Saturday, 9 November 2024

चार विधानसभा मतदारसंघात १५२३ मतदान केंद्रावर १४ लक्ष ४ हजार मतदार बजावणार २० नोव्हेंबरला मतदानाचा हक्क

 चार विधानसभा मतदारसंघात १५२३ मतदान केंद्रावर १४ लक्ष ४ हजार मतदार बजावणार २० नोव्हेंबरला मतदानाचा हक्क

 

* सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान

*  मतदान केंद्रावर मोबाईल सोबत नेण्यास प्रतिबंध

*  सैन्य दलात असलेले जिल्ह्यातील २६१२ मतदार करतील मतदान

*  ३५९१ ज्येष्ठ व दिव्यांग मतदार गृहभेट पोस्टल मतपत्रिकेतून करणार मतदान

 

धाराशिव दि.९ (माध्यम कक्ष) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर,उस्मानाबाद आणि परंडा या विधानसभा मतदारसंघातील १५२३ मतदान केंद्रावर २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत १४ लक्ष ४ हजार १२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या मतदारांव्यतिरिक्त सैन्य दलात कार्यरत असलेले जिल्ह्यातील २६१२ मतदार ऑनलाईन पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणार आहे.

मतदान केल्याचा गोपनीयतेचा भंग होऊ नये यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना मतदान कक्षात मोबाईल सोबत घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे  उमरगा विधानसभा मतदारसंघातील ३२१, तुळजापूर मतदारसंघात ४१०, उस्मानाबाद मतदारसंघात विधानसभा मतदार ४१६ आणि परंडा विधानसभा मतदारसंघात ३७६ केंद्र असे एकूण १५२३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

 नवीन मतदार नोंदणी तसेच दुरुस्ती व आवश्यक वगळणीअंती २९ ऑक्टोबर २०२४ रोजी अंतिम केलेल्या मतदार यादीनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमरगा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ६६ हजार ३० पुरुष,१ लक्ष ४९ हजार ३५५ स्त्री व ९ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष १५ हजार३९४ मतदार,तुळजापूर विधानसभा मतदारसंघात २ लक्ष १ हजार २५ पुरुष,१ लक्ष ८२ हजार ४५ स्त्री आणि ७ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष ८३ हजार ७७ मतदार, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ९६ हजार ३५२ पुरुष,१ लक्ष ७८ हजार ३९९ स्त्री आणि १७ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष ७४ हजार ७६८ मतदार आणि परंडा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ७५ हजार २२१ पुरुष,१ लक्ष ५५ हजार ५४६ स्त्री आणि सहा तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष ३० हजार ७७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.यामध्ये ७ लक्ष ३८ हजार ६२८ पुरुष, ६ लक्ष ६५ हजार ३४५ स्त्री आणि ३९ तृतीयपंथी असे चारही मतदारसंघात १४ लक्ष ४ हजार १२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

ज्या मतदारांचे वय ८५ वर्षापेक्षा जास्त आहे असे वयस्क मतदार जिल्ह्यातील एकूण चारही मतदारसंघात ३००८ इतके आहे.तर दिव्यांग असलेले ५८३ मतदार आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षावरील ६१३ आणि दिव्यांग १९४ असे ८०७ मतदार १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ४० नियुक्त ग्रुप भेट मतदान पथकाच्या माध्यमातून विशेष गृहभेट पोस्टल मतपत्रिकेतून घरीच मतदान करणार आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ५८३ मतदार हे ८५ वर्षावरील आणि ९३ मतदार हे दिव्यांग असे एकूण सात ६७६ मतदार ९ ते १० नोव्हेंबर दरम्यान गृहभेट मतदान पथकाच्या माध्यमातून घरीच मतदान करतील.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील १११७ आणि दिव्यांग १६९ एकूण १२८६ मतदार हे १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान २५ गृह भेट मतदान पथकाच्या माध्यमातून मतदान करतील आणि परंडा विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षांवरील ६९५ मतदार आणि १२७ दिव्यांग मतदार असे एकूण ८२२ मतदार हे १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ३७ गृहभेट पथकाच्या माध्यमातून घरीच मतदान करणार आहे.

 जिल्ह्यातील ८५ वर्षावरील ३००८ आणि दिव्यांग असलेले ५८३ असे एकूण ३५९१ मतदार हे १३२ मतदान पथकाच्या माध्यमातून घरीच मतदान करणार आहे.

****

 


पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते": राज्यपाल राधाकृष्णन

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४

 

"पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते": राज्यपाल राधाकृष्णन

मुंबईदि. ९ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंडित राम नारायण यांनी आपल्या अद्भुत वादनातून सारंगी हे वाद्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी व स्वर्गीय आनंद देणारे होते. पंडित राम नारायण यांनी देश विदेशात अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले व आपले ज्ञान मुक्तहस्ताने वाटले. त्यांचे दैवी संगीत त्यांच्या पश्चात देखील शतकानुशतके कायम राहील. त्यांच्या निधनामुळे सारंगीतील एक पर्व संपले आहे. पंडित राम नारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबियशिष्यपरिवार व संगीत प्रेमींना कळवतोअसे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.      

०००

His music touched hearts and heavens: Governor Radhakrishnan

 

Mumbai, November 9: Maharashtra Governor C P Radhakrishnan has expressed grief on the demise of Sarangi maestro Pt Ram Narayan in Mumbai. In a condolence message, the Governor said:

 

"I was saddened to know about the demise of internationally acclaimed Sarangi maestro Pt Ram Narayan Ji. Pt Ram Narayan took Sarangi to global heights through his masterly performances. The sound of his Sarangi touched hearts and heavens. In the true Indian tradition, Pt Narayan passed on the knowledge of Sarangi to numerous disciples from India and abroad. His divine music will live on for centuries. With his demise, an era in Sarangi has come to an end. My heartfelt condolences to his family, disciples and music lovers. Om Shanti."

०००

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर बोधचिन्ह (लोगो) निवडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन ३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार मतदान

  


श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर


बोधचिन्ह (लोगो) निवडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन


३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार मतदान


 


धाराशिव,दि ९ (जिमाका) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचेकडून मंदिर संस्थांचे बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यासाठी क्रिएटिव्ह डिझाईन मागवण्यात आल्या होत्या.यासाठी १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष या बोधचिन्ह तयार करणाऱ्या व्यक्तींचे सादरीकरण होऊन ते बोधचिन्ह ( लोगो) मतदानासाठी मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले होते.त्या बोधचिन्हावर (लोगो) मतदान करण्याचे आवाहन तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक यांनी केले आहे.


            श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यासाठी मागवण्यात आलेल्या बोधचिन्हाचे (लोगों ) सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या व्यक्तीसोबतच संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या ईओआयनुसार २३ सप्टेंबरपर्यंत इमेलवर लोगो सादर करणारे व्यक्ती यांचे लोगो विचारात घेऊन त्यानुसार सर्व लोगो वोटींगसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत.या सर्व लोगोंना सर्व जनतेने मतदान करावे यासाठी सर्व बोधचिन्ह (लोगो) मंदिराचे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत . भाविकांनी मतदान करणेसाठी https://shrituljabhavanitempletrust.org या संकेतस्थळावरील होमपेजवर सर्व लोगो वोटींग या लिंकवर जाऊन लोगोची पाहणी करून पसंत असलेल्या लोगोसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मतदान करावे. असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.


***

मुंग,उडीद व सोयाबीन खरेदी शेतकऱ्यांनो ! खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करा : जिल्हा पणन अधिकारी यांचे आवाहन

 मुंग,उडीद व सोयाबीन खरेदी

शेतकऱ्यांनो ! खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करा : जिल्हा पणन अधिकारी यांचे आवाहन

धाराशिव दि.९ (जिमाका)  खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये जिल्हयात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत तालुकानिहाय १७ केंद्रावर मुग,उडीद व सोयाबीन या पिकाची ऑनलाईन शेतकरी नोंदणीस १ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे.शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर स्वत : जावून ऑनलाईन नोंदणी करावी.असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी पिकांच्या नोंदणीसाठी आपले आधार कार्ड,राष्ट्रीयकृत बँकेचे छापील पासबुक (अकाउंट नंबर व आय.एफ.एस.सी.कोड स्पष्ट दिसावा),ऑनलाईन पीक पेरा असलेला ७/१२ उतारा घेवून पिकाची नोंदणी करावी.

शासनाकडून  मुंग,उडीद,सोयाबीन या पिकांसाठी नोंदणी कालावधी निश्चित करण्यात आला आहे.यामध्‍ये मुंग आणि उडीद या पिकासाठी १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. तर त्यांचा खरेदी कालावधी हा १० ऑक्टोबर २०२४ पासून ७ जानेवारी २०२५ पर्यंत असणार आहे. तर सोयाबीन पिकासाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून खरेदीस सुरुवात झाली आहे.ही खरेदी १२ जानेवारी २०२५ पर्यंत नाफेडकडून करण्यात येणार आहे.

मुग,उडीद,सोयाबीन या पिकांच्या आधारभूत किंमतीही निश्चित करण्‍यात आल्या आहेत.यामध्‍ये मुग पिकासाठी ८ हजार ६८२  रूपये प्रति क्विंटल,उडीद पिक ७ हजार ४००  रूपये प्रति क्विंटल, सोयाबीन ४ हजार ८९२ रूपये प्रति क्विंटल दराने निश्चित करण्‍यात आला आहे.

याबरोबरच तालुकानिहाय खरेदी केंद्र आणि सबएजंट संस्थेची नेमणूकही करण्यात आली आहे.धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुका शेतकरी सह संघ लि.,धाराशिव, विकास कृषी पणन सहकारी संस्था मर्या उस्मानाबाद,वसुधरा जिल्हा कृषी पणन व प्रक्रीया सह.संस्था कनगरा,वसुंधरा अँग्रीकल्चर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.कनगरा, तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संघ,ता.तुळजापूर,श्री.खंडोबा पणन सहकारी संस्था मर्या अणदूर,लोहारा तालुक्यातील जगदंबा सहकारी खरेदी विक्री संस्था लोहारा,दस्तापूर विविध सर्व सेवा सहकारी सोसायटी मर्या दस्तापूर,उमरगा तालुक्यातील गुंजोटी विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि गुंजोटी,श्री.स्वामी समर्थ सर्व सेवा सहकारी संस्था मर्या. गुंजोटी,कळंब तालुक्यातील एकत खरेदी विक्री सहकारी संस्था मर्या.धाराशिव,तालुका सह.शेतकरी खरेदी विक्री संघ लि.कळंब, राजमाता कृषी पुरक सेवा पुरवठा सहकारी संस्था,चोराखळी,वाशी तालुक्यातील वाशी तालुका शेतकरी सह संघ लि.वाशी तर भुम तालुक्यातील शिवाजी भुम तालुका शेतकरी सह.खरेदी विक्री संघ लि., तनुजा महिला शेतीपूरक सेवा पुरवठा सह संस्था सोन्नेवाडी भूम,कै. उत्तमराव सोन्ने कृषीमाल पुरक सह . संस्था सोन्नेवाडी या केंद्रावर आपले वरील पिके विकता येणार आहेत.

शेतकऱ्यांनी शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन शेतमाल घेवून येतांना व्यवस्थितरित्या वाळवून आणावा.जेणेकरून आर्द्रता मोजतांना १२ टक्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.जास्त आर्द्रतेमुळे शेतमाल परत नेण्याची वेळ येणार नाही.असेही आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम.व्ही.बाजपेयी यांनी केले आहे.


मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा पुरवाव्यात -उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार कोकण, नाशिक विभागाची विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक

 मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा पुरवाव्यात

-उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार

कोकण, नाशिक विभागाची विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक

 

मुंबईदि. 8 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांना किमान आश्वासित सुविधा योग्यरित्या पुरविल्या जातील यासाठी योग्य व्यवस्थापन करावेअसे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार यांनी आज कोंकण व नाशिक विभागातील निवडणूक यंत्रणांना दिले.

         सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कोंकण व नाशिक विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

         या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त संजय कुमारप्रधान सचिव अविनाश कुमारराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगमभारत निवडणूक आयोगाचे उपसचिव सुमनकुमारअवर सचिव अनिलकुमारराज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीपबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणीकोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुखनाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,  मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यासह मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण)  सत्यप्रकाश टी. एल.हिमांशू गुप्तासमीर वर्माअंजना एम.,शिल्पा शिंदेकेंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक पोनुगुंतला रामजीकेंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंताअमन प्रीत आदी उपस्थित होते.         

         श्री. हिरदेश कुमार म्हणाले कीमतदान केंद्रावर पुरेशी सुरक्षा व्यवस्थातात्पुरत्या मतदान केंद्रांची मान्यता घेणेमतदान केंद्राचे ठिकाण बदलले असल्यास त्याबाबत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविणेत्याची प्रसिद्धी करणेमहिलांनीदिव्यांग कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले अशा प्रकारच्या विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करणेमतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी,  रॅम्प,  सावली इ. सुविधांची निर्मितीवेब कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करणेमतदान केंद्राच्या बाहेर व आत कॅमेरे लावावे अशा सूचना दिल्या. तसेच या सर्व सुविधांची पूर्तता झाल्याबाबत व आवश्यकतांबाबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारीपोलीस अधीक्षकपोलीस आयुक्त यांनी स्वतः पाहणी करुन खातरजमा करावीअशा सूचनाही त्यांनी केल्या. 

यंदा मतदान हे नोव्हेंबर महिन्यात असून आता सुर्यास्त लवकर होईलअशा वेळी सायंकाळी मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाशासाठी दिवे लावण्याची सुविधा करावी. टपाली मतदान व गृह मतदान प्रक्रियेबाबतही यंत्रणांनी पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित राबवावी. गृह मतदान कार्यक्रम अगोदर जाहीर करावा. त्याबाबत उमेदवारांना कळवावे. प्रत्येक मतदारापर्यंत मतदान चिठ्ठ्या वेळत पोहोचतील याचे नियोजन करावे. मतदार याद्यांविषयी असलेल्या तक्रारींबाबत तत्काळ दखल घ्यावी. मतदान केंद्रांबाबतही सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करावेतया दृष्टीने स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रमांवर भर द्यावादहा हजारांहून अधिक मतदार केंद्रांच्या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष तयार करावाअशाही सूचना श्री कुमार यांनी दिल्या.   

        शहरी भागात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेतअसे सांगून हिरदेश कुमार म्हणालेमतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती व्हावी यासाठी सर्व साधनांचा अवलंब करावा. मतदार चिठ्ठ्यांचे 100 टक्के आणि वेळेत वाटप करावे. सर्व जिल्ह्यात आपले मतदान केंद्र जाणून घ्या- नो युवर पोलींग स्टेशन’ उपक्रम चांगल्या प्रकारे राबविला जात असून त्याप्रमाणे विभागातील इतर जिल्ह्यातही राबविला जावा. मतदारांना मोबाईल ॲपद्वारे मतदान केंद्रांची माहिती कशा प्रकारे पहावी याबाबत प्रचार प्रसिद्धी करावी.

         प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनाच सर्व प्रक्रिया राबवावयाची आहे. राबवित असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षउमेदवार यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी व प्रक्रिया राबवावी. त्याचे दस्तऐवजीकरण करावे. त्यांचे शंकानिरसन करावे. निवडणूक प्रक्रिया राबवितांना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. निवडणूक काळात माध्यमांमध्ये येणाऱ्या बनावट बातम्याफेक न्यूज अर्थात खोट्या माहितीचे प्रसारण तात्काळ रोखावे, असे हिर्देशकुमार यांनी सांगितले.

         निवडणूक कामकाजासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणपिण्याचे पाणीकामकाजाची सुविधामतदान केंद्रांवर गेल्यावर मुक्काममुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतासुरक्षितताभोजनपाणी याबाबतची व्यवस्था पुरविण्यात यावी. निवडणूक कामकाजात कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवणाऱ्या आजारांसाठी तत्काळ वैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन असावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्या. प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्याची योग्य काळजी घेतली जाईलयाची खबरदारी घ्यावी.

अचूक आकडेवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी

मतदानाचे प्रमाण नेमके कळावे व त्यातील आकडेवारीत अधिक अचूकता यावी यासाठी या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी विधानसभा मतदार संघस्तरावरजिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर नेमण्यात येणार आहे. बुथनिहाय पडताळणी करुन मतदान टक्केवारी अचूक देण्यात येईल यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचेही निवडणूक उपायुक्त यांनी सांगितले.

          श्री. संजय कुमार म्हणालेपाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. मतदानावेळी गर्दी होऊ नये यासाठी मतदारांच्या रांगाचे व्यवस्थापन करावे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता जपण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राजकीय पक्षांना सर्व टप्प्यांवर आवश्यक ती माहिती द्यावी.

        राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणालेमहानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर 100 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेतमतदान केंद्रांवर आवश्यक ते सर्व दिशादर्शकठिकाणदर्शक फलक असावेत. मतदारांना आपले मतदान केंद्र माहित असावेयासाठी प्रयत्न करावेत. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी भरावयाचे सर्व नमुने,  अहवाल व्यवस्थितरित्या भरुन वेळेत पोहोचतील आदी बाबींबाबत मतदान केंद्राध्यक्षमतदान केंद्र अधिकारी यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी बाकडेखुर्च्या उपलब्ध करुन द्याव्यात. मतदानासाठी घरुन येण्यासाठी व जाण्यासाठी वाहनाची मागणी केलेल्या दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करुन द्यावीअसेही ते म्हणाले.

उमेदवारराजकीय पक्ष यांना निवडणूक प्रक्रियेची वेळोवेळी माहिती देऊन त्यामध्ये पारदर्शकता राहील याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या सूचना घ्याव्यातत्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होईल याची दक्षता घ्यावीअशा सूचनाही श्री. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

     जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितले की, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात मतदार चिठ्ठ्यांचे शंभर टक्के वितरण स्थलांतरित मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याकरिता उपाययोजना,  एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी सर्व मतदान केंद्रांवर समसमान मतदारसंख्या असेल अशी रचना करण्यात आली आहे. मतदानावेळी रांगाच्या व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आवश्यक तेथे राखीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेतअसेही ते म्हणाले.

     बैठकीस कोंकण व नाशिक विभागातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निरीक्षकखर्च निरीक्षक तसेच पोलीस निवडणूक निरीक्षकपोलिस आयुक्तपोलिस अधीक्षकमुंबई शहर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारीप्रत्यक्ष उपस्थित होते. इतर जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक यांच्यासह निवडणूक प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

00000

 


 

उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' राज्यस्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात 'ये पुढे मतदान कर' या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण

 'उत्सव निवडणुकीचाअभिमान महाराष्ट्राचा'

राज्यस्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात

'ये पुढे मतदान कर' या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण

 

मुंबईदि. ८ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गतमतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचाअभिमान महाराष्ट्राचाहे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात गेटवे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

             भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमारउप निवडणूक आयुक्त संजय कुमारसंचालक पंकज श्रीवास्तवप्रधान सचिव अविनाश कुमारसचिव सुमन कुमारअवर सचिव   अनिल कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, मुंबई शहर व उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीमुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

            मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि दिव्यांग मतदार सदिच्छा दूत निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकरमतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री अनन्या पांडे, हास्य कलाकार भारती सिंगहर्ष लिंबाचियागायक राहुल सक्सेना, रॅपर सुबोध जाधव, अभिनेते मनोज जोशी, अभिनेता बजाज आनंद, अभिनेत्री सोनाली खरेअभिनेता अली असगर यांच्यासह विविध नामवंत कलाकार, अभिनेते तसेच विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.   

आवर्जून मतदान करण्याचे मान्यवरांचे आवाहन

        अभिनेत्री वर्षा उसगावकर म्हणाल्या की, प्रत्येक मत महत्त्वाचे असून तो महत्त्वपूर्ण अधिकार आहे. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत याचा आवर्जून लाभ घेवून मतदानाचा अधिकार बजवावा.

अभिनेत्री सोनाली खरे म्हणाल्या की, आपल्या तक्रारींचे निराकरण करण्याचा योग्य उपाय म्हणजे मतदान करणे हेच आहे. मी देखील 20 नोव्हेंबर रोजी मतदान करणार आहे. आपण देखील मतदान करा.

        दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाले की, 20 नोव्हेंबर रोजी अवश्य मतदान करावे. तो प्रत्येकाचा हक्क आहे तो आपण बजवावा.

          हास्य कलाकार भारती सिंग म्हणाल्या, प्रत्येक सण आणि उत्सव आपण न सांगता साजरे करतो. मतदान करणे हा देखील लोकशाहीचा उत्सव आहे. आपण देखील २० नोव्हेंबरला मतदान करा मी देखील मतदान करणार आहे.

          अभिनेता बजाज आनंद म्हणाले कीमनोरंजनासाठी आपण अनेकदा वेळेचा विचार करत नाही. मतदान हे पवित्र कार्य आहे यासाठी देखील आपण जरूर वेळ काढावा.

            अभिनेत्री अनन्या पांडेअभिनेते मनोज जोशी यांनी देखील मतदान हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता या दिवशी जरूर मतदान करावे, असे आवाहन केले.

            क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे म्हणाले की२० नोव्हेंबर रोजी मी स्वतः माझे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलून या दिवशी मतदान करणार आहे.  

या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे व मतदारांची सक्रिय भागीदारी निश्चित करणे हा आहे. त्यादृष्टीने या कार्यक्रमात विविध कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.

 

            यावेळी मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाकडून सादरीकरण करण्यात आले. तरडाक कार्यालयाने निवडणूक विषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

             त्याचप्रमाणे यावेळी मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली. मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई देखील समुद्रातील बोटींवर करण्यात आली होती. मतदार जागृती रॅलीमतदार जागृती व्हॅनचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्यापर्यंत मतदार जागृती रॅली

या कार्यक्रमानंतर गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये नागरिकांना मतदान प्रक्रियेतील महत्त्व आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.

0000


 

Friday, 8 November 2024

सी-व्हिजिल (cVIGIL)

 सी-व्हिजिल (cVIGIL)

सी-व्हिजिल हे ॲप हे आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्याकरिता एक अभिनव असे मोबाइल ॲप्लिकेशन आहे. ज्याद्वारे प्रत्येक नागरिकाला निवडणुकीच्या वेळी आपल्या स्मार्टफोनचा उपयोग करून छायाचित्रेश्राव्यकिंवा दृक चित्रण अपलोड करता येते. ‘सी-व्हिजिल चा अर्थ सतर्क नागरिक’ असा आहे.  हे ॲप आता मराठी भाषेत पण उपलब्ध आहे.या ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल झाल्यानंतर आचारसंहिता उल्लंघन झाल्याचे ठिकाण शोधण्यासाठी जी.पी.एस.चा उपयोग  करता येतो.तक्रारीच्या स्थितीचा मागोवा  घेवून 100 मिनिटांत स्थितीची माहिती देते.

सी-व्हिजिल ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक. गुगल प्लेस्टोअरमध्ये  https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil&hl=en_IN ॲपल स्टोअर  https://apps.apple.com/in/app/cvigil/id1455719541  वर उपलब्ध  आहे.

Featured post

Lakshvedhi