Friday, 30 July 2021

 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती

विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            मुंबई,  दि. 30 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरीता वैयक्तीक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सूरू झाल्या असून, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

            महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. 18 ते 50 वर्ष वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गरजू व्यक्तींनी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अधिक माहितीकरीता गृहनिर्माण भवनखो.क्र.३३कलानगरबांद्रा (पू)मुंबई. दुरध्वनी क्रमांक २५४२८९०७ येथे संपर्क साधावाअसे आवाहन  अरुण माने जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मुंबई शहर व उपनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००

 

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 30 : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांकरीता बीज भांडवल योजनावैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनागट कर्ज व्याज परतावा योजना व थेट कर्ज योजना (महामंडळ) सुरू असून मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

            महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. १८ ते ५० वर्षे वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गरजू व्यक्तीनी महामंडळाच्या www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेतस्थळावर करावाअसे आवाहन जिल्हा व्यवस्थापकशामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. मुंबई शहर व उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००


 

एनएसएफडीसी योजनेअंतर्गत स्माईल योजना

 

              मुंबईदि. 30 : कोरोना विषाणुच्या महामारीमध्ये अनुसूचित जातीमधील ज्या कुटुंबप्रमुखाचे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निधन झाले आहे. अशा कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार देण्याकरिता एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत ‘स्माईल योजना’ राबविण्याचे विचाराधीन असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            अनुसूचित जातीतील 18 ते 60 या वयोगटात असलेल्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 मुळे मृत्यु झाला आहे. अशा कुटुंबाचे पुर्नवसन करण्यासाठी माहिती एकत्रित करण्यात येत आहे. यासाठी संबंधितांनी https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या लिंकवर अर्ज भरावा. या योजनेची अधिक माहिती www.mahatmaphulecorporation.com  या संकेतस्थळावर नोटीस सेक्शन मध्ये मिळेल.

            या योजनेला अधिकाधिक कुटुंबांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे

 कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा

पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू

- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

 

·       नृसिंहवाडी व शिरोळ येथील पूरग्रस्तांशी साधला संवाद

·       पद्माराजे हायस्कूल येथील पूरग्रस्त निवारा केंद्राची केली पाहणी

 

            कोल्हापूर दि 30 (जि.मा.का) : कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावायेथील पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावूपूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईलअसे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दिले.

            मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफपालकमंत्री सतेज पाटीलआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकरखासदार संजय मंडलिकखासदार धैर्यशील मानेमुख्य सचिव सिताराम कुंटेराज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागरजिल्हाधिकारी राहूल रेखावरमनपा आयुक्त डॉ .कांदबरी बलकवडेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाणपोलीस अधिक्षक शैलेश बलकवडेशिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,  माजी आमदार उल्हास पाटीलमाजी आमदार डॉ. सुजित मिणचेकरमाजी आमदार सत्यजित पाटीलआदी मान्यवर उपस्थित होते.

            नृसिंहवाडी तिर्थ क्षेत्र येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्त स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. तसेच पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथील निवारा केंद्रास भेट देऊन संवाद साधला. नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी सन 2019 चा पूरसध्या सुरु असलेली कोरोनाची परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावीअशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिकव्यापारीदेवस्थानचे पदाधिकारी यांनी केली.

0000


 आजच्या महामारी च्या काळात मनुष्य विसरत चाललाय त्यासाठी आठवण करुन देतोय               *चढता सूरज धीरे धीरे...*


आज ज्या गाण्याबद्दल लिहिणार आहे ती एक कव्वाली आहे. साधारणतः १९७० च्या दशकात लिहिली गेलेली आणि गायली गेलेली. पण आज सुद्धा ती ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. *शायर कैसर रत्नागिरवी यांचे शब्द आणि मशहूर कव्वाल अझीझ नाझा* *यांची गायकी* यांचा सुरेल संगम या कव्वाली मध्ये दिसून येतो. तसे पाहिले तर कव्वाली हा इस्लामिक गायन प्रकार. त्याची भाषाही उर्दू; पण तरीही *भाषेच्या, धर्माच्या भिंती तोडून कव्वालीने भारतीय मनावर पकड मिळवलेली आहे*. कव्वाली म्हटले की माझ्या डोळ्यासमोर येतो तो श्रीरामपूर गावातील सय्यदबाबांचा उरूस. ३ दिवस चालणाऱ्या या उरुसात एक दिवस कव्वालींचा कार्यक्रम असतो. अनेक ठिकाणचे कव्वाल इथे येवून आपापल्या कव्वाल्या सादर करतात. त्या प्रत्यक्ष ऐकणे हा एक खूप छान अनुभव असतो. अशाच उरुसामधून मला कव्वालीची ओळख झाली. तसे चित्रपटातही अनेक कव्वाली हिट झाल्या आहेतच. एक विशिष्ट आवाज, एक विशिष्ट चाल, एक विशिष्ट गायनाची पद्धत म्हणून कव्वालीचा उल्लेख करता येईल. बऱ्याचश्या कव्वाल्या जरी अल्लाहचे गुणगान करणाऱ्या असल्या तरी त्यात काही प्रमाणात विविधताही आढळते. उदा. “झूम बराबर झूम शराबी” ही कव्वाली दारू बद्दल आहे किंवा “ये माना मेरी जां मुहब्बत सजा है” ही कव्वाली प्रियकराचे भाव उत्कटतेने सादर करताना दिसते तर “यारी है इमान मेरा” या कव्वालीत मित्रप्रेम दिसते.


मी निवडलेल्या कव्वालीत मात्र आपल्या जीवनाचे सार सांगितले गेले आहे. म्हणजे माणूस आपल्या काहीश्या यशाने खूप अहंकारी बनतो. इतरांना तुच्छ लेखायला लागतो पण तरीही ते काही शाश्वत नाही. कधी ना कधी त्याचा अंत हा ठरलेलाच. पृथ्वीवर जो जन्माला येतो त्याला एक दिवस इथून जावेच लागते आणि जसे तो येताना काही घेवून येत नाही तसेच जातानाही काहीच नेत नाही. हाचं भावार्थ या कव्वालीत आहे. आता डायरेक्ट मूळ पदावरच येतो... मी निवडलेली कव्वाली आहे “चढता सुरज” ही. आतापर्यंत मी ही कव्वाली अनेकदा ऐकली आहे पण तरीही परत परत ऐकताना कुठेही बोर वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे त्याची चाल. माणूस आधी चाल ऐकतो आणि नंतर शब्द. जर शब्द कितीही चांगले असले पण चाल व्यवस्थित नसेल तर ते पाहिजे तितके परिणामकारक होत नाहीत. असो... 


सुरुवातीलाच जो शेर आला आहे त्यातच खरं तर सगळा अर्थ शायरने सांगून टाकला आहे. 


*हुये नामवर बेनिशाँ कैसे-कैसे !*

*जमीं खा गई, नौजवान कैसे-कैसे !*

*आज जवानी पर इतराने वाले, कल पछताएगा,*

*चढता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जायेगा ॥* 


कितीही मोठे नांव असले, कितीही कीर्ती मिळवली आणि कितीही सत्ता, पैसा, ताकद मिळवली तरीही शेवटी एक दिवस त्यातील काहीच राहत नाही आणि नंतर तर लोकं त्याचे नांवही लक्षात ठेवत नाहीत हेच पहिल्या ओळीत शायरने सुचवले आहे. आता पर्यंत अनेक राजे, महाराजे या पृथ्वीतलावर होऊन गेले पण त्यांच्या मृत्युनंतर आज जर कुणाला त्यांच्याबद्दल विचारले तर कित्येकांना त्यांचे कर्तुत्वचं काय पण नांवही माहित नाही. आणि म्हणून शायर आधीच आपल्याला सावध करत आहे की बाबारे... जरी आज तू तरुण आहेस, बलवान आहेस, धनवान आहेस तरी त्याचा गर्व करू नकोस... नाहीतर उदया तुला पश्चताप करावा लागेल यात संशय नाही. दुनियेची ही रीतच आहे की दिवसा उगावणारा सूर्य देखील संध्याकाळी मावळतोचं. 


*तू यहां मुसाफ़िर है, ये सरा-ए-फ़ानी है,*

*चार रोज़ की मेहमां तेरी जिंदगानी है,*

*ज़र, जमीं, ज़ेवर कुछ न साथ जायेगा ,*

*खाली हाथ आया हैं, खाली हाथ जायेगा ।*

*जान कर भी अनजाना बन रहा है दीवाने ,*

*अपनी उम्र-ए-फ़ानी पर तन रहा है दीवाने ।*

*इस कदर तू खोया है, इस जहां के मेले में,*

*तू खुदा को भूला है, फ़ंस के इस झमेले में ।*


अरे तू इथे फक्त एक यात्रेकरू आहेस. हा मृत्युलोक आहे आणि इथे माणसाचे जीवन हे फक्त काही दिवसांचेचं असते. इथे तुला कितीही लोकं मिळू दे, जमीन मिळू दे, धनदौलत मिळू दे... यातील काहीच शेवटी तुझ्याबरोबर येणार नाही. तू जसा येताना रिकाम्या हाताने आलास तसाच रिकाम्या हाताने जाणार आहेस. हे सगळे तुला माहित नाही असे नाही, पण तरीही हे सगळे तू मान्य करायला तयार होत नाहीयेस. आणि आजची भोवतालची परिस्थिती पाहून वृथा अभिमान करतो आहेस. बरे या सगळ्यात तू इतका गुरफटून गेला आहेस की तुला या सगळ्यांपुढे ईश्वराच्या अस्तित्वाचेही स्मरण राहिले नाही.


*आज तक तो देखा है, पाने वाला खोता है,*

*ज़िंदगी को जो समझा ज़िंदगी पे रोता है,*

*मिटने वाली दुनिया का ऐतबार करता है*,

*क्या समझ के तू आखिर इस से प्यार करता है ?*

*अपनी-अपनी फ़िक्रों में जो भी है, वोह उलझा है,*

*ज़िंदगी हकीकत में क्या है, कौन समझा है ?*

*आज समझलें, कल यह मौका, हाथ न तेरे आयेगा,*

*ओह गफ़लत की नींद में सोने वाले, धोखा खायेगा ।*


आज पर्यत पहात आलो आहे की जो एखादी गोष्ट मिळवतो त्याला एक दिवस ती गमवावी लागतेच. ज्याला ही गोष्ट समजली त्याला जीवनाचे काहीच मोल राहत नाही; आणि मग तो परत या जीवन मृत्यूच्या फेऱ्यात अडकू नये यासाठी प्रयत्नशील होतो. अरे एक दिवस तर या पृथ्वीचेही अस्तित्व संपणार आहे मग असा कोणता विचार करून तू या मोहात अडकतो आहेस? जो तो आपापल्या भविष्याच्या चिंतेत अडकलेला आहे, त्यामुळे हे जीवन काय आहे हे तरी कुणाला कुठे नीटसे उमगले आहे? त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. आजूनही यांवर विचार कर. कारण हे संधी हुकली तर परत तू तुझ्या नेहमीच्या चिंतांमध्ये अडकल्यावर परत संधी मिळेलच याची शाश्वती नाही. अजूनही बेसावधपणे झोपून वेळ दवडू नकोस. नाहीतर तुला सावरण्याचाही वेळ मिळणार नाही... 


*मौत ने जमाने को क्या समां दिखा डाला,*

*कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला ।*

*याद रख उस सिकंदर के हौसले तो आली थे,*

*जब गया था दुनिया से, दोनो हाथ खाली थे ।*

*अब ना वोह हलाकू है, और ना उसके साथी है*,

*जंग-जु ना पौरस और ना उसके हाथी है ।*

*कल जो तनके चलते थे, अपनी शानों शौकत पर,*

*शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर ।*


मृत्यू ने आता पर्यंत अनेक लोकांचा अंत केला आहे. ज्यावेळेस सिकंदर पृथ्वी जिंकण्यास आला त्यावेळेस त्याच्यात हिम्मत, जुझारुपणा याची काहीच कमी नव्हती, पण ज्यावेळेस त्याचा अंत झाला त्यावेळेस मात्र त्याने जिंकलेल्या गोष्टींपैकी कोणतीच गोष्ट त्याला बरोबर नेता आली नाही. आता तो दुष्ट आणि सगळ्यांचा कर्दनकाळ ठरणारा हलाकू आणि त्याचे साथीदार राहिले नाहीत की शूर लढवय्या पौरस ही राहिला नाही. त्यांची धनदौलतही राहिली नाही. पूर्वी हे जे राजे महाराजे अगदी आढ्यतेने चालायचे आज त्यांच्या कबरीवर साधा दिवाही तेवत नाही. 


*अदना हो या आला हो , सबको लौट जाना है,*

*मुफ़्लिस-ओ-तवंगर का कब्र ही ठिकाना है ।*

*जैसी करनी-वैसी भरनी, आज किया कल पायेगा,*

*सर उठा कर चलने वाले, एक दिन ठोकर खायेगा ।* 


लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकालाच एक दिवस जायचे आहे, सगळ्यांचे शेवटचे ठिकाण हे पंचतत्वात विलीनीकरण हेच तर आहे. तुम्ही जसे कराल, जे पेराल तेच नंतर उगवणार आहे. फक्त तोंड वर करून चालत राहिलात तर ठेच ही लागणारच... त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही हेच शायर जीव तोडून सांगतो आहे.


*मौत सबको आनी है, कौन उससे छूटा है,*

*तू फ़नाह नहीं होगा, ये खयाल झूठा है ।*

*सांस टूटते ही सब रिश्ते टूट जायेंगे,*

*बाप, मां, बहेन, बिवी, बच्चे छूट जायेंगे ।*

*तेरे जितने भाई है, वक्त का चलन देंगे,*

*छीन कर तेरी दौलत, दो ही गज कफ़न देंगे ।*

*जिन को अपना कहता है, कब यह तेरे साथी है ?*

*कब्र है तेरी मंजिल और यह बाराती है ।* 


मृत्यू हा तर सगळ्यांनाच येणार आहे. त्यापासून आज पर्यंत कुणीच सुटलेले नाहीत. जर तुला असे वाटत असेल की तू त्यापासून वाचू शकतोस तर हे पूर्णपणे चूक आहे. एकदा का आत्मा शरीरातून निघून गेला की मग त्या शरीराचे कोणतेच नाते राहत नाहीत. आईवडील असो वा भावंड किंवा बायको मुलं सगळेच दूर होतात. ज्यांना तुम्ही भाऊ म्हणतात तेही इतरांसारखेच बनतात आणि जी काही धनदौलत तुम्ही कमावली आहे ती तर घेऊन टाकतातच, पण त्याच्या बदल्यात आपल्याला फक्त काही मीटरचे कफन देतात. ज्यांना तू स्वतःचे मित्र, परिवार म्हणतो आहेस हे फक्त तेवढ्या पुरतेच आहेत. बाकी ज्या वेळेस तुझा मृत्यू होईल त्यावेळेस फक्त तुला जायचे आहे आणि हे सगळे लोकं फक्त काही पावले बरोबर असतील आणि नंतर आपापल्या मार्गाने निघूनही जातील.


*लाके कब्र में तुझको मुर्दा-पाक डालेंगे,*

*अपनेही हाथों से तेरे मुंह में खाक डालेंगे ।*

*तेरी सारी उल्फ़त को खाक में मिला देंगे* ,

*तेरे चाहने वाले कल तुझे भुला देंगे ।*

*इसलिए ये कहता हूं, खूब सोचलें दिलमें,*

*क्यूं फ़सायें बैठा है, अपनी जान मुश्किल में ?*

*कर गुनाहों से तौबा, आगे वक्त संभल जाए* 

*दम का क्या भरोसा है, जाने कब निकल जाए ।*

*मुठ्ठी बांध के आने वाले... हाथ पसारे जाएगा ।*

*धन-दौलत-जागीर से तुने क्या पाया है, क्या पायेगा ?* 


जे तुझे पार्थिव असेल ते कबरीत टाकून त्यावरच स्वतःच्या हाताने माती टाकणारे हे लोकं नंतर काही दिवसातच तुला पूर्णतः विसरून जातील. आणि यांनाच तू आपले सगेसोयरे म्हणतो आहेस? म्हणून परत एकदा सांगतो... विचार कर... नीट विचार कर... आज जर तू तुझं वर्तन सुधारलं तर उदया तू जेंव्हा देवाच्या दरबारात उभा राहशील त्यावेळेस तुला त्रास होणार नाही. त्यासाठी आजपासूनच त्याची सुरुवात कर... काय माहित उदया कसा येईल? शेवटी तुला मोकळ्या हातानेच जायचे आहे. पैशाने या गोष्टी विकत घेता येत नाहीत. त्यासाठी सद्वर्तनचं महत्वाचे आणि गरजेचे असते. 


खरं तर या कव्वाली मध्ये प्रत्येकाच्या जीवनाचे सारचं दिलेले आहे. जर तुम्ही मरताना काहीच नेऊ शकणार नसाल, तर मग हा सगळा खटाटोप कशासाठी? पण नेमका माणूस हेच विसरून जातो. पैशाच्या आणि संपत्तीच्या मोहात अनेक अनैतिक गोष्टी करतो आणि स्वतःचा शेवट वाईट करून घेतो. असे म्हणतात की माणूस मेल्यावर त्याच्या कर्तुत्वाने जिवंत राहतो पण त्यासाठी त्याने चांगले वर्तन केले पाहिजे. हाच सुंदर संदेश ही कव्वाली आपल्याला देते. जर याप्रमाणे प्रत्येकाने आपले वर्तन सुधारले तर ही पृथ्वी मृत्युलोक न राहता स्वर्ग बनेल.

Thursday, 29 July 2021

 ऊर्जा विभागात स्थापन करणार ‘आपत्ती व्यवस्थापन’ विभाग

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची चिपळूण दौऱ्यात घोषणा

            रत्नागिरीदि. 29 : महावितरणमहापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली.

            गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीनिसर्ग व तौक्ते  चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचे खूप नुकसान झाले आहे. उघड्यावर वीज यंत्रणा असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटाचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागतो. यावर  उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.

            कोकणात वारंवार नैसर्गिक संकटे येत असल्याने तेथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यासाठी पंतप्रधान यांना विनंती करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याचे डॉ. राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

            रत्नागिरी जिल्ह्यात दि. 22 जुलै रोजी झालेल्या  ढगफुटी व अतिवृष्टीमुळे मुख्यत: चिपळूणखेडसंगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना पूर आल्याने महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश महावितरणला दिले.

            चिपळूण येथे पुरामुळे नागरिकांचे तसेच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नदीला आलेल्या पुराचा सामना करतडोंगर दऱ्यांतून अवजड पोलरोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. त्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी प्रत्यक्ष भेटीत कौतुक केले.

            या दौऱ्यात चिपळूण तालुक्यातील खेर्डीवशिष्ठी नदीपूल परिसर तसेच मुरादपूर येथे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करण्यात आले.

            मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 1 हजार 942 गावे व शहरातील 9 लाख 60 हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पुरात  7 लाख 53 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे.

            पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण 1 हजार 617 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. 14 हजार 737  रोहित्रे बंद पडली असताना 11 हजार 368 रोहित्रे  सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या 489 वीज वाहिन्यांपैकी आता 404 वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67  वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी 56 केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झालेले आहे.

            ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या दौऱ्यात महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमेमहावितरण रत्नागिरी परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकरऊर्जामंत्री यांचे सल्लागार उत्तम झालटेमहापारेषणचे कराड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल कोलपकोयना जलविद्युत प्रकल्पाचे प्रभारी मुख्य अभियंता राजेश कोलप व महापारेषणच्या अधीक्षक अभियंता शिल्पा कुंभार हे उपस्थित होते.

 सांगलीचा दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात

 

सांगली/कोल्हापूरदि. २९ जुलै

पहिल्या दिवशी सातारचा दौरा आटोपून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेटी देत पूरग्रस्तांशी संवाद साधला. शिरोळ तालुक्यातील मदतसामुग्रीचे वाटप करीत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला.

सांगली जिल्ह्यात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरखा. संजयकाका पाटीलसदाभाऊ खोतपृथ्वीराजबाबा देशमुख हे तर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटीलप्रवीण दरेकरराजे समरजित सिंह घाटगे हे त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील दौऱ्याचा प्रारंभ वाळवा ग्रामपंचायतीला भेट देऊन झाला. येथे त्यांनी स्थानिक ग्रामस्थांकडून निवेदन स्वीकारले. विविध समस्या जाणून घेतल्या. या समस्यांबाबत निश्चितपणे पाठपुरावा केला जाईलअसे अभिवचन दिले. वाळवा गावातील विविध ठिकाणांना सुद्धा त्यांनी आज भेटी देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. कंबरेइतके पाणी या गावात होते. घरातील सर्व वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही घराची पडझड झाली आहे. शेती आणि पिकांचे सुद्धा मोठे नुकसान आहे. मनुष्यहानी टळलीहेच सुदैव. ७० एकर जागेत पुनर्वसन करण्यात यावे अशा स्थानिकांच्या मागण्या आहेत. आपल्या सर्व मागण्या राज्य सरकारकडे मांडण्यात येतीलअसे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. २०१९ मध्ये येथे पूर आला तेव्हा तातडीने रोखीची मदत देण्यात आली होती. नवीन घर तर दिलेच. पण तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या घरात राहावे लागलेतेव्हा घरभड्याचे पैसे सुद्धा दिले होतेअसे सांगताना त्यांनी आज या गावाला भेट देऊन पूरपिडितांशी संवाद साधला. ते म्हणाले की,  दुर्दैवाने दोन वर्षांनी पुन्हा तेच संकट आले आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे केंद्र सरकारकडून पैसे मिळतच असतात. पण राज्य सरकारने अशावेळी निकषाबाहेर जाऊन ठोस मदत तातडीने करायची असते. गेल्यावेळी पंचनामे झाले नाही तर मोबाईलने काढलेला फोटो हा पुरावा मानावाअसा निर्णय आपण केला होताआताही तसाच निर्णय व्हावाअशी आमची मागणी आहे. बारा बलुतेदारांच्या सुद्धा अनेक समस्या आहेत. राज्य सरकारकडून मदत मिळण्यासाठी आपण संपूर्ण प्रयत्न करू.

भिलवडी बाजारपेठेत पुरामुळे झालेल्या नुकसानीची आज देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. नागरिकांची निवेदने स्वीकारली आणि त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला. २०१९ मध्ये पुराच्यावेळी विशेष निर्णय आपल्या सरकारने घेतले. शेतीजनावर यासाठी मदत केली आणि दुकानदारांना सुद्धा पैसे मिळाले. आज येथे पाहणी केली तेव्हा अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. आजही लोक दुकानातून चिखल काढताना दिसत आहेत.

अशाप्रसंगी सरसगट नुकसान गृहीत धरावे लागेलत्यामुळे सर्वांना मदत मिळणे शक्य होते. सर्व घटकांना या नुकसानीची मदत मिळेलयासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीयासाठी पुलाची उंची वाढविणे यासारखे अनेक उपाय करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईलअसे त्यांनी सांगितले.

मिरज तालुक्यातील ढवळी येथे आज त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. मोठ्या प्रमाणात शेतीघरविजेचे नुकसान झाले आहे. गावातील सर्वांनी चांगली मदत मिळाली पाहिजेअशी अपेक्षा व्यक्त केली. राज्य सरकारकडून अजूनही मदतीची घोषणा होत नाहीपण आता लवकर घोषणा झाली पाहिजेअशी आमची मागणी आहेअसे त्यांनी सांगितले.

सांगलीतील जामवाडीमगरमच्छ कॉलनीबालाजी चौकमारुती चौकहरिपूर रोडहरिपूर ग्रामपंचायतश्यामनगर या भागांना सुद्धा त्यांनी भेटी दिल्यानागरिकांशी चर्चा केली. प्रत्यक्ष पाहणी केलीतेव्हा लोक घरातून चिखलपाणी काढत होते. बाजारपेठांमध्ये दुकानांचे मोठे नुकसान झाले. जामवाडी येथे सुमारे ३००-४०० कुटुंब पीडित आहेत. या सर्व भागात तातडीने मदत करण्याची गरज

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे श्री पद्मराजे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे भाजपा आणि भाजयुमोतसेच कॅप्टन तमिल सेल्वन यांच्या मदतसामुग्रीचे त्यांनी वितरण केले तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.

संभाजी पवार यांच्या कुटुंबीयांची भेट

माजी आमदार बिजलीमल्ल संभाजी पवार यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. आज सांगली दौऱ्यावर असताना त्यांच्या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

 नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसित करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       पीएमआरडीए विकास आराखड्याचे प्रारूप मान्य

·       विकास योजनेच्या प्रारूपावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविणार

 

            मुंबईदि. २९: पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार नागरिकांना राहण्यायोग्य असे सर्वोत्तम महानगर विकसित करण्यासाठी प्रयत्न करा. ही कामे करताना त्या भागात अनधिकृत बांधकामे होणार नाही याची दक्षता घ्यावीअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी मान्यता दिली.

            वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारनगरविकासमंत्री एकनाथ शिंदेमुख्य सचिव सीताराम कुंटेमुख्यमंत्र्यांचे अपरमुख्य सचिव आशीषकुमार सिंहप्रधान सचिव विकास खारगेनगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणीपीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे उपस्थित होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

            या विकास आराखड्यात २ रिंगरोडहायस्पीड रेल्वे व क्रिसेंट रेल्वे१० मेट्रो मार्गिका१३ मल्टी मॉडेल हब४ प्रादेशिक केंद्रे१५ नागरी केंद्रे१२ लॉजिस्टिक केंद्रे५ पर्यटन स्थळ व ३ सर्किट्स५ शैक्षणिक केंद्रे२ वैद्यकीय संशोधन केंद्रे व ७ अपघात उपचार केंद्रेजैव विविधता उद्यानकृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे१ क्रिडा विद्यापीठ८ ग्रामीण सबलीकरण केंद्रे५९ सार्वजनिक गृह प्रकल्प२६ नगर रचना योजना४ कृषि उत्पन्न बाजार केंद्रे५ प्रादेशिक उद्याने८ जैव विविधता उद्याने व १६ नागरी उद्याने४ अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे३० अग्निशमन केंद्रे२ औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र१ व्यवसाय केंद्र असे महत्वाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.

            पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र ६९१४.२६ चौ.कि.मी. असून हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र आहेअसे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. दिवसे यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण करताना सांगितले.

            पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आलेली असून त्यामध्ये प्राधिकरण हद्दीतील २३ गावांचा समावेश करण्यात आला असून त्यांची प्रारुप विकास योजना तयार करणेकरीता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

            हवाई सर्व्हेक्षणप्रत्यक्ष स्थळ निरिक्षण व भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) चे आधारे संपूर्ण नियोजन क्षेत्राचा विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यात आलेला आहे व त्यामध्ये डिजीटल एलेव्हेशन मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. तसेच सर्व्हे नंबरसह गाव नकाशे जीआयएस प्रणालीवर दर्शवून बेस मॅप तयार करण्यात आलेला आहे.

            नियोजित क्षेत्रातील प्रस्तावित नागरीकरणाखालील क्षेत्र १६३८.२१ चौ.कि.मी. आहे. त्यामध्ये १८ नागरी विकास केंद्रे प्रस्तावित केली असून त्यामध्ये सन २०११ नुसार लोकसंख्या ९.५३ लाख आहे व सन २०४१ ची संभाव्य लोकसंख्या ४०.७४ लाख इतकी आहे. सर्व १८ नागरी विकास केंद्रासाठी रहिवासवाणिज्यऔद्योगिकलॉजिस्टीकवनीकरणशेती हे वापर विभाग प्रस्तावित करण्यात आले आहेत. ही विकास केंद्रे लगतच्या ग्रामीण भागातील ५ कि.मी. परिसर क्षेत्रास सोयी-सुविधा पुरवतील. प्रत्योक नागरी केंद्रासाठी उपलब्ध साधनसामुग्रीसंसाधनांचा विचार करून आर्थिक वृद्धीसाठी विशिष्ट संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार नियोजन आराखड्यात पूरक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

