Monday, 6 May 2019

भरलेली शाही वांगी


भरलेली शाही वांगी



साहित्य - १० ते १२ छोटी निळी वांगी,  १ नारळाचे ओले खोबर, २ कांदे, गरम मसाला पावडर, काळा खजूर, मनुका, काजूचे तुकडे, कोकम, तमालपत्र, गुळ/साखर, मिठ
कृती - प्रथम वांगी धुवून पुसून घेणे.  जिर, हिंग फोडणीला टाकणे, कांदा चांगला परतवुन घेणे त्यामध्ये ओले खोबरे टाकून खमंग भाजून घेण त्यामध्ये गरम मसाला व मिठ टाकणे. नंतर खोबरं वाटून घेताना साखर/गुळ, कोकम टाकून वाटून घेणे. वाग्यांचे  देठ तसेच ठेवून चार काप करून (देठासहीत) वाटलेले मिश्रण त्यात भरणे. त्यात काजू, खजूर, मनुका भरणे.
    त्यानंतर फोडणीला हिंग, जिर व तमालपत्र टाकून कांदा परतविणे. परतवलेल्या मिश्रणात भरलेली वांगी मंद अग्नीवर वाफविणे.
    ही भरलेली शाही वांगी ४ ते ५ दिवस राहतात व चविष्ठ ही लागतात.


अनाथांसाठी लागू केलेल्या १% समांतर आरक्षणाची राज्यात कोटकोरपणे अंमलबजावणी


अनाथांसाठी लागू केलेल्या १% समांतर आरक्षणाची राज्यात कोटकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण १११८/प्र.क्र.४६२/१६-अ
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक ०५ डिसेंबर, २०१८

वाचा :-  १- शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्र. अमुजा-२०११/प्र.क्र.२१२/का-३,
दि. २ एप्रिल, २०१८

प्रस्तावना :-
      महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय दि. २ एप्रिल, २०१८ अन्वये अनाथ मलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा याकरिता शिक्षण व नोकरी यामध्ये खुल्या प्रवर्गातून १: समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे. सदर आरक्षण हे गट “अ ते गट “डच्या पदांसाठी सरळसेवा भरतीसाठी लागू करण्यात आले आहे. अनाथ मुलांना विहित केलेल्या १: आरक्षणाप्रमाणे पदभरती होणे आवश्यक आहे.
शासन परिपत्रक :-
      राज्य शासकीय सेवेतील गट - अ ते गट - ड ची सरळसेवेची पदे भरताना सर्व नियुक्ती प्राधिका-यांनी अनाथांसाठी असेलेल्या १: आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. विहित केलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार केवळ खुल्या प्रवर्गातच पदांची गणना करून त्यानुसार नियुक्ती प्राधिका-यांनी पदभरती करावी. सर्व प्रशासकीय विभागांनी आणि त्यांच्या अधिनस्त कार्यालयांनी रिक्त पदे भरताना जाहिरातीमध्ये अनाथासांठी १ टक्का आरक्षण नमूद करण्याची दक्षता घ्यावी. महिला व बालविकास विभागाच्या दि. २ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींना अनुसरून अनाथांना आरक्षण देण्यात यावे.
या परिपत्रकातील सूचना शासकीय / निमशासकीय सेवा, शासनाचे उपक्रम, महामंडळे, मंडळे, शासन अनुदानित संस्था व ज्यांना मार्गदर्शक सूचना देण्याचे अधिकार शासनाला आहेत अशा सर्व संस्था व सेवा यामधील नियुक्त्‌यांसाठी लागू राहतील. सदर सूचना प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुखांच्या निदर्शनास आणाव्यात.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१८१२०४१४३९३६६५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
                                                     (टि. वा. करपते)
उपसचिव, महाराष्ट्र शासन

पूर्वजांचा संदेश


नवरा घालतोय पाणी


बायकोने ओरडून नवऱ्याला सांगितले "तुमचे कुंड्या आणि गार्डन ला पाणी देऊन झाले की
तुमच्या मोबाईल मधील फोटो आणि काही msgs विषयी मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचे आहे "
 
2 तास झाले.....

4 तास झाले....

6 तास झाले....

नवरा अजून पाणी देतोय

शासकीय व निमशासकीय कार्यालयातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रकरणी शिघ्र कार्यवाही होण्यासाठी विशेष प्राधान्य देण्याबाबत...


शासकीय व निमशासकीय कार्यालयातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रकरणी शिघ्र कार्यवाही होण्यासाठी विशेष प्राधान्य देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१४/प्र.क्र.७७/१८(र.व.का.)
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२.
तारीख : ४ डिसेंबर, २०१४

शासन परिपत्रक-
     राज्यातील निरनिराळ्या शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने येत असतात. त्यात ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात त्यांच्या कामासाठी निष्कारण ताटकळत बसावे लागू नये तसेच त्यांना वारंवार फे­या माराव्या लागू नये म्हणून खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
1.  कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांना अर्ज/कागदपत्र घेण्यास/देण्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
2.  ज्येष्ठ नागरिकांना अर्ज/कागदपत्रे भरणे शक्य नसल्यास अधिकारी/कर्मचारी यांनी सर्वतोपरी सहकार्य करावे.
3.  त्यांना कामासाठी निष्कारण ताटकळत बसावे लागणार नाही तसेच त्यांना वारंवार फे­या माराव्या लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
4.  ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रकरणी नियमातील अटी व शर्तींच्या अधीन राहून शिघ्र कार्यवाही होण्यासाठी विभागांनी प्राधान्य देण्यात यावे.
२.   सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०१४१२०४१७३३३४७१०७ असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
     महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
                                      डॉ. पी. एस. मीना
                                  अपर मुख्य सचिव (प्र.सु.र.का.)

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणा­-या व लोककला प्रकारात सहभागी होणा­या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण


शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणा­-या व लोककला प्रकारात सहभागी होणा­या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती


महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/एसडी-२
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई- ४०० ०३२
दिनांक :- ०७ जानेवारी, २०१७


संदर्भ  :-
१.   शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.एचएससी-१०९७/(१४४४/९७)/ उमाशि-१
दिनांक : २६ जून, १९९७
२.   शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.एचएससी-१७०७/(२२२/०७)/ उमाशि-१
दिनांक : २५ मार्च,२०१०
३.   शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.एचएससी-१७०७/(२२२/०७)/ उमाशि-१ दिनांक : ०९जून, २०१०
४.   शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.एचएससी-२०१२/(१५४/१२)/ उमाशि-२
दिनांक : २१ एप्रिल, २०१५
प्रस्तावना :-
     संदर्भाधीन शासन निर्णय क्र. २ अन्वये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश देताना कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणा­या विद्यार्थ्यांना अनुक्रमे २ व ३ टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत शासनाने धोरण निश्चित केले आहे. संदर्भाधीन शासन निर्णय क्र. ४ नुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रामाणत्र (इ.१२वी) परीक्षेत प्रविष्ट होणा­या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव १५ ते २५ गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दतीबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
     क्रीडा क्षेत्रासोबतच शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणा­या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचा उपयोग त्यांच्या भविष्याच्या प्रगतीपटासाठी होणे आवश्यक आहे. तसेच, लोककला हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. लोककलेची वाढ व संवर्धन करण्याचे काम अनेक शालेय विद्यार्थी शालेय जीवनात करीत असतात. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेमध्ये क्रीडा गुणांच्या धर्तीवर सवलतीचे वाढीव गुण देण्याची कार्यपध्दती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-
     शैक्षणिक वर्ष सन २०१७-१८ पासून शास्त्रीय कला, चित्रकला या क्षेत्रात प्राविण्य मिळविणा­या व लोककला प्रकारात सहभागी होणा­या विद्यार्थ्यांना मार्च, २०१८ पासून होणा­या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेमध्ये पुढीलप्रमाणे वाढीव गुणांची सवलत देण्यात येईल.
१)   शास्त्रीय कला :-
१.१  शास्त्रीय नृत्य , गायन व वादन यामध्ये ज्या विद्यार्थ्याने कमीतकमी ५ वर्षांचे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेतून घेतले आहे, तसेच त्याने मान्यताप्राप्त संस्थांची ३ परीक्षा उत्तीर्ण केली असल्या १० गुण व ५ परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास १५ गुण देण्यात यावेत.
१.२  जे विद्यार्थी शास्त्रीय नृत्य, गायन व वादन या प्रकारात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पारितोषिक/ शिष्यवृत्ती प्राप्त करतील अशा विद्यार्थ्यांस वाढीव २५ गुण देण्यात यावेत. तथापि, अशा पात्र विद्यार्थ्यांस उपरोक्त १.१ मध्ये नमूद केल्या प्रमाणे १० अथवा १५ गुण अनुज्ञेय राहणार नाही.
१.३  कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल अशा संस्थांनी पुढील निकष पूर्ण केलेले असावेत.
     अ.   संस्था किमान १० वर्षापासून अस्तित्वात असावी.
     ब.   सदर संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे झालेली असावी.
     क.   संस्थेकडे मागील ३ वर्षांचा लेख अहवाल असावा.
          सदरप्रमाणे निकष पूर्ण करणा­या संस्थांना सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मान्यता देण्यात यावी. सांस्कृतिक कार्य विभाग याबाबतची जाहिरात प्रसिध्द करून संस्था नोंदणी करणासाठी विहित कालावधीत संस्थाना नोंदणी करणे आवश्यक राहील.
१.४  विद्यार्थ्याने सांस्कृतिक कार्य विभागाची मान्यताप्राप्त संस्थानी आयोजित केलेल्या ३ किंवा ५ परीक्षा शालेय जीवनात म्हणजे इ.१०वी पर्यंत केव्हाही उत्तीर्ण केलेली असावी.
१.५ ज्या संस्थांची नोंदणी सांस्कृतिक कार्य विभागाकडे असेल, त्या संस्थेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्याने प्राप्त केलेले असल्यास विद्यार्थी ज्या शाळेत इ. १० वी शिकत आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ते तपासून प्रमाणित करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्याने उत्तीर्ण केलेल्या परीक्षांप्रमाणे त्याला अतिरिक्त गुण देण्याची (३ परीक्षासाठी १० गुण ,  ५ परीक्षासाठी १५ गुण व राष्ट्रीय /राज्यस्तरीय पारितोषिक /शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यास २५ गुण) व त्याप्रमाणे राज्य मंडळास कळविण्याची जाबाबदारी संबंधित शाळा मुख्याध्यापकांची राहील.
१.६  कला क्षेत्रातील कोणत्या प्रकारासाठी(शास्त्रीय गायन/ नृत्य/ वादन) अतिरिक्त गुण दिले आहेत ते राज्यमंडळाने संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये नमूद करण्यात यावे.
२)   लोककला :-
२.१  शासनाने लोककलांना अनुदान देण्याच्या योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करण्याचे निकष सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय दि ०१.०१.२००८ अन्वये जाहीर केले आहेत. प्रयोगात्मक लोककला प्रकारात किमान ५० प्रयोग सादर करणा­या संस्थांना / मंडळांना सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी मान्यता देण्यात यावी.
२.२  सांस्कृतिक कार्य विभाग याबाबतची जाहिरात प्रसिध्द करून संस्था नोंदणी करण्यासाठी विहित कालावधी निश्चित करेल. सदर कालावधीत संस्थांना नोदणी करणे आवश्यक राहील.
२.३  सांस्कृतिक कार्य विभागाकडील नोंदणीकृत संस्था / मंडळाचे प्रमाणपत्र कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. वाढीव गुण अनुज्ञेय असणा­या प्रयोगात्मक लोककला प्रकारांची निश्चिती सांस्कृतिक कार्य विभागाने करावी.
२.४ इ. ८ वी, ९वी, व इ. १० वी या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याने प्रयोगात्मक लोककला प्रकारातील किमान ५० प्रयोग सादर केले असल्यास सदर विद्यार्थ्यास १० अतिरिक्त गुण, तसेच किमान २५ प्रयोग सादर केले असल्यास सदर विद्यार्थ्यास ०५ अतिरिक्त गुण देण्यात येतील. लोककला सादरीकरणातील निर्मितीच्या कोणत्याही घटकामध्ये सहभागी असणा­या विद्यार्थ्यास सदरप्रमाणे अतिरिक्त गुण देण्यात येतील.
२.५ इ. ८ वी ,९वी, व इ. १० वी या शैक्षणिक वर्षात राज्य शासनातर्फे घेण्यात येणा­या बालनाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणा­या विद्यार्थ्यास अनुक्रमे १५,१० व ०५ अतिरिक्त गुण देण्यात येतील.
२.६  राज्य शसनातर्फे घेण्यात येणा­या बालनाट्य स्पर्धेत विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणा­या विद्यार्थ्यास ०५ अतिरिक्त गुण देण्यात येतील. तथापि, सदर विद्यार्थ्याने राज्य स्तरावर प्राविण्य मिळविल्यास त्यास प्राविण्यनिहाय निश्चित केल्याप्रमाणे (प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावणा­या विद्यार्थ्यास अनुक्रमे १०,०५, व ०५) गुण देण्यात येतील. अशा विद्यार्थ्यांना विभागस्तराच्या प्राविण्यासाठी लागू असणारे गुण अनुज्ञेय होणार नाहीत.
२.७  इयत्ता १ ली पासून शालेय स्तरावर कोणत्याही वर्षी राष्ट्रीय स्तरावरील अभिनय पुरस्कार प्राप्त होणा­या बाल कलाकारास १० अतिरिक्त गुण, तसेच राज्यस्तरावर प्रस्तुत पुरस्कार प्राप्त होणा­या बालकलाकारास १० अतिरिक्त गुण, तसेच राज्यस्तरावर प्रस्तुत पुरस्कार प्राप्त होणा­या बालकलाकारास ०५ अतिरिक्त गुण देण्यात येतील.
२.८  भविष्यात लोककला क्षेत्रात काम करणारे अभ्यासक, संस्था व मंडळ यांनी प्रयोगात्मक लोककला संदर्भातील अभ्यासक्रम तयार करावा. सदर अभ्यासक्रम तपासून व प्रमाणीकरण करण्याबाबतची यंत्रणा सांस्कृतिक कार्य विभागाने निश्चित करावी. याकरिता स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन करण्यात यावी. सदर अभ्यासक्रमाच्या चार परीक्षा उत्तीर्ण होणा­या विद्यार्थ्यांस २० अतिरिक्त गुण व तीन परीक्षा उत्तीर्ण होणा­या विद्यार्थ्यास १५ अतिरिक्त गुण देण्यात येतील.
२.९ उपरोक्त सर्व बाबी तपासून विद्यार्थ्यांना लोककला प्रकारामध्ये अतिरिक्त गुण देण्याची तसेच राज्य मंडळास कळविण्याची जबाबदारी संबंधित शाळा मुख्याध्यापकांची राहील.
३)   चित्रकला :-
३.१  इंटरमिजीट ड्रर्ॉइंग ग्रेड परीक्षेतील ग्रेड ए प्राप्त विद्यार्थ्यांना १५ गुण, ग्रेड बी प्राप्त विद्यार्थ्यांना १० गुण व ग्रेड सी प्राप्त विद्यार्थ्यांना ५ गुण देण्यात येतील.
३.२  कला क्षेत्रासाठी असणा­या २ टक्के आरक्षणामध्ये शास्त्रीय गायन/ नृत्य/ वादन या कला प्रकारात प्राविण्य मिळविणा­या विद्यार्थ्यासोबत चित्रकलेची इंटरमिजीट ड्रर्ॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा देखील समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत आहे.
     एखाद्या विद्यार्थी एकापेक्षा जास्त संस्थामध्ये कला विषयक व क्रीडा विषयक शिक्षण घेत असल्यास व एकापेक्षा जास्त कला अथवा क्रीडा विषयांमध्ये प्राविण्य प्राप्त करीत असला तरी त्यास सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याची कमाल मर्यादा २५ गुण असेल.

२.   सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०१७०१०७१६३८१३८४२१ असा आहे. हे आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
     महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

                                        (डॉ. सुवर्णा सि. खरात)
                                      उपसचिव, महाराष्ट्र शासन

Saturday, 4 May 2019

काँटा


काँटा
स्वयंपाकघरातले दुसरे उपकरण म्हणजे काटा, हाताने खाण्याचे पदार्थाचे तुकडे करण्यापेक्षा काट्याने तुकडे करुन खाणे सोईचे. हेच उपकरण सोईप्रमाणे सरळ वाटणारी गोष्ट जेव्हा अशक्य वाटते तेंव्हा काट्यानेच काटा काढता येतो व्यवहारात वापरले गेले आहे.
काटेसे टक्कर ना ले, मिले ना फुल तो काटाँसे दोस्ती कर लो, शायर नाही हा काटा टोचत असतो हे माहित असूनही काट्यावर शायरी करुन व्यवहाराचे गणित जमवावे ही गोष्ट शायरीमधून सांगितली गेली आहे
गुलाबाचा काटा असो, सुंदर नाजूक, आकर्षक अशा कागदी फुलझाडांना असणारे काटे असो, काट्यांना स्पर्श न करता नजरेच्या काटयानेही आपला कार्यभाग साधता येतो.
मधासाठी मधमाशांना लांब ठेवावे लागते नाहीतर मधमाशांचा काटेरी डंख जिवघेणा ठरतो. बाभळीचा काटा असो, बोरीचा काटा असो, आयुर्वेदालाही काट्याला दुर ठेऊन साध्य गाठावे लागते.
शेवटी काय जगण्यासाठी व्यवहार ज्ञान आवश्यक आहे, चमचा बना नाहीतर काटाँ बना पण जगा. तुम्ही जगला नाही तर दुनियेला काही फरक पडत नाही. तुम्ही कसे जगावयाचे हा तुमचा प्रश्न व उत्तर ही तुम्हालाच शोधायचे आहे. काटयावरुन चाललो मी असे कोणी म्हणत असले तरी  तसा आदर्श घेणेही एक धाडसच आहे व या धाडसाला शतश नमन करणारे ही शतभाक भरपूर असतात.


Featured post

Lakshvedhi