Saturday, 9 November 2024

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर बोधचिन्ह (लोगो) निवडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन ३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार मतदान

  


श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर


बोधचिन्ह (लोगो) निवडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन


३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार मतदान


 


धाराशिव,दि ९ (जिमाका) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचेकडून मंदिर संस्थांचे बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यासाठी क्रिएटिव्ह डिझाईन मागवण्यात आल्या होत्या.यासाठी १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष या बोधचिन्ह तयार करणाऱ्या व्यक्तींचे सादरीकरण होऊन ते बोधचिन्ह ( लोगो) मतदानासाठी मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले होते.त्या बोधचिन्हावर (लोगो) मतदान करण्याचे आवाहन तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक यांनी केले आहे.


            श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यासाठी मागवण्यात आलेल्या बोधचिन्हाचे (लोगों ) सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या व्यक्तीसोबतच संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या ईओआयनुसार २३ सप्टेंबरपर्यंत इमेलवर लोगो सादर करणारे व्यक्ती यांचे लोगो विचारात घेऊन त्यानुसार सर्व लोगो वोटींगसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत.या सर्व लोगोंना सर्व जनतेने मतदान करावे यासाठी सर्व बोधचिन्ह (लोगो) मंदिराचे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत . भाविकांनी मतदान करणेसाठी https://shrituljabhavanitempletrust.org या संकेतस्थळावरील होमपेजवर सर्व लोगो वोटींग या लिंकवर जाऊन लोगोची पाहणी करून पसंत असलेल्या लोगोसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मतदान करावे. असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.


***

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi