Wednesday, 20 April 2022

 आज आमच्या मित्राच्या सासूबाई म्हणाल्या पोह्यांसाठी 2 कृष्णावळ द्या, 

मी ऐकतच राहिलो, मग त्या म्हणाल्या अहो म्हणजे कांदे ,

कांद्याला कृष्णावळ म्हणतात हे मला पहिल्यांदाच समजले.

 *कृष्णावळ*...

अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द !

आजकाल कोणीही नाही वापरत !

कृष्णावळ चा अर्थ कांदा ! 

कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे. 

कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो... 

आणि 

आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. 

शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. 

ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.

कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे. 

पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार व पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो.

आहे की नाही गंमत... 

डोळ्यातून पाणी काढणारा कांदा किती वेगळ्या उंचीवर गेला ना कृष्णावळ या शब्दामूळे !

🧅🧅🧅🧅🧅🧅🧅

 *'शेवटची सुट्टी'*

*असा एक _English picture_ आहे...*

*'Last Holiday'*

*'आयुष्याची शेवटची सुट्टी' खरच एक डोळ्यात अंजन घालणारा सिनेमा आहे .*

*त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच.मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं.*

*मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजून पर्यंत जी _'सुट्टी घेणं'_ परवडत नव्हतं, त्या _'मोठ्ठ्या सुट्टी'_ वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे.* 

*ती उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये... आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत, उच्चभ्रू वर्तुळात वावरते.* 

*तिथे तिच्या नशिबाचे फासे पालटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो...पण ती देवाला विचारते....*

_*"why now...?* *आयुष्य संपतानाच का एवढा मेहेरबान झालास?"*_

*पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता _'आणखी काही'_ गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा _'दांभिक सभ्यतेचा'_ बुरखा फाडून, स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिक रहाते... वागतेे... बोलते.*

*आणि तिला जाणवतं...*

*आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना, आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही. केवळ 'भविष्य' आणि 'लोकं काय म्हणतील'....याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं."*

*_"I have wasted too much of time on assumptions.....now I have time only for reality!"* 

*राहिलेलं दोन आठवड्यांच आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरवात करते. तिच्या _departmental store owner_ लाही खरी खोटी सुनावते... त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.*

*आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत... तिला कसलाही आजार नाही... व ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या last holiday नं शिकवलेला धडा, ती कधीच विसरत नाही. तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात...*

*फिल्मी भाग सोडला, तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरंच विचार करायला लावणारा होता.* 

*आपणही... आजचा/ आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही...*

*मनात कायम उद्याची चिंता! काही तरी अशाश्वत मिळवण्या साठी... कायम हातचं सोडून पळत्या पाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो...*

*इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या शर्यतीत सहभागी होतो.*

*सगळा आनंद/सगळी मजा, एखाद्या 'सुट्टीत' उपभोगण्यासाठी, शिलकीत टाकत जातो....*

*आणि हे सगळं व्यर्थ आहे... जे खरचं हवं होतं... आनंद/ समाधान... हे या कशात नव्हतंच... हेे कळायच्या आतच... 'शेवटची सुट्टी लागते'.* 

*शिलकीतली _'पुंजी'_ तशीच राहून जाते... न वापरलेली... कोरीच्या कोरी... पण आता निरूपयोगी !* 

*आपण सर्वजण नेहमी वयाच्या पंचावन्न/साठ पर्यंत काम करत, पैसे कमवत व वेगवेगळ्या जबाबदाऱ्या संभाळत धावत राहतो, मनात विचार असतात की आता तरुण आहोत तोपर्यंत काम करु या. नंतर रिटायर झाल्यावर आपल्या "शेवटच्या सुट्टीत"आपापले छंद, आवडी प्रमाणे वागु/जगु या पण तो पर्यंत आपला स्टॅमिना कमी झालेला असतो बऱ्याच जणांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात. वयोमानानुसार आपल्यावर बरीच बंधन आलेली असतात व शेवटच्या सुट्टीत करण्याचे बरेच मनसुबे हे प्रत्यक्षात येतच नाहीत वा मनातच राहून जातात.* 

*या शेवटच्या सुट्टी पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण, त्याच वेळी, त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर.?*

*तर प्रत्येक क्षण त्या 'सुट्टी'इतकाच आनंद देईल व सर्वांचे जीवन खरच सुंदर व आंनदी होईल.* 🌹🌸🌹

*🙏..शुभसकाळ..🙏*

 *या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे)


1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे.

