Saturday, 2 August 2025

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार

 खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार

                                                             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार

·         दिव्याचे देदीप्यमान यश देशातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल

·         राज्य शासनातर्फे तीन कोटी रुपयांचे बक्षीस

 

नागपूरदि. 2 : महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्राला कायम प्राधान्य दिले आहे. खेळाडूंना मोठी ध्येय खुणावत असून यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षणसकस आहारपरदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असल्यास या गोष्टी  आवश्यक आहे.  खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्यात येत असून दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धेत मिळविलेले देदीप्यमान यश हे  देशातील हजारो मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा नागरी सत्कार कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करीत तीन कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही ११ लाख रुपयांचे बक्षिस प्रदान करण्यात आले. तसेच खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi