Friday, 9 May 2025

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली

 भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली

मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

मुंबईदि. ८ - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्लीतील निर्वाचन सदन येथे भेट घेतली. ही भेट निवडणूक आयोगाकडून विविध राष्ट्रीय व राज्य पातळीवरील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी सुरू असलेल्या संवादाचा एक भाग आहे.

या संवादांमुळे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाध्यक्षांना थेट आयोगासोबत आपले सूचनात्मक मुद्दे मांडता येतातही एक दीर्घकाळची गरज होती.

यापूर्वी आयोगाकडून एकूण ४,७१९ सर्वपक्षीय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेतज्यामध्ये ४० मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), ८०० जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ), आणि ३८७९ मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओयांच्याद्वारे झालेल्या बैठकांचा समावेश असून त्यामध्ये २८ हजारांहून अधिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi