*'शेवटची सुट्टी'*
*असा एक _English picture_ आहे...*
*'Last Holiday'*
*'आयुष्याची शेवटची सुट्टी' खरच एक डोळ्यात अंजन घालणारा सिनेमा आहे .*
*त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच.मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं.*
*मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजून पर्यंत जी _'सुट्टी घेणं'_ परवडत नव्हतं, त्या _'मोठ्ठ्या सुट्टी'_ वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे.*
*ती उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये... आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत, उच्चभ्रू वर्तुळात वावरते.*
*तिथे तिच्या नशिबाचे फासे पालटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो...पण ती देवाला विचारते....*
_*"why now...?* *आयुष्य संपतानाच का एवढा मेहेरबान झालास?"*_
*पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता _'आणखी काही'_ गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा _'दांभिक सभ्यतेचा'_ बुरखा फाडून, स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिक रहाते... वागतेे... बोलते.*
*आणि तिला जाणवतं...*
*आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना, आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही. केवळ 'भविष्य' आणि 'लोकं काय म्हणतील'....याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं."*
*_"I have wasted too much of time on assumptions.....now I have time only for reality!"*
*राहिलेलं दोन आठवड्यांच आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरवात करते. तिच्या _departmental store owner_ लाही खरी खोटी सुनावते... त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.*
*आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत... तिला कसलाही आजार नाही... व ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या last holiday नं शिकवलेला धडा, ती कधीच विसरत नाही. तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात...*
*फिल्मी भाग सोडला, तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरंच विचार करायला लावणारा होता.*
*आपणही... आजचा/ आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही...*
*मनात कायम उद्याची चिंता! काही तरी अशाश्वत मिळवण्या साठी... कायम हातचं सोडून पळत्या पाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो...*
*इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या शर्यतीत सहभागी होतो.*
*सगळा आनंद/सगळी मजा, एखाद्या 'सुट्टीत' उपभोगण्यासाठी, शिलकीत टाकत जातो....*
*आणि हे सगळं व्यर्थ आहे... जे खरचं हवं होतं... आनंद/ समाधान... हे या कशात नव्हतंच... हेे कळायच्या आतच... 'शेवटची सुट्टी लागते'.*
*शिलकीतली _'पुंजी'_ तशीच राहून जाते... न वापरलेली... कोरीच्या कोरी... पण आता निरूपयोगी !*
*आपण सर्वजण नेहमी वयाच्या पंचावन्न/साठ पर्यंत काम करत, पैसे कमवत व वेगवेगळ्या जबाबदाऱ्या संभाळत धावत राहतो, मनात विचार असतात की आता तरुण आहोत तोपर्यंत काम करु या. नंतर रिटायर झाल्यावर आपल्या "शेवटच्या सुट्टीत"आपापले छंद, आवडी प्रमाणे वागु/जगु या पण तो पर्यंत आपला स्टॅमिना कमी झालेला असतो बऱ्याच जणांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात. वयोमानानुसार आपल्यावर बरीच बंधन आलेली असतात व शेवटच्या सुट्टीत करण्याचे बरेच मनसुबे हे प्रत्यक्षात येतच नाहीत वा मनातच राहून जातात.*
*या शेवटच्या सुट्टी पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण, त्याच वेळी, त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर.?*
*तर प्रत्येक क्षण त्या 'सुट्टी'इतकाच आनंद देईल व सर्वांचे जीवन खरच सुंदर व आंनदी होईल.* 🌹🌸🌹
*🙏..शुभसकाळ..🙏*
No comments:
Post a Comment