            संपूर्ण महानगर प्रदेशाचा विकास आराखडा तयार करताना संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केलेल्या शाश्वत विकास उद्दीष्टांचा विचार केला आहे. त्या अनुषंगाने पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विकास प्रकल्पामध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा सर्वोत्तम कार्यक्षम वापर व शाश्वत विकासासाठी आवश्यक उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

            उर्वरित ग्रामीण क्षेत्रासाठी एकूण ५ ग्रामीण विकास केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत व त्याचेसाठीही स्वतंत्र विकास योजना तयार करण्यात आल्या आहेत. उर्वरित ग्रामीण क्षेत्रामध्ये शेतीवनवनीकरणहिल टॉप हिल स्लोपपर्यटनग्रीन बेल्ट वापर विभाग व रस्त्यांचे जाळे (Network) प्रस्तावित करण्यात आले आहे.

            या प्रारुप विकास योजनेसाठी नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यासाठी दोन्ही बैठकांमध्ये मान्यता देण्यात आली.

 पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी उपलब्ध होणार तारांकीत दर्जाच्या सोयी-सुविधा

·       महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा पुढाकार

           

            मुंबईदि. 29 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पर्यटक निवासे आणि मोकळ्या जागा या निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय पर्यटनस्थळांच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी येत असलेल्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक व्यावसायिकयुवकांना रोजगार उत्पन्न होवून पर्यटनस्थळाचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी एमटीडीसीने पुढाकार घेतला आहे. याठिकाणी पंचतारांकित दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशी-परेदशी पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांविषयी आकर्षण निर्माण होवून पर्यटन विकसित होण्यास मदत होणार आहे.

            याच प्रयत्नांचा एक भाग म्हणुन महामंडळाकडे असलेल्या मोकळ्या जमिनी आणि विकसित केलेल्या मालमत्तांना भागिदारी तत्त्वावर (पीपीपी) विकसित करून राज्यातील काही निवडक पर्यटनस्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार 4 आणि 5 तारांकित पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिक यांच्याबरोबर भागिदारी होणार आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक होणार असल्याने पर्यटनासाठी संधी उपलब्ध होणार आहेत. अम्युझमेंट पार्कसाहसी क्रिडावॉटर पार्क आदी विकसित होणार आहेत. महाराष्ट्राची लोककलाखाद्यसंस्कृतीनिसर्गरम्य समुद्रकिनारेऐतिहासिक गडकिल्लेथंड हवेची ठिकाणे आणि निसर्गसंपन्न डोगररांगा या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणावर विकसित होणार आहे.

            शासकीय जमिनीमालमत्तांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी पीपीपीजॉईंट व्हेंचरनॉनजॉईंट व्हेंचरप्रवर्तन आणि व्यवस्थापन करार किंवा फक्त व्यवस्थापन करार इत्यादी उपलब्ध विविध पर्यायांचा विचार करुन निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार या मालमत्तांचा विकास करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून त्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रथम टप्प्यामध्ये माथेरानमहाबळेश्वरहरिहरेश्वर (जि. रायगड) येथील पर्यटक निवास (टुरीस्ट रीसॉर्ट)मिठबांव रिसॉर्ट आणि मोकळी जागा (जि. सिंधुदूर्ग) तसेच ताडोबा आणि फर्दापुर (जि. औरंगाबाद) येथील मोकळ्या जमिनींचा विकास करण्यात येणार आहे. त्यानंतर पर्यटन क्षमतेचा विचार करुन अन्य ठिकाणांची निवड करुन शासन मान्यतेने त्यांचा विकास करण्यात येणार आहे.

            पर्यटन क्षेत्रात सध्या कोरोना महामारीमुळे आलेली मरगळ या निर्णयामुळे कमी होणार असून पर्यटन क्षेत्र नव्याने उभारी घेईल. पर्यटकांना पंचतारांकित सुविधा उपलब्ध होणार असल्याने स्थानिक व्यावसायिकटुर ऑपरेटरट्रॅव्हल कंपन्या आणि स्थानिक उत्पादनांना नव्याने बाजारपेठ मिळेलअसा विश्वास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi