Thursday, 14 November 2024

फतेहसिंह,,जोरावर सिंह,, अजित सिंह,,साहिबजादा सिंह* के नाम पे बळदिवस

 '''गुरु गोविंद सिंह जी'''' ने अपने चारों बेटे देश पर बलिदान कर दिए सही में बालदिवस इनकी याद में बनाया जाना चाहिए,,,*

*फतेहसिंह,,जोरावर सिंह,, अजित सिंह,,साहिबजादा सिंह*🚩🙏 🙏🙏💐💐💐✅✅✅


पटिदेव पुजिते

 ⚜🚩⚜🔆🌅🔆⚜🚩⚜


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

             *वृंदा.. राधा प्रेमाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

                  

🏵🔆🌸🌿🛕🌿🌸🔆🏵


  *राणा भिमक रुक्मीणीस नयनी,*

  *देखोनी चिंता करी ।*

  *हि कन्या सगुणा वरा नृपवरा,*

  *कवणासी म्या दिईजे ।*

  *आता एक विचार कृष्ण नवरा,*

  *त्यासी समर्पु म्हणे ।*

  *रुख्मी पुञ वडील त्यासी पुसणे ।*

  *कुर्या सदा मंगलम*

  *शुभ मंगल सावधान ॥*

        *लग्नप्रसंगी मंगलाची कामना करताना आशीर्वाद देताना गायन होते ते मंगलाष्टकाचे. प्रत्येकाला आनंद देणारी ही मंगलाष्टके. आठ कडवी यामध्ये असतात म्हणून अष्टक. मंगलाष्टक लिहणे ही कला प्रत्येक घराण्यात एकाला तरी अवगत असते आणि गाणारेही असतात. या दोघांचेही कौतुक होते.*

        *श्री गणराया.. पवित्र नद्यांच्या नावासाह वधू वराच्या.. दोन्ही घराण्यातील महत्त्वाची नावे.. महती ही यामध्ये असते. हे सूर ऐकण्यासाठी सगळेच आतुर असतात. शुभमंगल होत एक नवा संसार उभा राहतोय हा सर्वांना आनंद. हल्ली तर मंगलाष्टके तंत्रज्ञानाच्या मदतीने लगेचच इतरांसाठी उपलब्ध केली जातात.*

        *या मंगलाष्टकाची आठवण होते ती तुळशी विवाहात. आता विवाह सुरू होणार. ही मंगलाष्टके ऐकून वातावरण भारले गेलेय.*

        *तुळस राहते ती वृंदावनात. वृंदा+वन म्हणजे वृंदावन. प्राणवायू पुरविणारी.. परिसर प्रदूषण मुक्त करणारी ही वृंदावने. भलेही वाडे जावून फ्लॅट आले तरीही प्रत्येक घरी वृंदावन आहेच. या तुळसी वृंदावनाला नित्य प्रदक्षिणा घातल्या जातात.*

         *या वृंदावनासमोरच तुळशीचा शालीग्रामाशी अर्थात विष्णूंशी विवाह सोहळा संपन्न होतो. घरोघरी मंदिरात तुळशी वृंदावसमोर तुळशी विवाह थाटात संपन्न होतोय.*             

        *वृंदावन.. जिथे राधा कृष्णाचे बालपण गेले. राधा कृष्णाच्या निस्पृह प्रेमाची.. मथुरेलगतची ही राधा कृष्ण वास्तव्याची पवित्र भूमी वृंदावन.. ब्रजभूमी. जगापूढे प्रेमाचा आदर्श ठेवणारे पुराणकालीन गाव. मंदिरांचे शहर म्हणून त्याची ओळख. यमुनेने तीन बाजूने वेढलेले, एकेकाळी सभोवतालच्या घनदाट वनासाठी प्रसिद्ध पौराणिक गाव. काशीप्रमाणे येथील पुरातन घाटही तेवढेच प्रसिद्ध. अगदी कालिया मर्दन घाटही आहे. कृष्ण कथेशी संबंधीत कित्येक स्थाने.. मंदिरे आहेत. येथे सोळाव्या शतकातील मंदिरे अजूनही सुस्थितीत आहेत.* 

        *प्रेमाची अत्युच्च कसोटी म्हणजे राधेचे प्रेम.. म्हणूनच कृष्णाआधी तिचे नाव घेतात. निस्वार्थ.. निर्व्याज्य.. अपेक्षा विरहीत प्रेम म्हणजे राधा प्रेम. या राधाकृष्णाची साक्षीदार ही वृंदावन नगरी. मग घरोघरी हे वृंदावन आणलेय. त्यात तुळशीला.. वृंदेला स्थान दिलेय. भारतीय संस्कृतीत घरोघरी तुळशीला रोज पाणी घालत.. पूजन करुन संध्याकाळी दिवा लावला जातोय.* 

        *आपल्या सुखी संसाराचे गमक त्या राधेने शिकवलेले आदर्श प्रेम आहे असे मानून तुळस पूजन केले जाते. महिला आपल्या पतीमध्येच राम.. कृष्णाला.. विष्णूला बघतात. त्यांचे घर म्हणजे त्यांना वैभवी राज्यच वाटते. मनोरथ पूर्ती करणाऱ्या पतीदेवाच्या हृदयावर त्या प्रेम गंगेचा अभिषेक करतात. हा पती मिळणे म्हणजे पुर्वजन्मातील तपाची फलश्रुतीच. हा संसार असाच सुखात राहू दे हीच त्या वृंदेला मनोभावे प्रार्थना.*

        *तुळसी श्रीर्महालक्ष्मी*

        *र्विद्याविद्या यशस्विनी ।*

        *धर्म्या धर्मानना देवी*

        *देवीदेवमन: प्रिया ।*

        *लभते सुतरां भक्तिमन्ते*

        *विष्णुपदं लभेत् ।*

        *तुळसी भूर्महालक्ष्मी:*

        *पद्मिनी श्रीर्हरप्रिया ।*

      

🌹🌿🌸🌿💝🌿🌸🌿🌹


  *वृंदावनात माझ्या*

  *ही तुळस डोलते*

  *मी प्रीतभावभोळी*

  *पतिदेव पूजिते*


  *घरकूल सानुलेसे*

  *या दोन जीवितांचे*

  *येथे सुखात नांदे*

  *हे राज्य वैभवाचे*

  *सखयास मी मनाचे*

  *हे फूल वाहते*


  *रघुनंद-श्याम-विष्णू*

  *त्यांच्यात मी पहाते*

  *सानंद प्रीतिगंगा*

  *त्यांच्या हृदी वहाते*

  *तृप्ती मनोरथांची*

  *त्यांच्यात राहते*


  *गत जन्मिंच्या तपाचे*

  *हे पुण्य ये फळाला*

  *या एक भाबडीला*

  *राजा गुणी मिळाला*

  *दोघांस ईश्वराशी*

  *मी सौख्य मागते*


🌺🌿🛕🌿💞🌿🛕🌿🌺


  *गीत : शांताराम नांदगावकर*  ✍

  *संगीत : प्रभाकर जोग*

  *स्वर : माणिक वर्मा*


  🎼🎶🎼🎶🎼    🎧

             

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१४.११.२०२४-*


🌻🥀💖🔆🔯🔆💖🥀🌻

भाजपाचे संकल्पपत्र हे जनतेचे संकल्प साकार करणारे : देवेंद्र फडणवीस

 भाजपाचे संकल्पपत्र हे जनतेचे संकल्प साकार करणारे : देवेंद्र फडणवीस

भाजपाचे हे संकल्पपत्र हे जनतेचे संकल्प साकार करणारे आहेअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संकल्प पत्रातील प्रमुख मुद्द्यांचा आढावा घेतला. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कीहे संकल्पपत्र विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे.  2014 मध्ये आम्ही जी आश्वासने दिली होती त्या पैकी किती पूर्ण झाली याचा अहवाल 2019 मध्ये आम्ही सादर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याचे काम या संकल्प पत्रातून होणार आहेअसेही ते म्हणाले.

यावेळी सूत्रसंचालन करतांना जाहीरनामा समितीचे संयोजक डॉ. श्री. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले की  हे संकल्पपत्र ५६ पानांचे असून १४ विभागांमध्ये विभागले आहे. समाजातील सर्व घटकांना स्पर्ष करणारे आणि राज्यव्यवहारातील सर्व विषयांवर दिशादर्शन करणारे असे हे सर्वंकष संकल्पपत्र ठरेल असे ते म्हणाले.

 

भाजपाचे संकल्पपत्र हे महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी राखणारे : अमित शाहा

 भाजपाचे संकल्पपत्र हे महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी राखणारे : अमित शाहा

  • विधानसभा निवडणुकांसाठीच्या भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन
  • हे संकल्पपत्र हे राज्याच्या विकासाचे दृष्टीपत्र ठरेल : सुधीर मुनगंटीवार
  • भाजपाचे संकल्पपत्र हे जनतेचे संकल्प साकार करणारे : देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. ११ नोव्हेंबर २०२४ :

भाजपाचे संकल्पपत्र हे महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी राखणारे ठरेलतसेच या संकल्पपत्राच्या आधारे  महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर्सचे  उद्दीष्ट पार करेल असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री श्री अमिअत शाहा यांनी केले. आगामी निवडणुकांसाठीच्या  महाराष्ट्र भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन काल मुंबईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री अमित शाहा यांच्या हस्ते करण्यात आलेत्यावेळी ते पत्रकारांना संबोधित करीत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे संकल्पपत्र जनतेचे संकल्प साकार करणारे ठरेल. तर यावेळी बोलतांना भाजपाच्या जाहिरनामा समितीचे प्रमुख मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की जनतेच्या सहभागातून तयार करण्यात आलेले हे संकल्पपत्र राज्याच्या विकासाचे दृष्टीपत्र ठरणार आहे.

. रविवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र भाजपाच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळेउपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसराष्ट्रीय महासचिव श्री. विनोद तावडेजाहीरनामा समितीचे अध्यक्ष श्री. सुधीर मुनगंटीवारकेंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयलनिवडणुक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रावसाहेब दानवेजाहिरनामा समितीचे संयोजक डॉ.श्री. विनय सहस्रबुद्धेमुंबई भाजपा अध्यक्ष श्री. आशिष शेलार हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. अमित शाहा पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीने आजवर दिलेली आश्वासने नेहमीच पूर्ण केली आहेत. जम्मू - काश्मीर चे 370 वे कलम रद्द करणेतिहेरी तलाक रद्द करणेनागरिकत्व कायद्यात दुरुस्ती (सीएए)राम मंदिर उभारणी अशी भाजपाने पूर्ण केलेल्या अनेक आश्वासनांची उदाहरणे श्री. अमित शाहा यांनी यावेळी दिली. 2014 मध्ये महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपा महायुती सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे अनेक निर्णय घेतलेअसेही ते म्हणले. भारतीय जनता पार्टीने समाजाच्या सर्व घटकांचा विचार करून तयार केलेले हे संकल्प पत्र हे राज्याच्या जनतेचे आकांक्षा पत्र आहेअसेही श्री. शाह यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री. शाह यांनी महायुती सरकारच्या काळात पूर्ण झालेल्या निळवंडेगोसीखुर्दटेंभू या सिंचन योजनाकोस्टल रोडअटल सेतू सारखे रस्तेपूलनार पार सारखे नदीजोड प्रकल्प अशा अनेक योजनांचा उल्लेख केला. आजवर राज्यातील कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या राजकारणाने शेतकऱ्यांचा आणि गरीबांचा नेहमी घात केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाच्या सिंचनाच्या प्रश्नांकडेरस्ते वगैरे विकासाच्या योजनांकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या व इतर प्रश्नांवर सर्वप्रथम भाजपा सरकारने उपाय केले असेही श्री. अमित शाहा  म्हणाले. संविधानाची खोटी लाल प्रत हातात घेऊन मतदारांची फसवणूक करणाऱ्या राहूल गांधी यांच्या कॉंग्रेस आणि माविआला लोकांनी साथ देऊ नये, असे आवाहनही श्री अमित शाहा यांनी यावेळी केले. 

श्री. अमित शाहा पुढे म्हणाले की अंतर्विरोधाने भरलेल्या महाविकास आघाडीने सत्तेसाठी तुष्टीकरणाची विचारधारा स्वीकारली आहे. तेलंगणाहिमाचल प्रदेशकर्नाटक या राज्यांत निवडणूक काळात दिलेली आश्वासने काँग्रेस सरकारला पूर्ण करण्यात अपयश आले आहे. कर्नाटकमध्ये अनेक गावेच्या गावे 'वक्फची मालमत्ता म्हणून घोषित झाली आहेतसामान्य माणसाची मालमत्ता वक्फ च्या घशात जात आहेअसे सांगून श्री. अमित शाहा पुढे म्हणाले की हे रोखण्यासाठीच मोदी सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक आणले आहे.    

महाराष्ट्रात धार्मिक आधारावर महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचे फतवे काढले जात आहेतहे फतवे आपल्याला मान्य आहेत काहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करावे असेही श्री. अमित शाहा म्हणाले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण

 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत

दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण

मुंबईदि. १३ : विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोरपणे तयारी करण्यात आली असून जिल्हास्तरावर यंत्रणा सज्ज झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणेच्या तयारीच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे. दिलखुलास’ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून आणि न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारण होणार आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची मुलाखत गुरूवार दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी घेतली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी संजय शिंदे यांची मुलाखत शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत छत्रपती संभाजी नगर आकाशवाणी केंद्राचे वृत्त संपादक समरजीत ठाकूर यांनी घेतली आहे.

०००

सहयोगी प्राध्यापक, गट-अ, मुलाखतीचा निकाल जाहीर

 सहयोगी प्राध्यापकगट-अमुलाखतीचा निकाल जाहीर

 

मुंबईदि. १३ : धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ मधील सहयोगी प्राध्यापक (शल्यचिकित्साशास्त्र) या पदाच्या मुलाखती दिनांक ०६ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांचा निकाल आता आयोगाच्या संकेतस्थळावर https://mpsc.gov.in उपलब्ध आहेअसे आयोगाने कळविले आहे.

0000

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी १७ ते २७ डिसेंबरला

 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची 

शारीरिक चाचणी १७ ते २७ डिसेंबरला

 

मुंबईदि. १३ : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी शारीरिक चाचणी दिनांक १७ ते २७ डिसेंबर २०२४ दरम्यान पोलीस मुख्यालयरोडपालीसेक्टर-१७कळंबोलीनवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

 

शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी तयारीच्या दृष्टीने आवश्यक सराव करावाअसे आयोगाने सूचित केले आहे. शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित केला जाणार आहे.

Featured post

Lakshvedhi