Friday, 30 July 2021

 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती

विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            मुंबई,  दि. 30 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरीता वैयक्तीक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सूरू झाल्या असून, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

            महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. 18 ते 50 वर्ष वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गरजू व्यक्तींनी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अधिक माहितीकरीता गृहनिर्माण भवनखो.क्र.३३कलानगरबांद्रा (पू)मुंबई. दुरध्वनी क्रमांक २५४२८९०७ येथे संपर्क साधावाअसे आवाहन  अरुण माने जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मुंबई शहर व उपनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००

 

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 30 : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांकरीता बीज भांडवल योजनावैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनागट कर्ज व्याज परतावा योजना व थेट कर्ज योजना (महामंडळ) सुरू असून मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

            महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. १८ ते ५० वर्षे वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गरजू व्यक्तीनी महामंडळाच्या www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेतस्थळावर करावाअसे आवाहन जिल्हा व्यवस्थापकशामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. मुंबई शहर व उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००


 

एनएसएफडीसी योजनेअंतर्गत स्माईल योजना

 

              मुंबईदि. 30 : कोरोना विषाणुच्या महामारीमध्ये अनुसूचित जातीमधील ज्या कुटुंबप्रमुखाचे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निधन झाले आहे. अशा कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार देण्याकरिता एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत ‘स्माईल योजना’ राबविण्याचे विचाराधीन असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            अनुसूचित जातीतील 18 ते 60 या वयोगटात असलेल्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 मुळे मृत्यु झाला आहे. अशा कुटुंबाचे पुर्नवसन करण्यासाठी माहिती एकत्रित करण्यात येत आहे. यासाठी संबंधितांनी https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या लिंकवर अर्ज भरावा. या योजनेची अधिक माहिती www.mahatmaphulecorporation.com  या संकेतस्थळावर नोटीस सेक्शन मध्ये मिळेल.

            या योजनेला अधिकाधिक कुटुंबांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi