भाजपाचे संकल्पपत्र हे जनतेचे संकल्प साकार करणारे : देवेंद्र फडणवीस
भाजपाचे हे संकल्पपत्र हे जनतेचे संकल्प साकार करणारे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संकल्प पत्रातील प्रमुख मुद्द्यांचा आढावा घेतला. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हे संकल्पपत्र विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे. 2014 मध्ये आम्ही जी आश्वासने दिली होती त्या पैकी किती पूर्ण झाली याचा अहवाल 2019 मध्ये आम्ही सादर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याचे काम या संकल्प पत्रातून होणार आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी सूत्रसंचालन करतांना जाहीरनामा समितीचे संयोजक डॉ. श्री. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले की हे संकल्पपत्र ५६ पानांचे असून १४ विभागांमध्ये विभागले आहे. समाजातील सर्व घटकांना स्पर्ष करणारे आणि राज्यव्यवहारातील सर्व विषयांवर दिशादर्शन करणारे असे हे सर्वंकष संकल्पपत्र ठरेल असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment