Tuesday, 15 February 2022

 आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ

            नाशिक, दि. 14 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र - 2021 अभ्यासक्रमाच्या परीक्षेस आज प्रारंभ झाला आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम व अंतीम वर्षाच्या परीक्षा व दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, नर्सिंंग, स्पीच लॅग्वेज पॅथालॉजी, ऑडिओलॉजी आदी विषयांच्या लेखी परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत आहेत. 

            विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, परीक्षा संदर्भात विद्यापीठाचे मा. कुलगुरु व मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांचे मार्गदर्शन आहे. ही परीक्षा ऑफलाईन पध्दतीने व कोविड सुरक्षित वातावरणात घेण्यात येणार आहेत. यासाठी परीक्षा केंद्र व परीक्षा खोल्यांची संख्या वाढविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

            ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सदर परीक्षा राज्यातील 40 परीक्षा केंद्रांत परीक्षा घेण्यात येत अूसन या परीक्षेसाठी 2335 विद्यार्थी प्रविष्ट आहेत.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मास्क परीधान करणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रावर सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन व लिक्विड सॅनीटायझारचा वापर करण्याबाबत केंद्रप्रुखांना निर्देशित करण्यात आले आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.

            परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षक, कनिष्ठ पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक, अंतर्गत दक्षता पथक, केंद्रप्रमुख, केंद्र निरिक्षक, भरारी पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा खोल्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (हॉलतिकीट) वितरीत करण्यात आली आहेत. हिवाळी -2021 परीक्षेसाठी प्रति परीक्षा केंद्र रुपये वीस हजार इतक्या रकमेची अतिरिक्त तरतूद करण्यात आलेली आहे.

            परीक्षांच्या पहिल्या टप्प्यात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम, अतिविशेषोपचार व प्रथम वर्ष एम.बी.बी.एस जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा माहे डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा दि. 28 फेब्रुवारी ते दि. 21 मार्च 2022 कालावधीत घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा राज्यातील 184 परीक्षां केद्रांवर घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी 83948 इतके विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

            विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाईन पध्दतीने वेळापत्रकानुसार होणार आहेत. परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

0000


Salutes

"एकतर्फी  प्रेमाची उत्कट व जिद्दीची कहाणी"


 स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठवाड्यातील एक गाव ,त्या गावातील एका गरीब ब्राह्मणाचे घर, भिक्षुकी करून कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या कुटुंबप्रमुखाची आपल्या मुलाकडून माफक अपेक्षा की शिकून-सवरून त्याने मोठं व्हावं नोकरी करावी आणि कुटुंबाचे पांग फेडावेत .पण तो मुलगा उनाड ,आई वडिलांच्या कष्टाची पर्वा न करणारा मॅट्रिकच्या परीक्षेत तीन वेळा नापास झाला. वडीलांनी  बेदम मारहाण केली आणि घरातून हाकलून लावले. कसा काय कोणास ठाऊक मजल दर मजल करत पंढरपूरला पोहोचला. उपाशीपोटी एका मठात शिरला ,संध्याकाळ उलटून गेलेली एक व्यक्ती विठ्ठल विठ्ठल चा गजर करीत वीणा हातात घेऊन फेऱ्या मारीत होती त्या व्यक्तीने  वीणा या मुलाच्या हाती दिली आणि सांगितले ही पवित्र वीणा कोणाच्या तरी  हातातच  द्यायची जमिनीवर ठेवायची नाही आणि ती व्यक्ती निघून गेली रात्रभर तो मुलगा विठ्ठल विठ्ठल  असा नाम जप करीत उपाशीपोटी वीणा हाती घेऊन फेऱ्या मारीत राहिला .पहाटे पहाटे कोणीतरी आलं, त्याच्या हाती वीणा देऊन तो बाहेर पडला 

अंतर्मुख झाला' दिव्यत्वाची प्रचिती' आली आणि घरी परतला .प्रामाणिकपणे अभ्यास केला उत्तम गुणांनी मॅट्रिक पास झाला व बनारस  हिंदू विश्व विद्यापीठात पुढचे शिक्षण घेण्याचा मनोदय त्याने वडिलांपाशी व्यक्त केला वडिलांची  ऐपत नव्हती पण त्यांनी कनवटीचे चार रुपये दिले. एक शर्ट एक धोतर पायात चप्पल नाही असा तो तरुण विद्यापीठात दाखल झाला.

 त्या काळात श्रीमंत सरदार उमरावांची मुले  बग्गीतून विद्यापीठात येत. , पण त्याला स्वतःच्या परिस्थिती बद्दल कधीही न्यूनगंड निर्माण झाला नाही वार लावून जेवणे मन लावून अभ्यास करणे सुरू झाले. पहाटे गंगातीरी जाणे आपले कपडे तिथेच धूवून वाळवून तेच घालून येणे असा दिनक्रम सुरू झाला.

 इथेच त्याला त्याच्यासारखाच गरीब परिस्थिती असलेला मित्र भेटला. तो ही एकटाच एका गरीब वस्तीत खोली घेऊन राहत होता. त्याच्याजवळ सायकल होती ,हा कधी कधी त्याच्या सायकल वर डबल सीट बसून येत असे. एकदा त्याच्या खोलीजवळ आल्यावर हा म्हणाला "मला पाणी दे प्यायला" तो मुलगा कावराबावरा झाला, आणि रडू लागला "मी तुला पाणी देऊ शकत नाही मी हरिजन आहे "या मुलाने त्याला जवळ घेतले त्याचे डोळे पुसले; त्याच्या माठातील पाणी प्यायले ही मैत्री दोघांनी शेवटपर्यंत जपली. तो मुलगा होता "जगजीवन राम " जे भारताच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवून गेले. भारताचे गृहमंत्री जगजीवन राम.

कॉलेजच्या बीए च्या शेवटच्या वर्षाला असताना कॉलेजमध्ये एक नाटक बसविण्यात आले या नाटकासाठी न्यायाधीश घालतात तसे दोन काळे डगले हवे होते जे प्राचार्यांकडे होते .ते त्यांच्या घरी जाऊन आणण्याची जबाबदारी याच्यावर सोपविण्यात आली .

विद्यापीठाच्या आवारात प्राचार्यांचा आलिशान बंगला होता.' प्राचार्य पुणतांबेकर 'हे त्या काळातील शिक्षण क्षेत्रातील एक मोठे नाव, हा आवारात शिरला आणि त्याने दाराची कडी वाजवली .दार उघडले गेले एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी दारात उभी होती त्यानेच आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे "ती पाहताच बाला कलिजा खलास झाला " त्याच क्षणी मनात पक्के झाले की "लग्न करीन तर हिच्याशीच"

 विरलेला शर्ट जुनाट धोतर, ऐश्वर्याचं कोणतही चिन्ह चेहऱ्यावर नाही पण प्रचंड आत्मविश्वास ते डगले तो घेऊन आला पण रात्रभर जागाच राहिला मात्र त्याची मन:स्थिती अजिबात दोलायमान झाली नाही, काय करू काय नको असे त्याला अजिबात वाटले नाही .दुसऱ्या दिवशी प्राचार्यांच्या केबिन मध्ये जाऊन हजर झाला. सरांच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणाला, "सर मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे "सर अवाक् झाले पण शांतपणे त्याच्याकडे पहात राहिले त्यांनी शिपाई बोलावून त्याला हाकलून लावले नाही, किंवा त्याच्या गरिबीचा उपहास केला नाही किंवा महाविद्यालयातून त्याला बेदखल केले नाही. त्याच्या भावनांचा आदर करून ते म्हणाले "माझे ठरलेले आहे की माझा जावई कलेक्टर असेल" हा म्हणाला "सर मला फक्त दोन वर्ष द्या" सर कबूल झाले .बीए उत्तम गुणांनी पास करून जिद्दीने अभ्यास करून हा तरुण आयसीएस झाला. हैदराबाद संस्थानात कलेक्टर म्हणून रुजू झाला. 

