चार विधानसभा मतदारसंघात १५२३ मतदान केंद्रावर १४ लक्ष ४ हजार मतदार बजावणार २० नोव्हेंबरला मतदानाचा हक्क
* सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान
* मतदान केंद्रावर मोबाईल सोबत नेण्यास प्रतिबंध
* सैन्य दलात असलेले जिल्ह्यातील २६१२ मतदार करतील मतदान
* ३५९१ ज्येष्ठ व दिव्यांग मतदार गृहभेट पोस्टल मतपत्रिकेतून करणार मतदान
धाराशिव दि.९ (माध्यम कक्ष) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर,उस्मानाबाद आणि परंडा या विधानसभा मतदारसंघातील १५२३ मतदान केंद्रावर २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत १४ लक्ष ४ हजार १२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या मतदारांव्यतिरिक्त सैन्य दलात कार्यरत असलेले जिल्ह्यातील २६१२ मतदार ऑनलाईन पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणार आहे.
मतदान केल्याचा गोपनीयतेचा भंग होऊ नये यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना मतदान कक्षात मोबाईल सोबत घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे उमरगा विधानसभा मतदारसंघातील ३२१, तुळजापूर मतदारसंघात ४१०, उस्मानाबाद मतदारसंघात विधानसभा मतदार ४१६ आणि परंडा विधानसभा मतदारसंघात ३७६ केंद्र असे एकूण १५२३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
नवीन मतदार नोंदणी तसेच दुरुस्ती व आवश्यक वगळणीअंती २९ ऑक्टोबर २०२४ रोजी अंतिम केलेल्या मतदार यादीनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमरगा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ६६ हजार ३० पुरुष,१ लक्ष ४९ हजार ३५५ स्त्री व ९ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष १५ हजार३९४ मतदार,तुळजापूर विधानसभा मतदारसंघात २ लक्ष १ हजार २५ पुरुष,१ लक्ष ८२ हजार ४५ स्त्री आणि ७ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष ८३ हजार ७७ मतदार, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ९६ हजार ३५२ पुरुष,१ लक्ष ७८ हजार ३९९ स्त्री आणि १७ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष ७४ हजार ७६८ मतदार आणि परंडा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ७५ हजार २२१ पुरुष,१ लक्ष ५५ हजार ५४६ स्त्री आणि सहा तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष ३० हजार ७७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.यामध्ये ७ लक्ष ३८ हजार ६२८ पुरुष, ६ लक्ष ६५ हजार ३४५ स्त्री आणि ३९ तृतीयपंथी असे चारही मतदारसंघात १४ लक्ष ४ हजार १२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
ज्या मतदारांचे वय ८५ वर्षापेक्षा जास्त आहे असे वयस्क मतदार जिल्ह्यातील एकूण चारही मतदारसंघात ३००८ इतके आहे.तर दिव्यांग असलेले ५८३ मतदार आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षावरील ६१३ आणि दिव्यांग १९४ असे ८०७ मतदार १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ४० नियुक्त ग्रुप भेट मतदान पथकाच्या माध्यमातून विशेष गृहभेट पोस्टल मतपत्रिकेतून घरीच मतदान करणार आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ५८३ मतदार हे ८५ वर्षावरील आणि ९३ मतदार हे दिव्यांग असे एकूण सात ६७६ मतदार ९ ते १० नोव्हेंबर दरम्यान गृहभेट मतदान पथकाच्या माध्यमातून घरीच मतदान करतील.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील १११७ आणि दिव्यांग १६९ एकूण १२८६ मतदार हे १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान २५ गृह भेट मतदान पथकाच्या माध्यमातून मतदान करतील आणि परंडा विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षांवरील ६९५ मतदार आणि १२७ दिव्यांग मतदार असे एकूण ८२२ मतदार हे १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ३७ गृहभेट पथकाच्या माध्यमातून घरीच मतदान करणार आहे.
जिल्ह्यातील ८५ वर्षावरील ३००८ आणि दिव्यांग असलेले ५८३ असे एकूण ३५९१ मतदार हे १३२ मतदान पथकाच्या माध्यमातून घरीच मतदान करणार आहे.
****
No comments:
Post a Comment