सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 11 May 2019
कुठलाही आजार आपल्याला का होतो.
कुठलाही आजार आपल्याला का होतो.
तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे.
तुम्ही स्विकारल्यामुळे.
आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही मानूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्विकारलेय की मला पोहायला येत नाही.आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे तो पाण्यावर तरंणार आहे. अहो सापाला हात पाय नसतात. तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. बघा जी मानसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे. ती आपल्याला कसलाच आजार होवू नये यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा. वापरा हेच खरे शरीर शास्त्र आहे. मेडीकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही. तर ताप आल्यावर,सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा. तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.
अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे शरीरावर अत्याचार आहेत. ही अंधश्रद्धा आहे. शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे.
आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहीती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही.
मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघूया –
१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते.
२) परिक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो,
३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहीली की हातापायातली शक्ती गळून जाते.
४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.
तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!
ताकतवर असला तरी तो गुलामच! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम!
आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.
१) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार -
समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल, जसं की -
- त्याला बघितलं की माझं रक्तचं खवळतं!
- ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!
- माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!
क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परीणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो.
डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काहीकाळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही.
ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच त्याला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.
थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशा आणि निराशा अनुभव करणारा व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.
२) आतड्यांचे विकार – जो व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलतो, स्वतःची निंदा करतो, स्वतःला दुबळा समजतो, त्याला छोट्या आतड्यांच्या विकरांची समस्या उदभवते.
३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत, खरतरं मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचां, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा सहारा घ्यावा लागतो.
आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात.
काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं, कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मुल आईवडीलांवर राग काढु शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो,
ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवून बसतो.
असं ही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर झाली होती. जे लोक कंजुष वृत्तीचे होते, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळली.
४) छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परीणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.
५) डोकेदुखी –
आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?
- ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!
- त्याने माझं खुप डोकं खाल्लं!
- आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,
निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे.
आणि मायग्रेनचा त्रास चालू!
डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते.
तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच इष्ट!
कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोर्न केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.
६) पाठदुखी –
एखादा व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकुन थकुन गेला असेल तेव्हा त्याला पाठदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात, ह्यात मानेपर्यंतचे स्नायु आखडले जातात. त्यांच्यवरचा ताण जाणवतो.
चेहरा मुळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.
आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे?
आपापले औषधौपचार चालू ठेवा पण हे रोग शरीरातून समुळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसुचन हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.
जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या –
आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे,
आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे,
डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे,
माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरीक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे.
माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे, काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल!
आणि डोकेदुखी गायब!
प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवुन रोगमुक्त होता येते.
सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगू नका, रोग बनून ते शरीराला पोखरतील, राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा!
इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो, त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे, मनातले संपुर्ण भाव ओतून रिते व्हायचे, ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलवर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.
अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.
तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!..
धन्यवाद!
कळावे आपला
HERBAL ENGINEER
डॉ.प्रवीण कुलकर्णी

बायकांची भिशी....
Prashant Kulkarni यांची सुंदर पोस्ट
या सांसारिक जगातला सर्वात मोठा घोटाळा म्हणजे या बायकांची भिशी....
या भूतलावर मला एक असा नवरा सांगा ज्याला या बायकांच्या भिशीपासून काही फायदा झाला असेल....
मला एक गोष्ट आजपर्यंत समजलेली नाही आणि ती म्हणजे या बायकांच्या वर्षानुवर्ष एवढ्या भिशा सुरू असतात ....एक संपली की दुसरी सुरू असते....या भिशा कधी ना कधी आपल्याला म्हणजे बायकोला लागतं असणार ना? आणि मग हे लागलेल्या भिशीचे पैसे जातात कुठं?.... हा एक मोठा प्रश्न आहे आणि हाच तो प्रचंड मोठा सांसारिक घोटाळा....
बरं किरकोळ किरकोळ म्हणतं आमच्या हिच्या बऱ्याच भिशा सुरू असतात....सर्वात प्रथम सोसायटीतल्या बायकांच्या भिशा.... हा तर अगदी यांचा जन्मसिद्ध हक्क....एकतर या निमित्ताने यांना एकमेकांच्या घरात डोकावता येते....आणि दुसरं म्हणजे सगळ्या बायको जगतातला राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे आपापल्या नवऱ्यांच्या नावाने भरभरून टाळ कुटता येतो....आपल्या नवऱ्याच्या नावाने मनसोक्त उगाचंच गाऱ्हाणी करता येतातं...तसंही चार बायका जमल्या की 'नवरा' हा अगदी जिव्हाळ्याचा विषय ...तो विषय निघतो म्हणजे निघतोच......मला तर ही भिशी सुरू असेल तर इतक्या उचक्या लागतात, इतक्या उचक्या लागतात की विचारू नका....बरं मी काय म्हणतो, आता मी एवढा बरा लिहीतो....तुम्ही लोकं एवढं त्यावर प्रेम करता....मग त्या भिशीत त्या चार बायकांशी बोलावं ना माझ्याविषयी चार चांगले शब्द, पण नाही...नवऱ्याचे चांगले गुण सोडून त्याच्या नको नको त्या कुरापती काढतं त्या यथेच्छ उधळायचा अड्डा म्हणजे ही बायकांची भिशी.... असो
आणि मग वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या भिशा....ऑफिसच्या बायकांच्या भिशा.....मैत्रिणींच्या भिशा....कुठे नातेवाईकांच्या भिशा....काही विशिष्ट महिलांच्या ग्रुपच्या भिशा
..काही व्हाट्सएपच्या भिशा.... काय काय आणि कुठं कुठं या भिशा सुरू असतात हाच मुळात या घोटाळ्याचा केंद्र बिंदू....
तर पुन्हा या घोटाळ्याकडे येऊ....या भिशीला लागणारे दर महिन्याचे पैसे हा भिशीतल्या घोटाळ्याचा मुख्य स्त्रोत....आता बघा घोटाळा कसा सुरू होतो?....आपण ऑफीसावरून घरी यायला निघालो की बायकोचा फोन येतो...आवाज तर असा असतो की प्रत्यक्ष लताबाईंना या आवाजाचा हेवा वाटावा....इतका गोड आणि मधुर ...
" अहो येता येता त्या जानव्हीच्या घरी माझे भिशीचे दोन हजार देऊन या ना गडे प्लिज....तुमच्या वाटेतच आहे....मी घरी आले की देते तुम्हाला....आणि लवकर या, भूक लागलीय...तुमच्या आवडीची हिरव्या रस्स्यातली गवार केलीय..".....आता हे सगळं गोड शब्दातलं ऐकून माझ्यासारखा भोळा भाबडा नवरा लगेच विरघळून जातो....दोन हजाराला चुना लागणार आहे हे त्यावेळी कळतं असूनही वळतं नाही....हे म्हणजे कोंबडीला चुचकारतं, 'ये बाई आज तुला कापायला सोन्याचा चाकू आणलाय' असं म्हणतं बोलावण्यासारखं आहे.....आणि कोंबडीही 'अरे वाह आज सोन्याच्या चाकूने गळा कापणार' म्हणून हसतं खेळत बागडतं जाण्यासारखं आहे..... ती हिरव्या रस्स्यातली गवार दोन हजाराला पडते....साला एवढा भाव तर फाईव्ह स्टार मध्ये पण नसतो....हे ते दोन हजार परत कधीच येतं नाहीत....आणि दुसऱ्या दिवशी समजा आपण या पैशाची आठवण करून दिली तर काल तिच्या गळ्यावर विराजमान असलेल्या लताबाई गायब होऊन तिथे आता अमरीशपुरी येऊन बसलेले असतात....आपण पैसे मागितले की हा लेडी मोगम्बो नाखूष होतं आपल्यालाचं डाफरतं म्हणतो..." देते हो नंतर, आता मी कामात आहे...'
झुरळ झटकावं तसं आपल्याला झटकलं जातं....हे पैसे काही परत मिळतं नाही...
आता पुन्हा हिचे भिशीचे पैसे कधीच भरणार नाही अशी मनोमन शपथ खाऊन आपण त्या दोन हजारावर पाणी सोडतो आणि दोन तीन महिन्यांनी हीच चुक अगदी लक्षात ठेवून पुन्हा करतो....हिच्या त्या प्रत्येक भिशीतले अर्धे अधिक पैसे खरंतर आपलेचं असतात.....आपल्याकडून या ना त्या मार्गाने असे उकळलेले जातात पण आपले असून ते पुन्हा कधीचं दृष्टीस पडतं नाहीत हाच तो महाभयंकर घोटाळा....
या घोटाळ्याचा आणखी एक प्रकार असा की तिची कुठलीतरी नवीन भिशी सुरू व्हायची असेल तर बायको अगदी व्यावहारिक पण त्याला लाडीगोडीची झालर लावून आपल्याला ऑफर देते...
"अहो आमची अमुक अमुक एक भिशी सुरू होतेय...माझा एक नंबर टाकतेय....एक मेंबर कमी पडतोय ....तुमच्या नावाने एक नंबर टाकता का?....." हे असं म्हणून मग आपल्याला त्या मायाजालमध्ये अलगद अडकवलं जातं.....आणि मग त्या लागणाऱ्या भिशीच्या पैशाचं काय काय करता येईल....त्या पैशाचा कसा फायदा होईल ...आपल्याला काय आणि कसं घेता येईल हे अगदी बायजावार पटवून दिलं जातं.....स्वप्नांचा एक मनोरा उभा केला जातो....खरंतर आपला बकरा होणार आहे आणि आपली मान कापली जाणार आहे हे माहीत असूनही आपण कसं कोण जाणे त्या कसायाच्या हातात आपला खिसा देतो जो पुढचे सात आठ दहा महिने व्यवस्थित धार लावून कापला जातो...आणि हे दुःख बोलताही येतं नाही आणि दाखवताही येतं नाही....
यथावकाश आपल्या खिशातले, आपल्या नावाचे तिच्याचं नावावर त्या आपल्याला अनभिज्ञ असलेल्या भिशीत तिचे नंबर टाकले जातात आणि मग आपण आपल्याला कधीही न लागणाऱ्या त्या भिशीचे आपले आणि बायकोच्या चालूगिरीमूळे अधूनमधून तिचे असे पैसे भरतं जातो...दोन चार महिन्यांत आपण हे प्रकरण विसरून जातो..... पैसे मात्र तिकडे भरले जातं असतात....नंबर कधी लागतो? पैसे कधी येतात? याची कधी साधी भनक, हवा सुद्धा आपल्याला लागतं नाही....हाच तो प्रचंड मोठा घोटाळा..
एवढ्या मागील वीस वर्षांत मला एकदाही आठवतं नाही की बायको असे काही नोटांचे बंडल घरी घेऊन आलीय आणि मला म्हणतेय 'हे बघा भिशीचा नंबर लागला त्याचे हे पैसे' ......तिच्या स्वतःच्या नंबरचेच आपल्याला कधी समजतं नाही तिथे आपण तिच्या नावावर लावलेल्या भिशीच्या पैशाचं दर्शन कुठून होणार?....
आता मी एवढा जगभर फिरत असतो, काय काय पहात अनुभवतं असतो, पण बायकोला लागलेल्या भिशीतल्या पैशाचं एकदा मनोभावे दर्शन घ्यावे हे आता माझ्या उभ्या आयुष्याचे स्वप्न आहे...
बरं या भिशीतला अजून एक घोटाळा म्हणजे जेंव्हा ही भिशी असते तेंव्हा या बायका एकतर कोणाच्या तरी घरी तुडुंब चापतात....बायकोला भिशीला जायचं असल्याने तिला काही वेळ नसतो आणि मग त्यादिवशी आपल्या वाट्याला दुपारचं घरातील उरलं सुरलं वाट्याला येतं...आणि समजा आपल्याच घरी भिशी असेल तर मग काय विचारू नका.....एकतर उशिरा घरी या...म्हणजे तशी तंबीच दिलेली असते हो....ऑफिस सुटलं तरी उगाचंच इकडे तिकडे टाईमपास करत बसावं लागतं.... आणि घरी आलं आणि समजा काही शिल्लक राहीलं असेल तर ते ही अर्धवट वाट्याला येतं.... भेळ असेल तर कांदा नसतो, चिंचेच पाणी संपलेले असते....डोसा असेल तर भाजी गायब झालेली असते.....पावभाजी केलेली असेल तर पाव एखादाचं शिल्लक असतो.....काही काही पदार्थ तर गायबचं झालेले असतात...काही पदार्थ तर दर्शनालाही उरतं नाही......अर्धवट तोडलेला समोसा....कुठंतरी तळाशी उरलेली चटणी....डोसा आणि सॉस असं काही मग आपल्या वाट्याला येतं....
बरं आपण भिशी का लावतो तर बचती मधून समृद्धीकडे यासाठी....म्हणजे आलेले एकदम पैसे कुठेतरी गुंतवणूक करून त्यात वाढ व्हावी किंवा एकदम पैशातून काही खरेदी व्हावी म्हणून...पण या मूळ उद्देशालाच या बायकांच्या भिशीत हरताळ फासला जातो....आताशा नवीन सुरू झालेलं फ्याड....कायतर म्हणे थीम भिशी....गरबा थीम, नऊवारी साडी थीम, बांधणी थीम, पंजाबी थीम, कलर थीम आणि हो मागच्याच महिन्यात झालेली स्कुल ड्रेस थीम...त्या प्रत्येक थीमच्या दिवशी तसा पेहराव घालून जायचं...त्यादिवशी स्कुलड्रेस थीम असताना म्हाळसाला पुन्हा शाळेच्या ड्रेस मध्ये पाहून मला लहानपणीची म्हाळसा आठवली...तिसरी चौथीत आम्ही एकत्र शाळेत जायचो....डोक्याला लाल रेबिनीने बांधलेल्या दोन वेण्या आणि कपाळावर बारीकशी टिकली लावलेली ती त्यावेळची गोबऱ्या गालाची म्हाळशी कसली गोड दिसायची म्हणून सांगू....असो विषय भरकटला....आता पुढच्या महिन्यात काय तर म्हणे बंगाली थीम.... अरे भिशी कितीची?..ती बंगाली साडी कितीची??...बरं नुसती साडीच नाही मग त्याबरोबर बाकीचे सजाधजायचे सामानही आलंच....भिशी आणि खर्च, काय कुठं हिशोब लागतो का?....सगळाच घोटाळा दुसरं काय?.....
तर या बायकांच्या भिशा हा भारतातला सर्वात मोठा घोटाळा आहे...मी जर या देशाचा पंतप्रधान झालो ना तर पहिलं या भिशीची आचारसंहिता करायला लावून या भिशीसाठी काही नियमावली घालून देईन..
सर्वात पहिले म्हणजे प्रत्येक भिशी ही माहिती अधिकाराखाली आणीन.......कितीची भिशी? कितीजण? आणि कधी नंबर लागला? पैसे कधी मिळाले? हे प्रत्येक नवऱ्याला समजलं पाहिजे, हा त्याचा अधिकार आहे....भिशीचा नंबर लागला तर सगळेच्या सगळे पैसे सर्वात आधी घरी आणून नवऱ्याच्या ताब्यात दिले पाहिजे आणि मग सर्व संमतीने त्याचा घरातील कामासाठी विनियोग झाला पाहिजे....
बायकांची भिशी जर हॉटेलात असेल तर त्यादिवशी नवऱ्याला बाहेर मित्रांसोबत खंड्याशी गप्पा मारायला परवानगी मिळायला पाहिजे....
भिशी जर घरात असेल तर खायचे सर्व पदार्थ नवऱ्यासाठी आधी स्वतंत्र नैवेद्यासारखं काढून ठेवलेले पाहिजे....कुठलीही भिशी सुरू करताना त्याच्या पैशाचा स्रोत काय असेल हे बायकोने नवऱ्याला आधी स्पष्ट सांगितले पाहिजे....
भिशीचा हिशोब पारदर्शी असायला हवा त्यासाठी अशा अनेक कडक नियमांचे अवलंबन करायला हवं तरच ही बायकांची भिशी ही घोटाळ्यातून बाहेर येईल.....आणि माझ्या सारख्या असंख्य तमाम गरीब बिचाऱ्या नवऱ्यांना न्याय मिळेल....
असो
कुलकर्ण्यांचा " बायकांच्या भिशिवर GST लावा रे संघटनेचा अध्यक्ष"

Friday, 10 May 2019
स्वातंत्र्यदेवीची विनवणी
स्वातंत्र्यदेवीची
विनवणी-कुसुमाग्रज
पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करु नका।
मीच
विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरु नका ॥
सूर्यफुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
।
काळोखाचे
करुन पुजन घुबंडाचे व्रत धरु नका ॥
अज्ञानाच्या गळयात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंधप्रथांच्या
कुजट कोटरी दिवामितासम दडू नका ॥
जुनाट पाने गळूनी पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे
शतक सामोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥
वेतन खाऊनी काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतिल
दुसरे बघतिल तिसरे असे सांगून सुटू नका ॥
जनसेवेस्तव असे कचेरी तीे डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून
मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर
त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका ॥
सत्ता तारक सुधा असे पण सुराहि मादक सहज बने ।
करिन
मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥
प्रकाश पेरा आपुल्या भक्ती दिवा दिव्याने पेटतेसे ।
इथे
भ्रष्टता तिथ नष्टता शंखच पोकळ फुकू नका ॥
पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मराभलेपणाचे
कार्य उगवता कुठे तयावर फुंकू नका ॥
गारगरीबा छळू नका । पिंड फुकाचे गिळू नका । गुणोजनांवर
जळू नका ।
उणे कुणाचे दिसता किंचीत देत दंवडी फिरु नका ।
मीच
विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरु नका ॥
पर भाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी ।
माय
मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ॥
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे ।
गुलाम
भाषिक होऊनी आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका ॥
कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणु नका ।
सरस्वतीच्या
देवळातले स्तंभ घणाने तोडू नका ॥
पुत्र पशुसम विकती ते नर नर न नराधम गणा तया ।
पर
वित्ताचे असे लुटारु नाते त्याशी जोडू नका ॥
तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी ।
करमणुकीच्या
गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका ॥
सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामध्ये धरा ।
सौजन्याच्या
बुरख्याली शेपूट घालून पळू नका ॥
करा कायदे परंतू हटवा जहर जातिचे मनातूनी ।
एकपणाच्या
मारुनी बाता एैन घडीला चळू नका ॥
समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका ।
दासी
म्हणून पिटू नका वा देवी म्हणूनी पूजू नका ॥
नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा ।
उच्च
नीच हा भेद घृणास्पद उकिरडयात त्या कुजू नका ॥
माणूस म्हणजे पशू नसे हे ज्याच्या -हदयात ठसे ।
नर
नारायण तोच असे ॥
लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरु नका ।
मीच
विनवित हात जोडूनी वाट वाकडी धरु नका ॥
जिल्हा परिषदांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला व बाल कल्याण समितीने राबवावयाच्या योजना.
जिल्हा परिषदांमध्ये स्थापन
करण्यात आलेल्या महिला व बाल कल्याण समितीने राबवावयाच्या योजना.
महाराष्ट्र शासन
ग्रामविकास व जलसंधारण विभाग
शासन निर्णय क्रमांक : झेडपीए २०१०/अनौसंक्र ३३/प्र.क्र. १६८/पंरा-१
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.
दिनांक : १० मार्च, २०११
वाचा :-
शासन
निर्णय क्रमांक : झेडपीए १००७/४५४/प्र.क्र. ५१/पंरा-१ दिनांक १९ डिसेंबर, २००७.
शासन निर्णय :
महिला व बाल विकासाशी संबंधीत विविध कार्यक्रम
राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात
आलेली आहे. सदर समितीने राबवावयाचे कार्यक्रम संदर्भाधीन शासन निर्णयानुसार राबविण्यांत
येतात. तथापि, बदलत्या परिस्थितीनुसार बयाच
योजना/कार्यक्रम कालबाह्य झाल्यामुळे त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे असे शासनाच्या
निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन महिलांना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा
परिषद क्षेत्रात महिला व बाल विकास कल्याण समित्यांनी खालील योजना सक्षमपणे राबविण्यासाठी
पुढीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे.
गट “अ” - प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजना
१) मुलींना
व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे :
शासकीय किंवा अशासकीय संस्थांमार्फत काही तांत्रिक/व्यावसायिक
प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. अशा संस्थामधून खालील प्रकाराच्या प्रशिक्षणासाठी योजना
राबवाव्यात. उदा. व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी संभाषण, गवंडी, सुतारकाम, प्लंबर प्रशिक्षण,
घरगुती विद्युत उपकरणांची दुरुस्ती (टि.व्ही., रेडिओ, म्युझिक सिस्टीम दुरुस्ती, मिक्सर,
इस्त्री, टोस्टर, मोबाईल व संगणक दुरुस्ती) वाहन दुरुस्ती, सौंदर्य प्रसाधनांचे प्रशिक्षण,
केटरींग, बेकींग, विशिष्ट पध्द्तीच्या स्वयंपाकाचे प्रशिक्षण, घरगुती कामकाजाचे प्रशिक्षण
(Full
time domestic help),
शासकीय व ड्रायव्हर व कंडक्टर, रिसेप्शनिस्ट, लघुलेखन/टंकलेखन, सेल्स गर्ल, विमा एजंट,
परिचारिका (नर्स) प्रशिक्षण, वृध्द्ांची देखभाल, लहान मुलांची देखभाल, फिजिओथेरपी प्रशिक्षण, फुड प्रोसेसिंग, पॅकेजिंग,
दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, घनकचरा व्यवस्थापन व बायोगॅस (कचयापासून खतनिर्मिती गांडूळ खत, कचयाचे विभाजन व व्यवस्थापन), रोपवाटीका तसेच शोभिवंत
फुलझाडांची व औषधी वनस्पतीची लागवड व विक्री, या योजनेखाली मान्यताप्राप्त संस्थेत
प्रशिक्षण घेणाया महिलांना प्रति लाभार्थी
रु. ५,०००/- पर्यंत प्रशिक्षणाचे शुल्क (Fees) भरण्याची तरतूद राहील. प्रशिक्षण शुल्काच्या
रकमेच्या दहा टक्के रक्कम लाभार्थ्यांने स्वत: भरावी. प्रशिक्षण कालावधी जास्तीत जास्त
एक वर्षाचा असावा. शुल्क भरण्याचे नियम व प्रक्रिया संबंधित जिल्हा परिषदांनी ठरवावी.
२. मुलींना
स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारिरीक विकासाठी प्रशिक्षण योजना :
या योजनेमध्ये मुलींना कराटे, योगाचे प्रशिक्षण
देण्यात यावे, कोणत्याही वयोगटातील परंतु आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटूंबातील मुलींना
सदर प्रशिक्षण मोफत देण्यात यावे. सदर प्रशिक्षण किमान तीन महिन्यांचे असावे. ते शाळा
व महाविद्यालये यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात यावे. या योजनेतून प्रशिक्षकांच्या
मानधनावर साधारणपणे प्रति लाभार्थी रु. ३००/- प्रतिमहापर्यंत खर्च करण्यात यावा.