प्राचार्य पुणतांबेकर यांनी थाटात आपल्या लेकीचे याच्या बरोबर लग्न लावून दिले .हत्तीवरून वरात काढली .

हा मुलगा म्हणजे प्रसिद्ध इतिहासकार लेखक समीक्षक 'कै. सेतुमाधवराव पगडी' होत. "जीवन सेतू "या त्यांच्या आत्मचरित्रात  अचंबित करणारी अलौकिक अशा एकतर्फी प्रेमाची अनुभूती देणारी सुंदर सत्यकथा आहे. 

  ©️ 

उर्मिला नाईकनिंबाळकर

14/02/2021

 -------------------------------------------

*महादेवाचा नंदी मंदिराच्या बाहेर*का बसलेला असतो ?*

*दोन कथा नंदीबद्दल सांगितल्या आहेत.* 

*पहिली कथा शिलाद मुनींची आणि दुसरी समुद्र मंथनाची.*


शिलाद मुनी आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करत होते किंतु एक वेळेस त्यांना अचानक मनात विचार आलेत की ह्यामुळे माझे वंश राहणारच नाही. म्हणुन त्यांनी इंद्रांकडून पुत्र मागितला. परंतु इंद्र त्यांची ही पुत्रप्राप्तीची इच्छा पुर्ण करू शकत नव्हते. इंद्रांनी, शिलाद मुनींना सांगितले की तुम्ही शंकराची आराधना करा, तुमची इच्छा ते पुर्ण करतील.

शिलाद मुनींनी तपश्चर्या करून शंकर भगवान ह्यांना प्रसन्न केले आणि पुत्रप्राप्तीची आपली इच्छा सांगुन दाखवली. तुमची इच्छा नक्कीच पुर्ण होईल असं महादेवाने सांगितले.

एके दिवशी आपल्या आवारात चालत असतांना त्यांना वाटेत एक गोर गोमटं बाळ सापडलं. ते जेव्हा त्याच्याजवळ गेलेत तेव्हा आकाशवाणी झाली की, "ह्याचे संगोपण करं. हा मुलगा तुझं आयुष्य सुख-समृद्धीने भरून देईल". शिलाद मुनींनी ह्या मुलाचे नाव नंदी ठेवले. नंदी अर्थात नंद, नंदु, आनंद असा होतो.

नंदी अभ्यासात आणि इतर विद्या शिकण्यात खुप तरबेज होता शिवाय तो अत्यंत आज्ञाकारी होता. एके दिवशी शिलाद मुनींच्या आश्रमात दोन साधु आलेत शिलाद मुनींनी त्यांची राहायची आणि सेवा करायची जबाबदारी नंदीकडे दिली जी त्याने एकदम व्यवस्थितपणे पार पाडली. जातांना त्या दोन्ही साधुंनी शिलाद मुनींना "शतायुषी भवः" असा आशिर्वाद दिला परंतु नंदीला आर्शिवाद देतांना ते थोडे कचरले.

ते सगळं शिलाद मुनींनी पाहिले. जेव्हा साधु बाहेर निघत होते तेव्हा नंदीपासुन लपुन छपून त्यांनी त्या दोघांना आपली शंका विचारली. त्यावर ते साधु म्हणाले की, आम्ही नंदीला शतायुषीचा आशिर्वाद नाही देऊ शकत कारण त्याच आयुष्य कमी आहे. हे एकून शिलाद मुनींना रडू कोसळले. इकडे ते नंदीने ते चटकन ओळखले आणि त्यांना विचारले की झाले काय? बराच वेळ सावरून झाल्यावर शिलाद मुनी घडलेलं सगळं नंदीला सांगतात.

आपले आयुष्य कमी आहे हे ऐकून काळजी करण्यापेक्षा नंदी जोर जोरात हसतो. शिलाद मुनींना हे पाहून आश्चर्य वाटते. नंदी म्हणतो की, तुम्हाला साक्षात महादेवांनी दर्शन दिले होते ना? मग मी पण त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आयुष्य मागतो असं म्हणुन नंदी महादेवाची उपासना करायला बसतो.

नंदी हुशार असल्यामुळे महादेव लगेच प्रसन्न होतात. त्यांचे ते विराट रूप पाहून नंदी भारावून जातो आणि त्याची काहीच न मागण्याची इच्छा होते. तरी नियमानुसार त्याला मागावे लागणार असते. म्हणुन नंदी म्हणतो की "मला तुमच्याजवळ राहायचं आहे ते पण कायम". हे ऐकून महादेव त्याला म्हणतात की, "माझ्याकडे असलेला बैल मरण पावला आहे, तु त्याच्या जागेवर आजपासून राहशील. तु माझे वाहन बनशील आणि समस्त गणांचा मुख्य ही तुच राहशील." तेव्हा पासुन नंदी बैलाच्या रूपात महादेव जवळच असतो.

*दुसरी कथा*

समुद्रमंथानाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर आले होते जे समस्त सृष्टीसाठी घातक होते. त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग होता ते म्हणजे कोणीतरी ते प्राशन करायला हवे. सगळ्या देवांनी तेव्हा हे काम फक्त महादेवच करू शकतात असा विचार करून त्यांना विषप्राशानाची विनंती केली होती. महादेवांनी हलाहल विष पिल्यानंतर त्यांच्या गळा निळसर पडला आणि त्यांना जळजळ व्हायला लागली. म्हणुन त्यांना निळकंठ किंवा विषकंठ असं म्हटले जाते.


महादेव ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करत परंतु त्यांच्या गळ्यात होणाऱ्या जळजळ मुळे ते ध्यान करू शकत नव्हते. त्यावेळेस नंदी त्यांच्यासमोर बसून त्यांच्या गळ्याला फुंकर घालु लागला ज्यामुळे महादेव ह्यांच्या गळ्यात होणारी जळजळ थांबली. तेव्हापासून महादेवाची ध्यानस्थ समाधी तुटू नये म्हणुन नंदी त्यांच्यासमोर असतो आणि फुंकर घालत असतो अशी कथा आहे..

माहिती संदर्भ :- आंतरजाल

-----------------------------------------------

*संकलन :- सतीश अलोणी @*

------------------------------------------------


 



 

 *निःशुल्क*

यदि कोई हिन्दू भाई, अपने पुत्र को भोपाल गुरुकुल में पढ़ाना चाहते हैं तो 15 मार्च से 15 July 2022 तक आचार्य पाणिग्राहीa चतुर्वेद संस्कृत वेद पाठशाला भोपाल मध्यप्रदेश में साक्षात्कार होगा। "बालक कक्षा-6 उत्तीर्ण होना चाहिये।" गुरुकुल में रहना, खाना-पीना सभी निःशुल रहेगा। और 8000 रुपये प्रति माह छात्रवृत्ति भी दीजायेगी ! बच्चे को चारों वेदों, व्याकरण, साहित्य, अंग्रेजी आदि आधुनिक विषयों की शिक्षा भी दी जाएगी। एवं एक वेद का विशेषज्ञ बनाया जाएगा। आचार्य (M.A.) तक पढ़ाई करने के लिए भी दिशानिर्देशित किया जाएगा । इस मैसेज को अपने सभी हिंदू ग्रुप्स में डाले और अधिक से अधिक अपने सन्तान धर्म के गौरवशाली विद्यायल को बढ़वा देने के लिए हर हिन्दू तक पहुंचाने का प्रयत्न करें।

तुरन्त संपर्क करें !

आचार्य ललित जी 9639490429 , 9058584924 आचार्य जी 9009284924

*ये सन्देश केवल हिन्दू के ही काम का है 

*जय हो सत्य सनातन धर्म की जय हो हमारे शिक्षा विद्या मँदिर गुरुकुल🙏 Please share this 👆 Information with Àll Indian 🇮🇳 People 💐🕉️🧘🌏🎯🕉️🙏

 राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल - दिपक कपूर

महाराष्ट्र चेंबर् ऑफ कॉमर्स बरोबर संयुक्त बैठक संपन्न 

विमानतळांसाठी महाराष्ट्र सरकार मोठा निधी देणार

राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने निवेदनाद्वारे केलेल्या सुचनाबाबतही सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल व राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील विविध शहरांतील विमानतळांचा विकास व नवीन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी चे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांच्या समवेत वर्ल्ड ट्रेड सेन्टर मधील कार्यलयात झालेल्या संयुक्त बैठकित सहभाग घेतला.  

याप्रसंगी प्रास्तविक करताना विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करणे यासाठी महाराष्ट्र चेंबरची सिविल एव्हिएशन समिती संपूर्ण सहयोग असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

चर्चेप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रामुख्याने कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र , कोकण , विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय माल वाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण गतीने पूर्ण करण्याची मागणी केली.

औरंगाबाद विमानतळावरून नवीन रूट सुरू करणे, जळगाव विमानतळावरून विमान सेवा वाढवून मालवाहतूक सेवा सुरु करणे, नाशिक विमानतळावरील सुविधा वाढवणे अश्या विविध मागण्याचा अभ्यास अहवाल सादर करून झपाट्याने वाढणाऱ्या प्रवासी व माल वाहतुकीकरिता जिल्हास्तरावर विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र चेंबरच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण केंद्र उभारून युवकांना विमानसेवेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.

राज्यातील जिल्ह्यांना शहरासाठी जोडण्यासाठी नवीन हवाई मार्ग व विमानसेवा सुरू करण्याच्या सूचना वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी केली. चेंबरच्या सिविल एव्हिएशन समितीचे सुनीत कोठारी यांनी या प्रसंगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनांच्या इंधनाचा मूल्य वर्धित करा मध्ये कपात करून तो १ टक्के करावा असे सुचविले.

*आजच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण घोषणा*

*कोल्हापूर विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकार कडून मंजूर केला जाणार.*

*रत्नागिरी विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकार कडून मंजूर केला जाणार आहे.*

*शिर्डी येथे स्वतंत्र कार्गो टर्मिनल उभारणार*

*अमरावती येथील विमानतळासाठी भारत सरकारकडून ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातल्या ६.५ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच अमरावती विमानतळासाठी महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त २३ कोटी मिळणार असल्याचे दिपक कपूर यांनी सांगितले.*

*नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.*

*पुणे शिर्डी नागपूर विमान सेवा १८ फेब्रुवारी २०२२ पासून अलाइन्स एअर सुरु करणार*

*पुणे औरंगाबाद नागपूर सेवा 1 मार्च पासून सुरू होणार*

याप्रसंगी दिपक कपूर यांनी विमानतळ विकास प्राधिकरनाच्या विविध विकास कामांची माहिती दिली. त्यात प्रामुख्याने कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरनासाठी केलेले प्रयत्न व महाराष्ट्र सरकारने केलेल्या अर्थसहायातून येणाऱ्या तीन ते चार महिन्यात कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी 64 हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली. विमानतळ प्राधिकरण हे लवकरच अमरावती आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील विमानतळाच्या विकास कामाला सुरुवात करणार असून नोव्हेंबर 2022 ला अमरावती विमानतळावरून पहिले उड्डाण करण्याचे उद्धिष्ट असल्याचे दीपक कपूर यांनी सांगितले.

विमानसेवा विस्तारीकरणासाठी सर्व विमान कंपनी व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर येत्या महिन्यात बैठक घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरनाने सुरू केलेल्या शिर्डी व नागपूर मालवाहतूक सेवेला मिळणारा प्रतिसाद व तेथील शेतकऱ्यांना होणारा फायदा याची सविस्तर माहिती दिली.

शिष्टमंडळात वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगवे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सुनीत कोठारी, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे होते.

Featured post

Lakshvedhi