Prashant Kulkarni यांची सुंदर पोस्ट
या सांसारिक जगातला सर्वात मोठा घोटाळा म्हणजे या बायकांची भिशी....
या भूतलावर मला एक असा नवरा सांगा ज्याला या बायकांच्या भिशीपासून काही फायदा झाला असेल....
मला एक गोष्ट आजपर्यंत समजलेली नाही आणि ती म्हणजे या बायकांच्या वर्षानुवर्ष एवढ्या भिशा सुरू असतात ....एक संपली की दुसरी सुरू असते....या भिशा कधी ना कधी आपल्याला म्हणजे बायकोला लागतं असणार ना? आणि मग हे लागलेल्या भिशीचे पैसे जातात कुठं?.... हा एक मोठा प्रश्न आहे आणि हाच तो प्रचंड मोठा सांसारिक घोटाळा....
बरं किरकोळ किरकोळ म्हणतं आमच्या हिच्या बऱ्याच भिशा सुरू असतात....सर्वात प्रथम सोसायटीतल्या बायकांच्या भिशा.... हा तर अगदी यांचा जन्मसिद्ध हक्क....एकतर या निमित्ताने यांना एकमेकांच्या घरात डोकावता येते....आणि दुसरं म्हणजे सगळ्या बायको जगतातला राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे आपापल्या नवऱ्यांच्या नावाने भरभरून टाळ कुटता येतो....आपल्या नवऱ्याच्या नावाने मनसोक्त उगाचंच गाऱ्हाणी करता येतातं...तसंही चार बायका जमल्या की 'नवरा' हा अगदी जिव्हाळ्याचा विषय ...तो विषय निघतो म्हणजे निघतोच......मला तर ही भिशी सुरू असेल तर इतक्या उचक्या लागतात, इतक्या उचक्या लागतात की विचारू नका....बरं मी काय म्हणतो, आता मी एवढा बरा लिहीतो....तुम्ही लोकं एवढं त्यावर प्रेम करता....मग त्या भिशीत त्या चार बायकांशी बोलावं ना माझ्याविषयी चार चांगले शब्द, पण नाही...नवऱ्याचे चांगले गुण सोडून त्याच्या नको नको त्या कुरापती काढतं त्या यथेच्छ उधळायचा अड्डा म्हणजे ही बायकांची भिशी.... असो
आणि मग वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या भिशा....ऑफिसच्या बायकांच्या भिशा.....मैत्रिणींच्या भिशा....कुठे नातेवाईकांच्या भिशा....काही विशिष्ट महिलांच्या ग्रुपच्या भिशा
..काही व्हाट्सएपच्या भिशा.... काय काय आणि कुठं कुठं या भिशा सुरू असतात हाच मुळात या घोटाळ्याचा केंद्र बिंदू....
तर पुन्हा या घोटाळ्याकडे येऊ....या भिशीला लागणारे दर महिन्याचे पैसे हा भिशीतल्या घोटाळ्याचा मुख्य स्त्रोत....आता बघा घोटाळा कसा सुरू होतो?....आपण ऑफीसावरून घरी यायला निघालो की बायकोचा फोन येतो...आवाज तर असा असतो की प्रत्यक्ष लताबाईंना या आवाजाचा हेवा वाटावा....इतका गोड आणि मधुर ...
" अहो येता येता त्या जानव्हीच्या घरी माझे भिशीचे दोन हजार देऊन या ना गडे प्लिज....तुमच्या वाटेतच आहे....मी घरी आले की देते तुम्हाला....आणि लवकर या, भूक लागलीय...तुमच्या आवडीची हिरव्या रस्स्यातली गवार केलीय..".....आता हे सगळं गोड शब्दातलं ऐकून माझ्यासारखा भोळा भाबडा नवरा लगेच विरघळून जातो....दोन हजाराला चुना लागणार आहे हे त्यावेळी कळतं असूनही वळतं नाही....हे म्हणजे कोंबडीला चुचकारतं, 'ये बाई आज तुला कापायला सोन्याचा चाकू आणलाय' असं म्हणतं बोलावण्यासारखं आहे.....आणि कोंबडीही 'अरे वाह आज सोन्याच्या चाकूने गळा कापणार' म्हणून हसतं खेळत बागडतं जाण्यासारखं आहे..... ती हिरव्या रस्स्यातली गवार दोन हजाराला पडते....साला एवढा भाव तर फाईव्ह स्टार मध्ये पण नसतो....हे ते दोन हजार परत कधीच येतं नाहीत....आणि दुसऱ्या दिवशी समजा आपण या पैशाची आठवण करून दिली तर काल तिच्या गळ्यावर विराजमान असलेल्या लताबाई गायब होऊन तिथे आता अमरीशपुरी येऊन बसलेले असतात....आपण पैसे मागितले की हा लेडी मोगम्बो नाखूष होतं आपल्यालाचं डाफरतं म्हणतो..." देते हो नंतर, आता मी कामात आहे...'
झुरळ झटकावं तसं आपल्याला झटकलं जातं....हे पैसे काही परत मिळतं नाही...
आता पुन्हा हिचे भिशीचे पैसे कधीच भरणार नाही अशी मनोमन शपथ खाऊन आपण त्या दोन हजारावर पाणी सोडतो आणि दोन तीन महिन्यांनी हीच चुक अगदी लक्षात ठेवून पुन्हा करतो....हिच्या त्या प्रत्येक भिशीतले अर्धे अधिक पैसे खरंतर आपलेचं असतात.....आपल्याकडून या ना त्या मार्गाने असे उकळलेले जातात पण आपले असून ते पुन्हा कधीचं दृष्टीस पडतं नाहीत हाच तो महाभयंकर घोटाळा....
या घोटाळ्याचा आणखी एक प्रकार असा की तिची कुठलीतरी नवीन भिशी सुरू व्हायची असेल तर बायको अगदी व्यावहारिक पण त्याला लाडीगोडीची झालर लावून आपल्याला ऑफर देते...
"अहो आमची अमुक अमुक एक भिशी सुरू होतेय...माझा एक नंबर टाकतेय....एक मेंबर कमी पडतोय ....तुमच्या नावाने एक नंबर टाकता का?....." हे असं म्हणून मग आपल्याला त्या मायाजालमध्ये अलगद अडकवलं जातं.....आणि मग त्या लागणाऱ्या भिशीच्या पैशाचं काय काय करता येईल....त्या पैशाचा कसा फायदा होईल ...आपल्याला काय आणि कसं घेता येईल हे अगदी बायजावार पटवून दिलं जातं.....स्वप्नांचा एक मनोरा उभा केला जातो....खरंतर आपला बकरा होणार आहे आणि आपली मान कापली जाणार आहे हे माहीत असूनही आपण कसं कोण जाणे त्या कसायाच्या हातात आपला खिसा देतो जो पुढचे सात आठ दहा महिने व्यवस्थित धार लावून कापला जातो...आणि हे दुःख बोलताही येतं नाही आणि दाखवताही येतं नाही....
यथावकाश आपल्या खिशातले, आपल्या नावाचे तिच्याचं नावावर त्या आपल्याला अनभिज्ञ असलेल्या भिशीत तिचे नंबर टाकले जातात आणि मग आपण आपल्याला कधीही न लागणाऱ्या त्या भिशीचे आपले आणि बायकोच्या चालूगिरीमूळे अधूनमधून तिचे असे पैसे भरतं जातो...दोन चार महिन्यांत आपण हे प्रकरण विसरून जातो..... पैसे मात्र तिकडे भरले जातं असतात....नंबर कधी लागतो? पैसे कधी येतात? याची कधी साधी भनक, हवा सुद्धा आपल्याला लागतं नाही....हाच तो प्रचंड मोठा घोटाळा..
एवढ्या मागील वीस वर्षांत मला एकदाही आठवतं नाही की बायको असे काही नोटांचे बंडल घरी घेऊन आलीय आणि मला म्हणतेय 'हे बघा भिशीचा नंबर लागला त्याचे हे पैसे' ......तिच्या स्वतःच्या नंबरचेच आपल्याला कधी समजतं नाही तिथे आपण तिच्या नावावर लावलेल्या भिशीच्या पैशाचं दर्शन कुठून होणार?....
आता मी एवढा जगभर फिरत असतो, काय काय पहात अनुभवतं असतो, पण बायकोला लागलेल्या भिशीतल्या पैशाचं एकदा मनोभावे दर्शन घ्यावे हे आता माझ्या उभ्या आयुष्याचे स्वप्न आहे...
बरं या भिशीतला अजून एक घोटाळा म्हणजे जेंव्हा ही भिशी असते तेंव्हा या बायका एकतर कोणाच्या तरी घरी तुडुंब चापतात....बायकोला भिशीला जायचं असल्याने तिला काही वेळ नसतो आणि मग त्यादिवशी आपल्या वाट्याला दुपारचं घरातील उरलं सुरलं वाट्याला येतं...आणि समजा आपल्याच घरी भिशी असेल तर मग काय विचारू नका.....एकतर उशिरा घरी या...म्हणजे तशी तंबीच दिलेली असते हो....ऑफिस सुटलं तरी उगाचंच इकडे तिकडे टाईमपास करत बसावं लागतं.... आणि घरी आलं आणि समजा काही शिल्लक राहीलं असेल तर ते ही अर्धवट वाट्याला येतं.... भेळ असेल तर कांदा नसतो, चिंचेच पाणी संपलेले असते....डोसा असेल तर भाजी गायब झालेली असते.....पावभाजी केलेली असेल तर पाव एखादाचं शिल्लक असतो.....काही काही पदार्थ तर गायबचं झालेले असतात...काही पदार्थ तर दर्शनालाही उरतं नाही......अर्धवट तोडलेला समोसा....कुठंतरी तळाशी उरलेली चटणी....डोसा आणि सॉस असं काही मग आपल्या वाट्याला येतं....
बरं आपण भिशी का लावतो तर बचती मधून समृद्धीकडे यासाठी....म्हणजे आलेले एकदम पैसे कुठेतरी गुंतवणूक करून त्यात वाढ व्हावी किंवा एकदम पैशातून काही खरेदी व्हावी म्हणून...पण या मूळ उद्देशालाच या बायकांच्या भिशीत हरताळ फासला जातो....आताशा नवीन सुरू झालेलं फ्याड....कायतर म्हणे थीम भिशी....गरबा थीम, नऊवारी साडी थीम, बांधणी थीम, पंजाबी थीम, कलर थीम आणि हो मागच्याच महिन्यात झालेली स्कुल ड्रेस थीम...त्या प्रत्येक थीमच्या दिवशी तसा पेहराव घालून जायचं...त्यादिवशी स्कुलड्रेस थीम असताना म्हाळसाला पुन्हा शाळेच्या ड्रेस मध्ये पाहून मला लहानपणीची म्हाळसा आठवली...तिसरी चौथीत आम्ही एकत्र शाळेत जायचो....डोक्याला लाल रेबिनीने बांधलेल्या दोन वेण्या आणि कपाळावर बारीकशी टिकली लावलेली ती त्यावेळची गोबऱ्या गालाची म्हाळशी कसली गोड दिसायची म्हणून सांगू....असो विषय भरकटला....आता पुढच्या महिन्यात काय तर म्हणे बंगाली थीम.... अरे भिशी कितीची?..ती बंगाली साडी कितीची??...बरं नुसती साडीच नाही मग त्याबरोबर बाकीचे सजाधजायचे सामानही आलंच....भिशी आणि खर्च, काय कुठं हिशोब लागतो का?....सगळाच घोटाळा दुसरं काय?.....
तर या बायकांच्या भिशा हा भारतातला सर्वात मोठा घोटाळा आहे...मी जर या देशाचा पंतप्रधान झालो ना तर पहिलं या भिशीची आचारसंहिता करायला लावून या भिशीसाठी काही नियमावली घालून देईन..
सर्वात पहिले म्हणजे प्रत्येक भिशी ही माहिती अधिकाराखाली आणीन.......कितीची भिशी? कितीजण? आणि कधी नंबर लागला? पैसे कधी मिळाले? हे प्रत्येक नवऱ्याला समजलं पाहिजे, हा त्याचा अधिकार आहे....भिशीचा नंबर लागला तर सगळेच्या सगळे पैसे सर्वात आधी घरी आणून नवऱ्याच्या ताब्यात दिले पाहिजे आणि मग सर्व संमतीने त्याचा घरातील कामासाठी विनियोग झाला पाहिजे....
बायकांची भिशी जर हॉटेलात असेल तर त्यादिवशी नवऱ्याला बाहेर मित्रांसोबत खंड्याशी गप्पा मारायला परवानगी मिळायला पाहिजे....
भिशी जर घरात असेल तर खायचे सर्व पदार्थ नवऱ्यासाठी आधी स्वतंत्र नैवेद्यासारखं काढून ठेवलेले पाहिजे....कुठलीही भिशी सुरू करताना त्याच्या पैशाचा स्रोत काय असेल हे बायकोने नवऱ्याला आधी स्पष्ट सांगितले पाहिजे....
भिशीचा हिशोब पारदर्शी असायला हवा त्यासाठी अशा अनेक कडक नियमांचे अवलंबन करायला हवं तरच ही बायकांची भिशी ही घोटाळ्यातून बाहेर येईल.....आणि माझ्या सारख्या असंख्य तमाम गरीब बिचाऱ्या नवऱ्यांना न्याय मिळेल....
असो
कुलकर्ण्यांचा " बायकांच्या भिशिवर GST लावा रे संघटनेचा अध्यक्ष"

No comments:
Post a Comment