Friday, 26 November 2021

 संविधान दिनी 'महापुरुष डॉ. आंबेडकर' माहितीपटाचे

समाज माध्यमांवर प्रसारण

            मुंबई, दि. 25 : संविधान दिनानिमित्त 'महापुरुष डॉ. आंबेडकर' या दुर्मिळ माहितीपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर उद्या २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता एकाच वेळी प्रसारण करण्यात येणार आहे.

            डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १६ मिनीटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्वाचा ऐतिहासिक दस्ताऐवज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केला आहे.

            या चित्रपटात डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. तर, जी.जी. पाटील यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

            महापुरुष डॉ.आंबेडकर यांची जीवनागाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी तसेच या दुर्मिळ माहितीपटास पाहता यावे यासाठी याचे प्रसारण करण्यात येत असल्याचेही महासंचालनालयामार्फत कळविले आहे.

मुंबई विभागाअंतर्गत महासंचालनालयाच्या

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR या लिंकवर हा माहितीपट पाहता येईल.


०००



 आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आज “महाराष्ट्र दिन”


 


            नवी दिल्ली, 25 : महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या दि.26 नोव्हेंबर रोजी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जाणार आहे. येथील प्रगती मैदानावर 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिना’चे उद्घाटन अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त (महाराष्ट्र सदन) शामलाल गोयल यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय माहिती प्रसारण विभागाचे सचिव अपुर्व चंद्र हे असणार आहेत.


            पिनॅक इव्हेंट्स ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेच्यावतीने ‘महाराष्ट्राची लोककला’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मेळाव्यातील एम्फी थिएटर (हॉल क्रमांक 2 ते 5 जवळ) येथे सांयकाळी 5:30 वाजता होणार आहे.


            भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या अंतर्गत व्यापार मेळाव्याच्या बाराव्या दिवशी शुक्रवारी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गणेश वंदना, भुपाळी, ओवी, भारूड, गोंधळ, गण, गवळण, पोवाडा, शाहिरी, लावणी, कोळी गीत, जागरण, जोगवा असे लोककलेचे विविध प्रकार सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गायक स्वत: गायन करतील आणि त्यावर कलाकार त्यांची-त्यांची कला सादर करतील.


            या सांस्कृतिक कार्यक्रमास येथील दिल्लीकरांनी अधिकाधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांनी केले आहे.


००००



Jai hind


 

 *पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना :*


*THE PERFECT LIFESTYLE"*


हे पाळल्यास तुमच्यापासून आजारपण खूप लांब राहील.... आपण *स्लिम अँड फिट राहाल....*


*कायम तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ....*


1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे *9.30 ते 10.00* ला झोपणे.


2. सकाळी *5.00 -5.30* अगदी *उशिरा 6* बाजता किंवा त्याच्या आत उठणे.


3. ब्रश करायच्या *आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.*


4. 10 मिनिटे *वज्रासनात* बसणे.


5. कमीत कमी फक्त *10 सूर्यनमस्कार* जास्तीत जास्त 25 हळुवारपणे घालणे.


5. फक्त *10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी...5 मिनिटे ओंकार करणे*


6. रोज न चुकता एक *आवळा किंवा आवळ्याचा रस.*


7. *8.00-9.00 वाजता भरपूर नाष्टा* (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)


8. 12.30 ते 1.30 ला थोडे *हलके जेवण.*


9. ऑफिसमध्येच दर *1 तासांनी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.*


10. संध्याकाळी *7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.*


11. कंपल्सरी *15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.*


12. 9 ते 9.30 वाजता *1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 9.30 ते जास्तीत जास्त10.00 ला झोप.*


★ *खबरदारी घ्या...*


*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,* 

किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....

*म्हणजे शंभर पावले चालणे....*


लोकं 5-5 किलोमीटर घाम गाळत चालून येतात रात्री....


* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण *नंतर एक तासाने पाणी पिणे,*


 *पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास, जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.*


* रोज कमीत कमी *3 लिटर पाणी प्यावे.*


* फक्त *सिजनल* फळेच खावीत.


* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि, *कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.*


 * *दररोज डाव्या कुशीवर* झोपावे.


* *सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.*


*एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही* 

आणि

 वर दिलेले सर्वच्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यांसाठीच आहेत.


संकलन व् प्रसारण 

।।क्रीडाभारती पुणे।।


*health शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*


(१) ९०% आजार हे *पोटातून* होतात, पोटात *अॕसिडीटी, कब्ज* नसला पाहिजे, पोट *स्वच्छ, साफ* तो आरोग्याचा *राजा*.


(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.


(३) *१६० प्रकारचे रोग ❌फक्त "मांसाहाराने" होतात हे लक्षात ठेवा.*


(४) ८० प्रकारचे आजार❓❌ *नुसत्या चहा पिण्याने* होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला *विषारी डोस* आहे.


(५) ४८ प्रकाचे रोग *अॕल्युमिनियम भांडी* वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत.


(६) तसेच *दारू, कोल्ड्रिंक, चहा* याच्या अति सेवनाने *हदय रोग* होऊ शकतो.


(७) *मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे "सडते."*


(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये, यामुळे *पाचनशक्ती मंद होते,* शरीर *कमजोर* होते.


(९) *केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.*


(१०) *गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते.*


 गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये, *डोळे कमजोर* होतात.


(११) स्नान करताना कधीही *पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका.* कारण, *पॅरालिसिसचा, हदयाचा अॕटक* येऊ शकतो. प्रथम *पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर,* पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे, नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.


(१२) *उभ्याने कधीही पाणी पिऊ नये..* टाच कायमची दुखु लागते.


(१३) जेवताना वरुन कधीही *मीठ घेऊ नये.* त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.


(१४) कधीही *जोराने शिंकू नये,* नाही तर कानाला त्रास होऊ शकतो.


(१५) रोज सकाळी *तुळशीचे पाने* खावीत, कधीच *सर्दी, ताप, मलेरिया* होणार नाही.


(१६) जेवणानंतर रोज *जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॕसिडिटी होत नाही.*


(१७) सतत कफ होत असेल, तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.


(१८) नेहमी पाणी *ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले,* *बाटलीबंद, फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत* त्रास होतो.


(१९) पाण्याने होणारे रोग *यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग* या पासून *लिंबू* आपल्याला वाचवते.


(२०) *गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.*


(२२) *स्वयंपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा, नाही तर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.*


(२३) *मातीच्या भांडयात* स्वयंपाक केल्यास *१००%* पोषक, काशाच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९७% पोषक, पितळेच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९३% पोषक, *अॕल्युमिनियमच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते.*


(२४) *गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.*


(२५) *१४ वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नयेत.*


 (२६) खाण्यास *सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ* 

त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण, हे मीठ फार *विषारी* असते.


(२७) भाजलेल्या ठिकाणी *बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी*, यातील काही लावले, तर थंड वाटते व व्रण पडत नाही


(२८) *पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.*


(२९) *खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.*


(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच *हळद* लावा.


(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल, तेव्हा दात घासू नये.


(३२) *फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते.* पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.


(३३) *सकाळचे भोजन राजकुमारा सारखे* तर *दुपारचे भोजन राजासारखे* आणि *रात्रीचे भोजन भिकाऱ्या सारखे असावे*

 *जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.*


 *आपलं जीवन म्हणजे अनमोल ठेवा आहे. त्याचा उत्तम सांभाळ करूया.*  


*जनहितार्थ*

Thursday, 25 November 2021

 धर्मादाय रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना

उत्तम आरोग्य सेवेसाठी समिती प्रयत्नशील

- विधि व न्याय राज्यमंत्री तथा समिती प्रमुख आदिती तटकरे

जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याबाबत

समिती सदस्यांच्या धर्मादाय कार्यालयास सूचना

            मुंबई, दि. 25 : तदर्थ संयुक्त समितीच्या सूचनेनुसार धर्मादाय खाजगी रूग्णालयांमध्ये समिती सदस्यांची नावे, उपलब्ध बेडसंख्या, योजनेची माहिती रुग्णालयांच्या प्रवेशद्वारी दर्शनी भागात लावण्यात आली आहे. यामुळे योजनेंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील रूग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होत आहे. जास्तीत-जास्त गरीब रूग्णांना वैद्यकिय सहाय्य मिळण्याच्या दृष्टीने समिती सकारात्मक कार्यवाही करीत असल्याचे विधि व न्याय राज्यमंत्री तथा समिती प्रमुख कु. आदिती तटकरे यांनी सांगितले.

                        या बैठकीस आमदार ॲड.अशोक पवार, आमदार बालाजी किणीकर, आमदार अजय चौधरी, आमदार बबनराव शिंदे, आमदार राजू पारवे, आमदार राहूल कुल, आमदार अबू आझमी आदी समिती सदस्य तसेच विधान मंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे, सह धर्मादाय आयुक्त आर.यू. मालवणकर, सह धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई नि. सु. पवार, धर्मादाय उपायुक्त एस.एन. रोकडे, सह संचालक आरोग्य सेवा मुंबई डॉ. उल्हास मारुलकर आदी यावेळी उपस्थित होते.

            धर्मादाय खाजगी रुग्णालयात आर्थिक दृष्ट्या दृबल घटकांना वैद्यकिय सेवा देण्याबाबत तपासणी करण्यासंदर्भात तदर्थ समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. याबैठकीत समितीच्या प्रमुख राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी कामाचा आढावा घेतला.

            उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार धर्मादाय खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी त्या रुग्णालयास मिळणाऱ्या दरमहा एकूण मिळकतीच्या 2 टक्के रक्कम निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयास या समिती सदस्यांमार्फत वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. त्यानुसार या योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांनी पात्र रुग्णांस आरोग्य सेवा दिल्याचा तपशिलवार अहवाल, रुग्णालयाचा लेखापरिक्षण अहवाल समितीस वेळोवेळी सादर करणे, रुग्णालयातील मेडीकल तथा बाह्य रुग्ण विभागामार्फत होणारे उत्पन्न रुग्णालयाच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट असणे, समितीच्या विविध मागण्या व आवश्यकतांनुसार आरोग्य मंत्री यांचेसमवेत समितीची बैठक आयोजित करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

            यावेळी उपस्थित समिती सदस्यांनी धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड व रेशन कार्ड याखेरीज अन्य प्रकारे उत्पन्नाची पडताळणी करण्यात येत असल्याबाबत माहिती बैठकीत समोर मांडली. योजनेंतर्गत खर्च केलेली रक्कम व शिल्लक रक्कम, पात्र उमेदवारांना सहज या योजनेंतर्गत आरोग्य सुविधा मिळाव्या. त्यासाठी समितीसदस्यांनी या रुग्णालयांना भेटी देणे आदी सूक्ष्म नियोजनातून जास्तीत- जास्त रुग्णांना याचा लाभ देण्यासाठी धर्मादाय कार्यालयामार्फत रुग्णालयांना सूचित करण्यात यावे, असे मत मांडले.

            धर्मादाय अंतर्गत गरजू रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागीय स्तरावर समितीची स्थापना करण्यात यावी. त्या समितीमध्ये समन्वयासाठी अनुभवी डॉक्टरांचा समावेश असावा. तसेच सरकारी रुग्णालयांनी या योजनेंतर्गत वैद्यकीय सेवा देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव समितीमार्फत देण्यात येईल. तसेच आरोग्य मंत्री यांच्या समवेत समितीच्या विविध विषयांवर आधारित बैठकीचे आयोजन करण्यात लवकरच करण्यात येईल, असे विधि व न्याय राज्यमंत्री तथा समितीप्रमुख कु. तटकरे म्हणाल्या.




 राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार


- प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड


            मुंबई, दि. 25 : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिली.


            कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते. कोविड-19 चा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवीपासून तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन सुरक्षितपणे शाळा सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे प्रा.गायकवाड यांनी म्हटले आहे.


            टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यातील हा तिसरा टप्पा आहे. या कालावधीत सुरक्षित वातावरणात शिक्षण सुरू राहण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शाळा आणि शिक्षकांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर यापुढेही कोविड-19 संदर्भातील दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. काही विद्यार्थी पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येतील, त्यांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे ही आपली प्राथमिकता असेल, असे त्या म्हणाल्या. याबाबत सातत्याने मार्गदर्शक सूचना करणाऱ्या टास्क फोर्सचेही शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी आभार व्यक्त केले आहेत.


०००००

 



 गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश


 


            मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातून येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.


            गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव संजय सक्सेना, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, सहसचिव दौलत देसाई, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            राज्यामध्ये सन २०१२ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू,सुपारी व इतर पदार्थांच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते आहे. परंतु परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा अवैध पद्धतीने राज्यात आणला जातो तसेच वितरण आणि विक्री केली जाते. यासाठी अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवावी. तसेच पोलीस यंत्रणांनी या सर्व अन्नपदार्थांची उत्पादन, विक्री, साठवणूक, वितरण व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध अधिक दक्ष राहून प्रभावीपणे कारवाई करावी. याबरोबरच प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश श्री वळसे पाटील यांनी यावेळी दिले.


            अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.शिंगणे यांनी इतर राज्यातून आपल्या राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमाक्षेत्रात खबऱ्यांचे जाळे मजबूत करावे, तसेच पोलीस यंत्रणांनी यापूर्वी दाखल तक्रारींवर कठोर कारवाई करावी यामुळे संबंधितावर वचक निर्माण होईल असे सांगितले.


००००


‘मिशन वात्सल्य’ मिशन मोडवर राबवा


महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर


           


            मुंबई, दि. 25 : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ हे मिशन आम्ही हाती घेतले आहे.‘मिशन वात्सल्य’ ही योजना राज्यात मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.


               मिशन वात्सल्यबाबत आढावा बैठक महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या आढावा बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त, महिला व बालविकास राहूल मोरे, एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल, सर्व विभागीय महसूल आयुक्त उपस्थित होते.


                महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, या वात्सल्य समितीमार्फत सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणामध्ये शासकीय योजनांची माहिती घेणारा नमुना विकसित करून सर्व तालुक्यातील विधवा महिलांचे सर्वेक्षण करून घ्यावे. या महिलांच्या कुटुंबांना भेटी दिल्याशिवाय त्यांचे प्रश्न समजणार नाहीत. यासाठी प्रत्येक तालुक्यातील वात्सल्य समितीच्या सदस्यांनी त्या तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गट करून घरोघरी भेटी द्याव्या. त्यातून त्यांचे प्रश्न समजू शकतील .याबाबत सर्व जिल्ह्यांनी नियोजन करायला हवे.


         मिशन वात्सल्यबाबत विभागीय स्तरावर महिन्यातून एकदा, जिल्हास्तरावर महिन्यातून दोनदा व तालुकास्तरावर आठवड्यातून एक बैठक घेण्यात यावी. या सर्व बैठकीचा आढावा आयुक्त महिला व बालविकास यांना पाठवावा. या मिशनच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीने समन्वयाने काम करावे. प्रत्येक जिल्ह्यांनी मिशन वात्सल्य च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनांची महिती पुस्तिका तयार करावी व ती महिलापर्यंत पोहचवावी. विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे मिशन आपण सर्वजण मिळून पूर्ण करू, असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.


         

Featured post

Lakshvedhi