2. वाढदिवस, ॲनिवर्सरीमध्ये अनावश्यक खर्च व दिखावा.                                     

3. जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले.

4. मुलांचं शिक्षण, शाळा, क्लास फी यामध्ये वाढ. (1ली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे)

5. घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च. यात खोटी प्रतिष्ठा.

6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे, पार्टी, गेट टूगेदर इत्यादी.

7. लग्न तर आहेच, पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च.   

8. कर्जांचे व्याज फेडणे.

9. खाण्यापिण्यात बदलामुळे मेडिकल खर्चात वाढ. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन, पगार कमी खर्च जास्त होत आहे. परिणामी, तणाव तणाव तणाव.

10.लोक, नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपाई पैशाचा चुराडा.

11. पार्टी दारु कल्चरमुळे अक्षरशः लाखो तरुण, कुटुंबे जिवंतपणी नरक भोगताहेत. (उदा. घड्याळ घेतलं-द्या पार्टी, गाडी घेतली-द्या पार्टी, सायकल घेतली-द्या पार्टी, कपडे, दागिने, वस्तू घेतली-द्या पार्टी, 2-5शे रुपये पगार वाढला-द्या पार्टी,)

*🙏अनावश्यक खर्च कमी करा! गरज अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि इच्छा स्वप्नं अनंत... आहेत त्यांचा अंत..... नाही... !*✍

 *लिमिटेड होतं तेच बरं होतं* ...

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा..... 

टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर *छान गप्पा मारायची*.... 😊😃😁

दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. *प्रवासाचा आनंद मिळायचा* .... 😄

गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे *स्थूलतेचे प्रमाण कमी होते*.....😉

शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक *जडण घडण नीट व्ह्यायची*... 💪👍

बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून *कुटुंबासाठी वेळ द्यायची*...... 👏💞

अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले *आयुष्य खूप सुखी होते*......

........... पण आता सगळंच *अनलिमिटेड* झालंय.... 😢आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच *लिमिटेड* झालंय !!😧😩

बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात"?

बेटा काळ खूप बदलला बघ...

तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.

तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोर दिवसभर बसून 'कॉम्प्युटर गेम्स' खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.

तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.

तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात.

तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी *गोड* लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.

तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.

मुळात काय की,

*तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं*

            आता

बरंच काही मिळत असूनही *आनंदी जीवन कसे जगावे* यांवरील *सेमिनर्स' अटेंड* करावे लागतात.

(कुणी लिहिलंय माहित नाही, पण तथ्य आहे)🌹

 


 



कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही                                                                -हसन मुश्रीफ

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ३४ वा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान सोहला.

            मुंबई दि. १९ : केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांची अंमलबजावणी करताना कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही, असे कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

            महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन येथे आयोजित ३४ व्या गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान सोहळ्यात मंत्री श्री.मुश्रीफ बोलत होते.


            यावेळी ‘हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळा’स रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार २०१९ देऊन गौरविण्यात आले. रुपये ७५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, तर रु.५० हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेला २०१९चा कामगार भूषण पुरस्कार राजेंद्र हिरामण वाघ, कमिन्स इंडिया लिमिटेड, कोथरूड पुणे यांना देण्यात आला. तसेच रु.२५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेल्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने ५१ कामगारांना गौरविण्यात आले.

            या कार्यक्रमास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंगल, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कामगार विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, कामगार विभागाचे उपसचिव शशांक साठे, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

            मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, असंघटीत क्षेत्रातील वाहन चालक, शेतमजूर, ऊसतोड कामगार आदीं असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी महामंडळे स्थापन करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. त्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे. संघटीत कामगारांना सुरक्षा असते, कायदेशीर संरक्षण असते मात्र असंघटीत कामगारांच्या बाबतीत अशी परिस्थिती नसते. असंघटीत कामगारांच्या मनात असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी राज्य शासन उद्योगधंद्यांच्या आस्थापना ह्या कामगारांच्या हिताला बाधा पोहोचणार नाही, अशी धोरणे अंगीकारण्यास प्रवृत्त करेल. कुठल्याही देशाचा जीडीपी मालकामुळे न वाढता कामगारांमुळे वाढतो. त्यामुळे सर्व कारखानदारांनी कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा द्यावी, असे आवाहनही मंत्री श्री.मुश्रीफ यांनी यावेळी केले.

            राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, श्रमावर आधारित योजना निर्माण झाल्या पाहिजेत. कामगारांचे हात बंद पडले की देश बंद पडतो. केंद्राच्या कामगार कायद्याचा कामगारांना फटका बसू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील. कामगार मागे राहू नये यासाठी राज्य शासन आपले धोरण अवलंबेल, असे राज्यमंत्री श्री.कडू म्हणाले.

            दरम्यान मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन झाले.

            समारंभापूर्वी मंत्री श्री.मुश्रीफ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मंत्री श्री.मुश्रीफ व राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या श्रमकल्याण युग या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी प्रास्ताविक केले तर सहायक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी आभार मानले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गुणवंत कामगार पुरस्कार सन २०१९

            रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार सन २०१९- हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ 

            कामगार भूषण पुरस्कार सन २०१९- राजेंद्र हिरामण वाघ, कमिन्स इंडिया लि., कोथरूड, पुणे

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार सन २०१९

१. श्रीमती नजमाबी गुलाब शेख

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक, इचलकरंजी

२. श्री. किरण चंद्रकांत देशमुख

अल्फा लवाल (इंडिया) प्रा.लि., दापोडी, पुणे

३. डॉ.स्मिता समीर माहुरकर एल.आय.सी., नागपूर

४. श्री. लीलाधर रामेश्वरजी दवंडे

इंडोरामा सिंथेटीक्स (इं), लि., बुटीबोरी, नागपूर

५. श्री. हनुमंत रामचंद्र जाधवलोकमान्य हॉस्पिटल, निगडी, पुणे

६. श्री. संतोष मारोतराव ताजने

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, ऊर्जा नगर, चंद्रपूर

७. श्री. किरण राजाराम जाधव

हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ, मुंबई

८. श्रीमती महानंदा भगवानराव केंद्रे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, परभणी

९. श्री सुरेश श्रीनाथराव बोर्डे

बजाज ऑटो लि. वाळूज, औरंगाबाद

१०. श्री. कुलदीप जनार्दन सावंत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद

११. श्री. बाळासाहेब लिंबराज साळुंके

टाटा मोटर्स कंपनी लि., पिंपरी, पुणे.

१२. श्री शिवाजी सुबराव पाटीलटाटा मोटर्स लि. पिंपरी, पुणे.

१३. श्री. श्रावण बाबनराव कोळनूरकर

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं., औरंगाबाद

१४. श्री. पंजाबराव गोविंदराव मोरे

प्रबोधन प्रकाशन प्रा.लि., दैनिक सामना औरंगबाद

१५. श्री. योगेश रावण कापडणीस

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं., औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे, नाशिक

१६. श्री. राजेश रमाकांत वर्तक

टाटा स्टील लिमिटेड, तारापूर, पालघर.

१७. श्री. नितीन रामचंद्र पाटील

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यशाळा चंदनवाडी, मिरज

१८. श्री. राजेशकुमार ओंकारमल राजोरे

विदर्भ पब्लिकेशन प्रा. लि. , दैनिक देशोन्नती, अकोला

१९. श्री. विठ्ठल सखाराम तांबे

गोदरेज ॲन्ड बॉईज मॅन्यु.कं.लि., शिरवळ, सातारा

२०. श्री गजानन कृष्णाजी पिसे

सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील सहकारी साखर कारखाना, लि., अकलूज, सोलापूर.

२१. श्री. पंकज गोवर्धनराव ठाकरे

ग्राईंडवेल नॉर्टन लि., बुटीबोरी, नागपूर

२२. श्री. संजीव राम माने

कमिन्स इंडिया लि., कोथरूड, पुणे

२३. श्री. अरुण वैजनाथ भालेकर

कोहलर पावर इंडीया प्रा.लि. चिकलठाणा, औरंगाबाद

२४. श्री. बबन भिकाजी भारस्कर

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या., बल्लारशहा, चंद्रपूर  

२५. श्री. दत्तात्रय पांडुरंग गायकवाड

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे

२६. श्री.संजीव आनंदा सुरवाडे

मध्य रेल्वे, विद्युत इंजिन कारखाना, भुसावळ

२७. श्री. विलास हसुराम म्हात्रे

नवी मुंबई महानगरपालिका, परिवहन उपक्रम, बेलापूर

२८. श्री. तानाजी एकनाथ निकमकॅनरा बँक, घाटकोपर, मुंबई.

२९. श्री. अविनाश एकनाथ दौंड

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई

३०. श्री विनोद नारायण विचारे

भारतीय स्टेट बँक, लालबाग, मुंबई

३१. श्री. संपत विष्णु तावरे

महानंद दुग्धशाळा, गोरेगांव

३२. श्री. सुर्यकांत बाबुराव पदकोंडे

बजाज ॲटो लिमिटेड, बजाज नगर, वाळूज, औरंगाबाद.

३३. श्री. सखाराम रामचंद्र इंदोरे

गोदरेज ॲन्ड बॉईज कं.लि., विक्रोळी, मुंबई

३४. श्री. नितीन रामदास बेनकर

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर-अकलूज, सोलापूर

३५. श्री. काळुराम पांडुरंग लांडगे

पुणे महानगर परिवहन महामंडळ, लि.स्वारगेट, पुणे

३६. श्री. दिलीप विठ्ठलराव ठाकरे

मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, निरी, नागपूर

३७. श्री. इम्रानअली रमजान शिकलगार

किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी, सांगली

३८. श्री. वैभव हरीश्चंद्र भोईर

ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा, ठाणे

३९. सौ. संगीता धनंजय भोईटे

श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था मर्या. फलटण, सातारा.

४०. श्री राम बारका सारंग

माझगांव डॉक शिप बिल्डर्स लि., माझगांव, मुंबई

४१. श्री. अजय यशवंत दळवी

सिम्बोलिक फॅब्रिक प्रा.लि., भिवंडी, ठाणे

४२. श्री. जयवंत यशवंत कुपटे

भारत बिजली लि., ऐरोली, नवी मुंबई

४३ श्री. चंद्रकांत महादेव मोरे

बँक ऑफ महाराष्ट्र, परेल शाखा, मुंबई

४४. श्री. दिनकर बापु आडसुळ

मेनन पिस्टन रिंग्ज प्रा.लि., संभापुर, हातकंणगले, कोल्हापूर.

४५. श्री. दिलीप नामदेव पासलकर कमिन्स इंडीया लि.कोथरुड, पुणे

४६. श्री. विजय संभाजी आरेकर

एस.बी.रिसेलर्स, कागल, एम.आय.डी.सी. कोल्हापुर.

४७. श्री. गणेश यशवंत काळे

करन्सी नोट प्रेस, जेलरोड, नाशिक.

४८. श्री संजय शांताराम तावडेमुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई

४९. श्री. विजय तुकाराम रणखांब

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जिंतुर रोड, परभणी

५०. श्री. अशोक सु-याबा आलदर

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., विभाग पंढरपूर

५१. श्री. बालाजी किसन नलवडे

किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी, पलूस, सांगली.

०००

मांडवी वनपरिक्षेत्रातील अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा

- दत्तात्रय भरणे

            मुंबई, दि. 19 : पालघर जिल्ह्यातील मांडवी वनपरिक्षेत्रातील मौजे शिरवली पुर्णांकपाडा येथे वन विभागाच्या जागेत अतिक्रमण, उत्खनन, अनधिकृत बांधकाम, झाडे तोडणे, रस्ते बांधणाऱ्यांवर वन विभागाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात मौजे शिरवली वनजमिनीवर सुरू असलेल्या कामासंदर्भात आयोजित बैठकीत राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक रामाराव, उपवनसंरक्षक एस.मधुमिता, पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य राजाराम मुळीक, अरविंद बेर्डे या बैठकीला उपस्थित होते.

            मांडवी वनपरिक्षेत्रातील चंद्रपाडा, खैरपाडा, टोकरेपाडा, मालजीपाडा या भागात असलेल्या वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून अवैधरित्या उत्खनन करणे, झाडे तोडणे, अनाधिकृत रस्ते बनविणे या तक्रारींबाबत वन विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशा सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी दिल्या.

                                                            *****



 


मुख्यमंत्र्यांनी घेतला ऊर्जा विभागाचा आढावा

८ हजार मेगा वॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन

तातडीच्या उपाययोजना करा

                                        - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याला वीजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी तत्कालीक

तसेच दीघकालीन धोरण निश्चित करण्याचे निर्देश .                                                                     

            मुंबई, दि. १९ : राज्याला वीजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन ८ हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऊर्जा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी राज्याची सध्याची वीज निर्मिती, कोळशाचा साठा, वीजेची आजची आणि भविष्यातील मागणी आणि याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना याचा आढावा घेतला. बैठकीस उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, माजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थाकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

दर आठवड्याला आढावा घेणार

            राज्यात मागील पाच दिवसांपासून कोणत्याही स्वरूपाचे भारनियमन करण्यात आले नाही ही चांगली बाब असून अशीच परिस्थिती भविष्यातही कायम राहण्यासाठी वीज निर्मिती, कोळसा साठा, आयात कोळसा, वीज खरेदी याचे उत्तम नियोजन करण्यात यावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वीजेसंदर्भात जे निर्णय घेतले जातील त्याच्या अंमलबजावणीचा आपण दर आठवड्याला आढावा घेणार असून निर्णयांचा कार्यपूर्ती अहवाल या बैठकीत सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

पावसाळ्याचे नियोजन करावे

            केंद्र शासनाने १० टक्के कोळसा आयातीला मान्यता दिली आहे. ही प्रक्रिया गतीने पूर्णत्वाला न्यावी असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, येणारा पावसाळा लक्षात घेऊन कोळशाच्या साठ्याचे नियोजन करण्यात यावे. राज्याचा हक्काचा आणि दर्जेदार कोळसा राज्याला नियमितपणे उपलब्ध होईल यादृष्टीने महानिर्मितीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. उरण येथील गॅस प्रकल्प सुरु करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी तसेच पंतप्रधानांशी आपण स्वत: बोलू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मागील पाच दिवसांपासून राज्यात कोणतेही भारनियमन नाही- डॉ. नितीन राऊत

            राज्यात भारनियमन करावे लागू नये म्हणून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचे व मागील ५ दिवसांपासून राज्यात कोणत्याही प्रकारचे भारनियमन करण्यात आलेले नसल्याची माहिती उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. एकट्या महाराष्ट्रातच नाही तर देशात वीजेची टंचाई आहे. कोळशाचा अपुरा पुरवठा हे त्यामागचे मुख्य कारण असून इतर १२ राज्यातही कोळशामुळे भारनियमन सुरु आहे.

            राज्याला होत असलेला अपुरा कोळसा पुरवठा व उन्हाळ्यामुळे मागणी वाढली असल्याने राज्यात दर दिवशी २ हजार ते २ हजार ५०० मेगावॅट ची तूट निर्माण झाली होती. ती दूर करण्यात सध्या विभाग यशस्वी झाला आहे. विभागाने 20 लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्याच्या दृष्टीने निविदा काढल्या आहेत. महावितरणच्या स्तरावर आवश्यकतेनुसार 4 लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्याचे कार्यादेश दिलेले आहेत. वीज खरेदी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. राज्यात भारनियमन करावे लागू नये यासाठीचे ऊर्जा विभागाने नियोजन केले आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. नगरविकास, ग्रामविकास विभागाकडील प्रलंबित वीज देयकांच्या थकबाकीची रक्कम विभागाला मिळावी अशी मागणीही डॉ. राऊत यांनी यावेळी केली. त्यांनी राज्यात येणाऱ्या कोळसा रॅकची संख्या कमी झाल्याने वीज निर्मितीमध्ये कमी आल्याचे सांगितले. कोळसा निर्मिती आणि रॅकचे उत्तम नियोजन होण्याच्या दृष्टीनेही विभाग प्रयत्न करत असल्याचेही मंत्री डॉ.राऊत म्हणाले.

            बैठकीत महावितरण, महाजनकोमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले.

****"

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार

- दत्तात्रय भरणे

            मुंबई, दि. १९ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

            मंत्रालयातील दालनात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्याबाबत आयोजित बैठकीत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे प्रकल्प संचालक मल्ल‍िकार्जुन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील नागरिक यावेळी बैठकीला उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शौचालय, पाणी, वीज या मांडलेल्या समस्यांबाबत वन विभाग व रहिवाशी दोघांची बाजू ऐकून योग्य त्या निर्णयासाठी सर्वोतोपरी सहकार्याची भूमिका राहील असे मत राज्यमंत्री श्री. भरणे यांनी बैठकीत व्यक्त केले.

            माजी आमदार विद्या चव्हाण यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या समस्या बैठकीत मांडल्या.


*****

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार सन २०२१-२२ जाहीर

            मुंबई, दि. १९ : सामान्य प्रशासन विभागामार्फत सन २०२१-२२ या वर्षाकरिता "राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा राबविण्यात आली. या अभियानातंर्गत राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोकृष्ट कल्पना या वर्गवारीत राज्यस्तरीय निवड समितीमार्फत पात्र व अंतिम पुरस्कार विजेते जाहीर करण्यात आले आहेत. या संबंधीचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि.१८ एप्रिल 2022 रोजी निर्गमित करण्यात आला असून हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

            या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत प्राप्त पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावर सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव या वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, मुंबई, पारितोषिकाचे स्वरुप रोख दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई, पारितोषिकाचे स्वरुप रोख. सहा लाख रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक, पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

            विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर , पारितोषिकाचे स्वरुप रोख दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ, पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार पंचायत समिती, राहता, अहमदनगर पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

            महानगरपालिका वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पारितोषिकाचे स्वरुप रोख दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार आयुक्त, नागपूर महानगरपालिका, पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

            सर्वोकृष्ट कल्पना अंतर्गत शासकीय संस्था वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार तहसिल कार्यालय, तळोदा, नंदुरबार, पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार तहसिल कार्यालय, नवापूर, नंदुरबार पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार जिल्हाधिकारी अकोला पारितोषिकाचे स्वरुप रोख वीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

            शासकीय अधिकारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार डॉ. राजेंद्र बी. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर, पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार श्री. अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव, पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार श्री. एकनाथ बिजवे, नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ, पारितोषिकाचे स्वरुप रोख वीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

            शासकीय कर्मचारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार श्री. अजय राजाराम लोखंडे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, भडगाव नगरपरिषद, भडगाव, जळगाव, पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार श्री. निशीकांत सुर्यकांत पाटील, तलाठी, पारोळा शहर, तलाठी कार्यालय पारोळा, जळगाव, पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, देण्यात येणार आहे.

-----

आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास आवश्यक

- मंत्री अमित देशमुख.

            मुंबई, दि. 19 : वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता आणि एकसमानता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एच.एम.आय.एस.) अभ्यास करण्यात यावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली (एच.एम.आय.एस.)याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी एच.एम.आय.एस याबाबत सादरीकरण केले. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसचिव प्रकाश सुरवसे उपस्थित होते.

            श्री. देशमुख म्हणाले, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित रुग्णालयांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय माहिती निर्माण करणे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व शैक्षणिक बाबींमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणे ही गरज आहे. त्यामुळेच येत्या काळात या विभागासाठी आवश्यक सॉप्टवेअरचे विश्लेषण, मॉड्युल्सची संख्या, वापर करण्याची सुलभता आणि एकसमानता या पर्यायांचा सांगोपांग विचार करुनच राज्यामध्ये सर्वंकष अशी एकच एच.एम.आय.एस. कार्यप्रणाली विकसित होणे आवश्यक आहे.

            केंद्र शासनाने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही योजना 27 सप्टेंबर 2021 पासून संपूर्ण देशात कार्यान्वित केली आहे. या योजनेमध्ये आरोग्याशी संबंधित सर्व घटकांचा जसे, रुग्णालय, क्लिनिक्स, प्रयोगशाळा, फार्मसिज, रेडिओलॉजी सेंटर्स इत्यादीचा समावेश असणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे. एच.एम.आय.एस कार्यप्रणालीचा वापर करताना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील संस्थांमध्ये आवश्यक सॉप्टवेअर आणि हार्डवेअर, आवश्यक कुशल मनुष्यबळ यांची आवश्यकता असणार आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सी-डॅक (C-DAC) यांच्याकडून रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचा प्रस्ताव मागितला असून याबाबतचा पूर्ण अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.

00


आझादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमितकार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात यावी

- मंत्री अमित देशमुख.

            मुंबई, दि. 19 : आझादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राचा हिरक महोत्सव यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. हे आयोजन करीत असताना निश्चित कार्यक्रम ठरवून या कार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात यावी, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, उपसचिव विलास थोरात आदी अधिकारी उपस्थित होते.

            श्री. देशमुख म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्य नाट्य स्पर्धा, चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजनाबरोबरच ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘महाराष्ट्राचा हिरक’ महोत्सवानिमित्त कोणते कार्यक्रम आणि ते राज्यभरात कोठे आयोजित करण्यात येणार आहेत, त्याचे स्वरुप नेमके कसे असेल याबाबतची रुपरेषा विस्तृतपणे सादर करण्यात यावी. जेणेकरुन या कार्यक्रमांचे आयोजन मुंबईसह विभाग आणि जिल्हास्तरावर करण्यात येऊ शकेल.

00

मुख्यमंत्री ने ली ऊर्जा विभाग की समीक्षा बैठक

आठ हजार मेगावाट औष्णिक बिजली उत्पादन का लक्ष्य रखकर शीघ्रता से कार्रवाई करें

- मुख्यमंत्री ठाकरे

राज्यों को बिजली के मामले में आत्मनिर्भर बनाने हेतु तत्कालिक

तथा लंबी अवधी की नीति तय करने के निर्देश

            मुंबई, अप्रैल 19:- राज्यों को बिजली के मामले में आत्मनिर्भर बनाने के लिए विभाग को तत्कालिक स्वरूप तथा दीर्घकालीन स्वरूप के कामों को लेकर नीति निश्चित करनी होगी. मौजूदा समय में बिजली की बढ़ती हुई मांग के मद्देनजर 8000 मेगा वाट औष्णिक ऊर्जा निर्माण के उद्देश्य से तत्काल उपाय योजना करने के निर्देश मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे ने आज दिए.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अध्यक्षता में आज ऊर्जा विभाग की बैठक का आयोजन किया गया. इसमें उन्होंने राज्य की मौजूदा बिजली निर्मिती, कोयले का भंडार, बिजली की आज की तथा भविष्य की मांग और इसके अनुसार किए जाने वाले उपायों की समीक्षा की.

            बैठक में ऊर्जा मंत्री डा, नितिन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालय के प्रधान सलाहकार श्री सीताराम कुंटे, मुख्यमंत्री के अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खरगे, पूर्व मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, ऊर्जा विभाग के प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरण के अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक विजय सिंघल, महानिर्मिती के अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक संजय खंदारे सहित विभाग के अन्य अधिकारी उपस्थित थे.

प्रत्येक सप्ताह की जाएगी समीक्षा

            राज्य में पिछले पांच दिनों में किसी भी प्रकार का लोड शैडिंग ना होने को अच्छी बात बताते हुए मुख्यमंत्री ने इस परिस्थिति को भविष्य में भी बरकरार रखने के उद्देश्य से बिजली निर्माण, कोयले का भंडार, आयातित कोयला, बिजली की खरीदी का उत्तम तरीके से नियोजन करने की सूचना दी. उन्होंने कहा कि बिजली के संदर्भ में जो भी निर्णय किए जाएंगे उसके कार्यान्वयन को लेकर हर सप्ताह में जायजा बैठक आयोजित की जाएगी. उन्होंने इस समीक्षा बैठक में कार्य पूर्ति की रपट पेश करने की सूचना भी इस समय दी.

मानसून से पूर्व नियोजन करें

            केंद्र सरकार ने १० प्रतिशत कोयला आयात करने को मान्यता दी है. इस प्रक्रिया को गति के साथ पूरा करने की सूचना देते हुए मुख्यमंत्री श्री ठाकरे ने कहा कि आगामी मानसून के मद्देनजर कोयले के भंडार का नियोजन करना चाहिए. उन्होंने कहा कि राज्य के अधिकार का और उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण कोयला राज्यों को नियमित रूप से उपलब्ध होने की दृष्टि से महानिर्मिती को लगातार प्रयास करने होंगे. मुख्यमंत्री ने यह भी कहा कि उड़न में गैस परियोजना शुरू करने को लेकर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तथा प्रधानमंत्री से वह स्वयं वार्तालाप करेंगे.

०००


गंधर्व गीत

 


Featured post

Lakshvedhi