*बालदिन*
🌈
रस्त्याने चालताना दगड दिसला , पायांनी भिरकावत तो दूर न्यावासा वाटला , तर तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !
आईस्क्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची इच्छा झाली , तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !
पाऊस पडतोय , पावसात भिजायची,पावसाचे तुषार वर उडवायची इच्छा झाली , तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !
रस्त्यात मित्र मैत्रीण पाठमोरी दिसले , मागून जाऊन त्यांच्या खांद्यांना पकडून 'भॉ ssss क ' करायची इच्छा झाली तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !
कोणाचा तरी तळपाय उघडा दिसला , गुदगुल्या करायची इच्छा झाली तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !
आणि .....
काही दिवस 'कट्टी' झाल्यावर 'बट्टी' घ्यायची तीव्र इच्छा झाली तरच तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! !
No comments:
Post a Comment