३. महिलांसाठी
समूपदेशन केंद्र चालविणे :
कुटूंबातील मारहाण, लैंिगक छळ व इतर तहेने त्रासलेल्या तसेच मानसिकदृष्ट्या असंतुलित महिलांच्या
सामाजिक, मानसशास्त्रीय, कायदेशीर समुपदेशनासाठी सदर योजना राबवावी. यासाठी समुपदेशक
व सल्लागार यांच्या मानधनावर खर्च करण्यात यावा. समुपदेशक व सल्लागाराची निवड मुख्य
कार्यकारी अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सिनिअर जे.एफ.एम.सी. (ज्युडिसियल मॅजिस्ट्रेट)
इ. अधिकायांच्या समितीमार्फत करण्यांत
येईल. सदर योजना महाविद्यालय/तज्ञाच्या संस्थांमार्फत राबवावी. उदा. ज्या संस्थांकडे
यापूर्वीच अशा प्रकारच्या समुपदेशनासाठी आवश्यक मनुष्यबळ, जागा, अनुभव व सोईसुविधा
उपलब्ध असतील. सध्या देण्यात आलेल्या सुविधा व समुपदेशन यांचा विस्तार करण्याची आवश्यकता
असल्यास असे प्रस्तावही मंजूर करण्यात यावेत. मात्र यासाठी संस्थेकडे स्वत:ची जागा
असणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी स्वत: कार्यालयीन फर्निचर व इतर अनावर्ती खर्चाची व्यवस्था
करावी. तालुका आणि जिल्हा पातळीवर काम करणाया समुपदेशकाला
रु. ९,०००/- इतके मानधन देण्यात यावे. काही जिल्हा परिषदांमध्ये व पंचायत समित्यांमध्ये
यापूर्वीच समुपदेशन केंद्र चालविण्यांत येत आहेत. मात्र तेथे समुपदेशकाला अत्यल्प मानधन
मिळत असल्यामुळे सदर केंद्रे व्यवस्थितपणे चालत नाहीत. तर अशा समुपदेशन केंद्राचे बळकटीकरण
करण्यात यावे व तेथे समुपदेशकाला वरीलप्रमाणे वाढीव मानधन देण्यात यावे.
४. तालुकास्तरावर
शिकणाया मुलींसाठी होस्टेल चालविणे :
ग्रामीण भागात माध्यमिक शाळा नसल्यामुळे ८ वी
ते १२ वी वर्गापर्यंत शिकणाया मुलींना प्रशिक्षण घेण्यासाठी
स्वत:च्या गावांपासून लांब अंतरावर जाऊन रहावे लागते. तालुक्याच्या ठिकाणी जेथे माध्यमिक
शाळा किंवा ज्युनिअर कॉलेज असतात. तेथे अशा मुलींना वसतीगृह उपलब्ध करुन दिल्यास मुलींच्या
शिक्षणाचे प्रमाण वाढेल. यामुळे १८ वर्षापुर्वी लग्न करण्यासाठी त्यांच्या कुटूंबियांना
प्रवृत्त करता येईल. या योजनेखाली वसतीगृह इमारतीचे बांधकाम न करता, भाड्यावर इमारती/घर/पलॅट घेण्यात यावेत. जेवणाचा खर्च लाभार्थ्यांनी सोसावा.
लाभार्थीकडून कोणतीही फी घेऊ नये. कमीत कमी १० मुलींसाठी एक वसतीगृह असावे. प्रशासकीय
खर्चाची मर्यादा जिल्हा परिषदांनी निश्चित करावी, पण ती रुपये ५००/- प्रति लाभार्थी
प्रति माह (भाडे वगळून) यापेक्षा जास्त नसावी.
५. दहावी व
बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे :
सध्या शासकीय/निमशासकीय नोकरीसाठी MS-CIT उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
संगणकाबाबतचे ज्ञान तसेच संगणक चालविण्याचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी १० वी व १२ वी
पास मुलींना MS-CIT व समकक्ष अभ्यासक्रम उदा.
डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षण देण्याची योजना यामुळे उपयुक्त राहील. त्याप्रमाणे एखाद्या
मान्यताप्राप्त संस्थेला फी देऊन त्याबाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे.
६. आर्थिकदृष्ट्या
गरीबी स्त्रियांच्या मुलामुलींसाठी पाळणाघर
नोकरी करणाया किंवा
शेतावर कामासाठी जाणाया स्त्रियांच्या लहान मुलांसाठी
पाळणाघर (Day
Care Centre)
उपलब्ध करुन देणेत यावे. पाळणाघर संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत किंवा स्थानिक गरजेनुसार
सूरु ठेवावे. सदर पाळणाघर चालविण्यासाठी जिल्हा परिषदेने योग्य महिला बचत गटाची किंवा
स्वयंसेवी संस्थेची निवड करावी. लाभार्थ्यांची निवड माता समिती किंवा ग्रामपंचायतीने
करावी. या योजनेखाली पाळणाघर चालविणाया महिलांचे
मासिक मानधन व इमारतीचे भाडे अशा बाबींवर खर्च करण्यात यावा.
७. किशोरवयीन
मुलींना व महिलांना जेंडर बाबत तसेच आरोग्य व कुटूंब नियोजनाबाबत प्रशिक्षण देणे
किशोरवयीन मुलींना शाळेत सर्वसाधारण शिक्षण देण्यात
येते. परंतु विशिष्ट किशोरवयीन समस्यांबद्दल शिक्षण देण्यात येत नाही. असे निदर्शनास
आले आहे की, त्यामुळे त्यांना काही मान व सामाजिक, मनावैज्ञानिक अडचणींना तोंड द्यावे
लागते. याबाबत अनुभवी व संवेदनशील तज्ञ/स्वयंसेवी संस्थामार्फत सदर प्रशिक्षण आयोजित
करण्यात यावे. त्याचे स्वरुप स्थानिक आवश्यकतेनुसार ठरविण्यांत यवे. उदा. शाळेत/महाविद्यालयांत
शिकणाया मुलींसाठी किंवा गळती झालेल्या
मुलींसाठी दर आठवड्याला एक वर्ग (तसेच मुलांसाठी स्वतंत्र वर्ग) भरविण्यांत यावेत.
प्रत्येक वर्ग १ ते २ तासांचा असावा. बाहेरील तज्ञांना व डॉक्टरांना, मनोवैज्ञानिकांना
सदर सत्र घेण्यासाठी निमंत्रित करण्यात यावे. त्यांना प्रत्येक सत्रासाठी साधारणपणे
रु. २०० ते ४०० मानधन देण्यात यावे. लहान बालकांना विशेषत: मुलींना लैगिंक हिंसाचारापासून
वाचविण्यासाठी समितीने विशेष प्रयत्न करावेत.
८. महिलांना
कायदेशीर/विधीविषयक सल्ला देणे :
बहुतेक मुलींना व महिलांना त्यांच्या कायदेशीर
अधिकारांबद्दल माहिती नसते. विशेषत: हुंडाविषयक कायदे, स्त्रीधन, मालमत्ता अधिकार,
वारसा हक्क, लग्न, घटस्फोट, पोटगीविषयक कायदे, बलात्काराविषयक कायद्यातील तरतूदी, लग्नानंतरचे
अधिकार, त्यामुळे सदर विषयावर महाविद्यालय व इतर ठिकाणी मुली व महिलांसाठी लेक्चर ठेवण्यात
यावे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग तसेच UNFPA (United Nation Population Fund) मार्फत सदर प्रशिक्षण वर्ग
आयोजित करता येतील, व प्रती प्रशिक्षण वर्ग प्रशिक्षकाला रु. ५००/- पर्यंत मानधन द्यावे.
यासाठी तालुका स्तरावरील मोफत कायदेविषयक सल्लागार समिती किंवा विधी सेवा समिती यांचेही
मार्गदर्शन घ्यवे.
महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी शिबीरांचे
आयोजन करावे. एका शिबीरासाठी रु. २,०००/- पर्यंत खर्च करण्यात यावा.
९. अंगणवाड्यांसाठी
स्वतंत्र इमारत/भाडे :
ज्याठिकाणी अंगणवाडीसाठी स्वतंत्र शासकीय इमारत
नाही तेथे खाजगी इमारतीत अंगणवाड्या चालविण्यासाठी आवश्यकतेनुसार भाड्याची तरतूद करण्यात
यावी. तसेच अंगणवाड्यामध्ये शौचालये बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी.
नवीन अंगणवाडीचे बांधकाम करावयाचे असल्यास त्याची
मर्यादा रु. ४ लाख ठेवावी.
१०) महिला प्रतिनिधींची
अभ्यास सहल :
समितीस स्वत:च्या निधीमधून ग्रामपंचायत, पंचायत
समिती व जिल्ह परिषदेमध्ये निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींचे जिल्हा व जिल्ह्याबाहेर
पंचायत राज, आदर्श गांव, निर्मल ग्राम, महिला बळकटीकरण, महिला व बाल विकासाचे उपक्रम
इत्यादी विषयांची माहिती घेण्यासाठी अभ्यास सहलीचे आयोजन करावे. प्रतिवर्षी अशा प्रकारे
किती अभ्यास सहली आयोजित कराव्यात याबाबत जिल्हा परिषदेने निर्णय घ्यावयाचा आहे. यासाठी
प्रतिवर्ष एकूण रुपये ५.०० लक्षाची कमाल मर्यादा विहित करण्यात येत आहे.
११) पंचायत राज
संस्थामधील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण :
पंचायत राज संस्थामधील तिन्ही स्तरातील महिला
लोकप्रतिनिधींना कामकाजाचे प्रशिक्षण देण्यासाठी पंचायत महिला शक्ती अभियान २००७ सालापासून
राबविण्यात येत आहे. या अभियांनांतर्गत प्रशिक्षणासाठी तरतुद केलेल्या निधी व्यतिरिक्त
जादा लागणारा निधी आवश्यकतेनुसार समितीकडून खर्च करण्यात यावा.
१२) आदर्श अंगणवाडी/बालवाडी
सेविकांना पुरस्कार :
अंगणवाडी व बालवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाया सेविकांना समितीस स्वत:च्या निधीमधून पुरस्कार देता
येईल व उत्कृष्ट काम करणाया सेविकांची निवड तसेच पुरस्काराची
रक्कम किती असावी, याबद्दी जिल्हा परिषदेने निर्णय घ्यावयाचा आहे. योजनेवर जास्तीत
जास्त रु. २ लक्ष खर्च करण्यांत यावा.
गट “ब” च्या योजना (वस्तू खरेदीच्या योजना)
१३) कुपोषित
मुलांमुलींसाठी तसेच गरोदर महिला व स्तनदा मातांसाठी अतिरिक्त आहार :
राज्याच्या ग्रामीण/आदिवासी भागातील मुलांमध्ये
कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. ते प्रमाण कमी करण्यासाठी कुपोषित
मुलांना अंगणवाड्यामार्फत दुप्पत आहार दिला जातो. तथापि कुपोषण कमी करण्यासाठी तो पुरेसा
नसल्याने कुपोषित मुलांना अंगणवाडीत पुरविण्यांत येणाया आहाराव्यतिरिक्त विशेष आहार म्हणून अंगणवाडीतील मुले
व किशोरवयीन मुलांना Micronutrient
Supplementation Syrup
यांचा पुरवठा करण्यात यावा. तसेच स्थानिक उपलब्धतेनुसार दूध, सोयादूध (टेट्रापॅक),
चिक्की, लाडू, अंडी, फळे (केळी), गूळ, शेंगदाणे या वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा. गरोदर
व स्तनदा मातांना अतिरिक्त पोष्टीक व प्रथिनेयुक्त आहार द्यावा. जेणेकरुन त्यांच्यात
रक्तक्षयाचे प्रमाण कमी होईल व जन्माचे वेळेला नवजात मुलाचे वजन किमान २.५ किलो राहील
१४) अंगणवाडी/बालवाडींना
साहित्य पुरविणे :
एकात्मिक बाल विकास योजनेखाली अंगणवाडींना साहित्य
मिळाले नसल्यास त्या साहित्यांची बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी गरज असल्यास साहित्याची
खरेदी सदर समितीने करावी. तथापि, ज्या अंगणवाड्या/बालवाड्या समिती स्वत:च्या निधीमधून
चालविल, त्यावरील खर्च समितीने स्वत:च्या निधीमधून करावा. सदर साहित्यामध्ये वजनकाटे व जलशुध्द्ीकरण यंत्र
याचा समावेश करावा. तसेच वेगवेगळ्या प्रकारची खेळणी व शैक्षणिक तक्ते हे एकात्मिक बालविकास
सेवेकडून पुरविण्यात येत असतात, म्हणून ते पुरवू नये.
१५) महिलांना साहित्य पुरविणे :
ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना
स्वयंरोजगारासाठी तसेच इंधनाची बचत करण्यासाठी खालील साहिल्यांचा पुरवठा करण्यात यावा.
मसाला पल्वलायझर मशीन, पत्रावळी मशीन,शेवया मशीन, पिठाची गिरणी हे साहित्य पुरवावे. इंधनाची बचत होणेचे दृष्टीने तसेच महिलांना धुराचा
त्रास होऊ नये म्हणून सुधारित चुली/निर्धूर चुलींचा वापर ही काळाची गरज आहे म्हणून
सुधारीत चुली/निर्धूर चुली पुरविण्यासाठी तरतूद करण्यांत यावी. ग्रामीण भागातील दारिद्र्य
रेषेखालील कुटूंबाना सौर कंदिल आणि सोलर कुकर पुरविण्यासाठी तरतूद करण्यात यावी. वरील
सर्व वस्तू वाटप करताना प्रति महिना जास्तीत जास्त रु. १०,०००/- खर्च करण्यात यावा
तसेच प्रत्येक लाभार्थीचा १० टक्के सहभाग घेण्यात यावा.
गट “ब” च्या
वरील योजनांवर, म्हणजे वस्तू व साहित्य खरेदीवर एकूण खर्चाच्या ३० टक्के पेक्षा जास्त
खर्च करु नये म्हणजे गट “अ” च्या योजनांवर जास्त भर द्यावा,
व त्यावर किमाना ७०टक्के खर्च करण्यात यावा एकूण खर्चाच्या ३ टक्के रक्कम अपंग महिलांना
आणि बालकांसाठी खर्च करण्यात यावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०११०३१५२०१४३९००१ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी)
उप सचिव,
महाराष्ट्र शासन
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...