Saturday, 2 August 2025

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन,

 हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

 

·         प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

 

·         छत्रपती शिवाजी महाराज महावारसा या नवीन पुरस्काराची घोषणा

 

मुंबईदि. २  : साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपटकलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल सुरू करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोमएसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे. 

राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच२०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शकअभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर २०२४ चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे. याशिवाय६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची परंपरा पुढे नेणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी वाटचालीनिमित्त खास स्मरणिकाही यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे.

गेली ६० वर्षांहून अधिक काळ सातत्याने मराठी चित्रपटकर्मींचा सन्मान करणारा हा पुरस्कार सोहळा एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. केवळ मनोरंजन क्षेत्रासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातही हा हीरक महोत्सवी क्षणसोहळा अनोखा ठरणार असल्याचे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे - पाटील यांनी सांगितले. 

 या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका  रवींद्र नाट्य मंदिरशिवाजी मंदिरसाहित्य संघदीनानाथ नाट्यगृहप्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे विनामूल्य उपलब्ध असतील. 

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi