*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*
*💠त्रिपुरारी पौर्णिमा*💠
*त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यांस संतुष्ट करून घेतले. मध्यंतरी इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला. परंतु व्यर्थ गेला. इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले. तेव्हा त्रिपुराने 'मला अमरत्व प्राप्त व्हावे' असा वर मागितला.*
वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांस सतावून सोडले. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही. शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले. आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवास आनंदी आनंद झाला व त्यांनी भगवान शंकरांचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून याला *देव दीपावली* असेही म्हणतात.
*देवाप्रमाणे आपल्याही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा, दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान* *शंकरांच्या मंदिरात ७५० वाती जाळून, दिवे लावून साजरा करतात या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती होय.*
*तसेच या दिवशी भगवान शिवाला अभिषेक घालून या वाती जळल्यावर राख म्हणजेच भस्म काही जण सांबाच्या (शिवाच्या) पिंडीला लावतात .कारण शिवाला भस्म प्रिय आहे.*
*त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरासुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहीत धरून त्याचे भस्म शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची ही पद्धत आहे.*
*संदर्भ ....सण,वार, व्रत- वैकल्ये दिंडोरी प्रणित ग्रंथ*🌷
No comments:
Post a Comment