Wednesday, 20 April 2022

 आज आमच्या मित्राच्या सासूबाई म्हणाल्या पोह्यांसाठी 2 कृष्णावळ द्या, 

मी ऐकतच राहिलो, मग त्या म्हणाल्या अहो म्हणजे कांदे ,

कांद्याला कृष्णावळ म्हणतात हे मला पहिल्यांदाच समजले.

 *कृष्णावळ*...

अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द !

आजकाल कोणीही नाही वापरत !

कृष्णावळ चा अर्थ कांदा ! 

कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे. 

कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो... 

आणि 

आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. 

शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. 

ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.

कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे. 

पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार व पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो.

आहे की नाही गंमत... 

डोळ्यातून पाणी काढणारा कांदा किती वेगळ्या उंचीवर गेला ना कृष्णावळ या शब्दामूळे !

🧅🧅🧅🧅🧅🧅🧅

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi