Thursday, 14 November 2024

पटिदेव पुजिते

 ⚜🚩⚜🔆🌅🔆⚜🚩⚜


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

             *वृंदा.. राधा प्रेमाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

                  

🏵🔆🌸🌿🛕🌿🌸🔆🏵


  *राणा भिमक रुक्मीणीस नयनी,*

  *देखोनी चिंता करी ।*

  *हि कन्या सगुणा वरा नृपवरा,*

  *कवणासी म्या दिईजे ।*

  *आता एक विचार कृष्ण नवरा,*

  *त्यासी समर्पु म्हणे ।*

  *रुख्मी पुञ वडील त्यासी पुसणे ।*

  *कुर्या सदा मंगलम*

  *शुभ मंगल सावधान ॥*

        *लग्नप्रसंगी मंगलाची कामना करताना आशीर्वाद देताना गायन होते ते मंगलाष्टकाचे. प्रत्येकाला आनंद देणारी ही मंगलाष्टके. आठ कडवी यामध्ये असतात म्हणून अष्टक. मंगलाष्टक लिहणे ही कला प्रत्येक घराण्यात एकाला तरी अवगत असते आणि गाणारेही असतात. या दोघांचेही कौतुक होते.*

        *श्री गणराया.. पवित्र नद्यांच्या नावासाह वधू वराच्या.. दोन्ही घराण्यातील महत्त्वाची नावे.. महती ही यामध्ये असते. हे सूर ऐकण्यासाठी सगळेच आतुर असतात. शुभमंगल होत एक नवा संसार उभा राहतोय हा सर्वांना आनंद. हल्ली तर मंगलाष्टके तंत्रज्ञानाच्या मदतीने लगेचच इतरांसाठी उपलब्ध केली जातात.*

        *या मंगलाष्टकाची आठवण होते ती तुळशी विवाहात. आता विवाह सुरू होणार. ही मंगलाष्टके ऐकून वातावरण भारले गेलेय.*

        *तुळस राहते ती वृंदावनात. वृंदा+वन म्हणजे वृंदावन. प्राणवायू पुरविणारी.. परिसर प्रदूषण मुक्त करणारी ही वृंदावने. भलेही वाडे जावून फ्लॅट आले तरीही प्रत्येक घरी वृंदावन आहेच. या तुळसी वृंदावनाला नित्य प्रदक्षिणा घातल्या जातात.*

         *या वृंदावनासमोरच तुळशीचा शालीग्रामाशी अर्थात विष्णूंशी विवाह सोहळा संपन्न होतो. घरोघरी मंदिरात तुळशी वृंदावसमोर तुळशी विवाह थाटात संपन्न होतोय.*             

        *वृंदावन.. जिथे राधा कृष्णाचे बालपण गेले. राधा कृष्णाच्या निस्पृह प्रेमाची.. मथुरेलगतची ही राधा कृष्ण वास्तव्याची पवित्र भूमी वृंदावन.. ब्रजभूमी. जगापूढे प्रेमाचा आदर्श ठेवणारे पुराणकालीन गाव. मंदिरांचे शहर म्हणून त्याची ओळख. यमुनेने तीन बाजूने वेढलेले, एकेकाळी सभोवतालच्या घनदाट वनासाठी प्रसिद्ध पौराणिक गाव. काशीप्रमाणे येथील पुरातन घाटही तेवढेच प्रसिद्ध. अगदी कालिया मर्दन घाटही आहे. कृष्ण कथेशी संबंधीत कित्येक स्थाने.. मंदिरे आहेत. येथे सोळाव्या शतकातील मंदिरे अजूनही सुस्थितीत आहेत.* 

        *प्रेमाची अत्युच्च कसोटी म्हणजे राधेचे प्रेम.. म्हणूनच कृष्णाआधी तिचे नाव घेतात. निस्वार्थ.. निर्व्याज्य.. अपेक्षा विरहीत प्रेम म्हणजे राधा प्रेम. या राधाकृष्णाची साक्षीदार ही वृंदावन नगरी. मग घरोघरी हे वृंदावन आणलेय. त्यात तुळशीला.. वृंदेला स्थान दिलेय. भारतीय संस्कृतीत घरोघरी तुळशीला रोज पाणी घालत.. पूजन करुन संध्याकाळी दिवा लावला जातोय.* 

        *आपल्या सुखी संसाराचे गमक त्या राधेने शिकवलेले आदर्श प्रेम आहे असे मानून तुळस पूजन केले जाते. महिला आपल्या पतीमध्येच राम.. कृष्णाला.. विष्णूला बघतात. त्यांचे घर म्हणजे त्यांना वैभवी राज्यच वाटते. मनोरथ पूर्ती करणाऱ्या पतीदेवाच्या हृदयावर त्या प्रेम गंगेचा अभिषेक करतात. हा पती मिळणे म्हणजे पुर्वजन्मातील तपाची फलश्रुतीच. हा संसार असाच सुखात राहू दे हीच त्या वृंदेला मनोभावे प्रार्थना.*

        *तुळसी श्रीर्महालक्ष्मी*

        *र्विद्याविद्या यशस्विनी ।*

        *धर्म्या धर्मानना देवी*

        *देवीदेवमन: प्रिया ।*

        *लभते सुतरां भक्तिमन्ते*

        *विष्णुपदं लभेत् ।*

        *तुळसी भूर्महालक्ष्मी:*

        *पद्मिनी श्रीर्हरप्रिया ।*

      

🌹🌿🌸🌿💝🌿🌸🌿🌹


  *वृंदावनात माझ्या*

  *ही तुळस डोलते*

  *मी प्रीतभावभोळी*

  *पतिदेव पूजिते*


  *घरकूल सानुलेसे*

  *या दोन जीवितांचे*

  *येथे सुखात नांदे*

  *हे राज्य वैभवाचे*

  *सखयास मी मनाचे*

  *हे फूल वाहते*


  *रघुनंद-श्याम-विष्णू*

  *त्यांच्यात मी पहाते*

  *सानंद प्रीतिगंगा*

  *त्यांच्या हृदी वहाते*

  *तृप्ती मनोरथांची*

  *त्यांच्यात राहते*


  *गत जन्मिंच्या तपाचे*

  *हे पुण्य ये फळाला*

  *या एक भाबडीला*

  *राजा गुणी मिळाला*

  *दोघांस ईश्वराशी*

  *मी सौख्य मागते*


🌺🌿🛕🌿💞🌿🛕🌿🌺


  *गीत : शांताराम नांदगावकर*  ✍

  *संगीत : प्रभाकर जोग*

  *स्वर : माणिक वर्मा*


  🎼🎶🎼🎶🎼    🎧

             

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१४.११.२०२४-*


🌻🥀💖🔆🔯🔆💖🥀🌻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi