Monday, 6 May 2019

शासकीय व निमशासकीय कार्यालयातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रकरणी शिघ्र कार्यवाही होण्यासाठी विशेष प्राधान्य देण्याबाबत...


शासकीय व निमशासकीय कार्यालयातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रकरणी शिघ्र कार्यवाही होण्यासाठी विशेष प्राधान्य देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१४/प्र.क्र.७७/१८(र.व.का.)
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२.
तारीख : ४ डिसेंबर, २०१४

शासन परिपत्रक-
     राज्यातील निरनिराळ्या शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने येत असतात. त्यात ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात त्यांच्या कामासाठी निष्कारण ताटकळत बसावे लागू नये तसेच त्यांना वारंवार फे­या माराव्या लागू नये म्हणून खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
1.  कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांना अर्ज/कागदपत्र घेण्यास/देण्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
2.  ज्येष्ठ नागरिकांना अर्ज/कागदपत्रे भरणे शक्य नसल्यास अधिकारी/कर्मचारी यांनी सर्वतोपरी सहकार्य करावे.
3.  त्यांना कामासाठी निष्कारण ताटकळत बसावे लागणार नाही तसेच त्यांना वारंवार फे­या माराव्या लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
4.  ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रकरणी नियमातील अटी व शर्तींच्या अधीन राहून शिघ्र कार्यवाही होण्यासाठी विभागांनी प्राधान्य देण्यात यावे.
२.   सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०१४१२०४१७३३३४७१०७ असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
     महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
                                      डॉ. पी. एस. मीना
                                  अपर मुख्य सचिव (प्र.सु.र.का.)

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi