता ही फॅशन झाली आहे.*

भविष्यात ही सवय समाजासाठी मोठी आपत्ती ठरणार आहे...

आपण काय खावे हे ऑनलाइन कंपन्या ठरवतात... जेणेकरून डॉक्टर आणि औषध कंपन्यांची कमाई वाढेल...

       *आपले पूर्वज प्रवासात अथवा तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी घरात बनवलेले अन्नपदार्थ सोबत घेऊन जात असत.*

     *म्हणूनच घरी स्वयंपाक करा,*

     *आणि.....*

           *आनंदाने जगा….!*

             -*-*-*-*-*-

*(सोशल मिडीयाचा वापर लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही तर लोकांच्या आचरणात आणि विचारात परिवर्तन करण्यासाठी करा.*

*💠त्रिपुरारी पौर्णिमा*💠

 *‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*

  *💠त्रिपुरारी पौर्णिमा*💠


 *त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यांस संतुष्ट करून घेतले. मध्यंतरी इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला. परंतु व्यर्थ गेला. इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले. तेव्हा त्रिपुराने 'मला अमरत्व प्राप्त व्हावे' असा वर मागितला.*


वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांस सतावून सोडले. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही. शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले. आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवास आनंदी आनंद झाला व त्यांनी भगवान शंकरांचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून याला *देव दीपावली* असेही म्हणतात. 


*देवाप्रमाणे आपल्याही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा, दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान* *शंकरांच्या मंदिरात ७५० वाती जाळून, दिवे लावून साजरा करतात  या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती होय.*

*तसेच या दिवशी भगवान शिवाला अभिषेक घालून या वाती जळल्यावर राख म्हणजेच भस्म काही जण सांबाच्या (शिवाच्या) पिंडीला लावतात .कारण शिवाला भस्म प्रिय आहे.*


*त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरासुराचे  प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहीत धरून त्याचे भस्म शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची ही पद्धत आहे.* 

*संदर्भ ....सण,वार,  व्रत- वैकल्ये दिंडोरी प्रणित ग्रंथ*🌷


दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी "इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर" दक्ष

 दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी

"इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर" दक्ष

 

 

मुंबईदि. १५ : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावीयासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र (ईएमएमसी) स्थापित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असलेल्या मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून होणार आहे. दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या बातमीमध्ये निवडणुकीबाबत काही दखलपात्र मजकूरदृश्यबातमी असल्यास संबंधित जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेकडून तत्काळ दखल घेतली जात आहे. यासाठी मुंबई येथे राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत आहेत.

मतदान दिनी तसेच मतदानाच्या एक दिवस अगोदर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर महत्त्वाच्या घटनाआचारसंहितेचा भंगकायदा व सुव्यवस्था आदींबाबत बातम्या प्रसारित झाल्यास अशा घटनांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत किंवा संबंधित यंत्रणेमार्फत इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटरद्वारे तत्काळ दखल घेतली जाणार असून त्याबाबतचा कृती अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र संदर्भातील बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव (माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती) यांना सहमुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस माहिती व जनसंपर्क संचालक दयानंद कांबळे, अवर सचिव तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी शरद दळवीकक्ष अधिकारी विवेक जगदाळेकक्ष अधिकारी श्रीमती कल्पना कारंडेक्षेत्रीय कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi