काँटा
स्वयंपाकघरातले
दुसरे उपकरण म्हणजे काटा, हाताने खाण्याचे पदार्थाचे तुकडे करण्यापेक्षा काट्याने तुकडे
करुन खाणे सोईचे. हेच उपकरण सोईप्रमाणे सरळ वाटणारी गोष्ट जेव्हा अशक्य वाटते तेंव्हा
काट्यानेच काटा काढता येतो व्यवहारात वापरले गेले आहे.
काटेसे टक्कर ना
ले, मिले ना फुल तो काटाँसे दोस्ती कर लो, शायर नाही हा काटा टोचत असतो हे माहित असूनही
काट्यावर शायरी करुन व्यवहाराचे गणित जमवावे ही गोष्ट शायरीमधून सांगितली गेली आहे
गुलाबाचा काटा असो, सुंदर नाजूक, आकर्षक अशा कागदी
फुलझाडांना असणारे काटे असो, काट्यांना स्पर्श न करता नजरेच्या काटयानेही आपला कार्यभाग
साधता येतो.
मधासाठी मधमाशांना
लांब ठेवावे लागते नाहीतर मधमाशांचा काटेरी डंख जिवघेणा ठरतो. बाभळीचा काटा असो, बोरीचा
काटा असो, आयुर्वेदालाही काट्याला दुर ठेऊन साध्य गाठावे लागते.
शेवटी काय जगण्यासाठी
व्यवहार ज्ञान आवश्यक आहे, चमचा बना नाहीतर काटाँ बना पण जगा. तुम्ही जगला नाही तर
दुनियेला काही फरक पडत नाही. तुम्ही कसे जगावयाचे हा तुमचा प्रश्न व उत्तर ही तुम्हालाच
शोधायचे आहे. काटयावरुन चाललो मी असे कोणी म्हणत असले तरी तसा आदर्श घेणेही एक धाडसच आहे व या धाडसाला शतश
नमन करणारे ही शतभाक भरपूर असतात.
No comments:
Post a Comment