Sunday, 3 August 2025

विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करत ध्येय गाठावे

 विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करत ध्येय गाठावे


                                                 -सरन्यायाधीश भूषण गवई


 


स्वत:चा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेवून जाण्याचे महान विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांनी दिले असून या विचारांचा अंगिकार करत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व विकासासाठी दादासाहेब गायकवाड,दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे,सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून या महाविद्यालयाच्या वाटचालीच्या विविध आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांचा अंगिकार व त्यातून मार्गक्रमण करणे हीच डॉ. आंबेडकर महाविद्यालयासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना आदरांजली ठरेल असेही त्यांनी सांगितले. १९८१ मध्ये धम्मपरिवर्तनाच्या रौप्य महोत्सवी वर्षी मुंबईहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी नागपुरात आल्या तेव्हा येथील जनतेने उत्स्फुर्तपणे त्याचे स्वागत केले ही या शहराची सर्वधर्म समभावाची ओळख असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. रौप्य महोत्सवी धम्म परिवर्तन सोहळयासाठी कवी सुरेश भट यांनी रचलेल्या भिम वंदनेचे वाचन करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीपा पाणेकर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले तर प्राध्यापक डॉ. विद्या चोरपगार सूत्रसंचलन केले.


00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi