बालविवाह रोखण्यासाठी बालिका पंचायत सुरू करा
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. 13 : स्थलांतरित मजूर आणि कामगार यांच्या समुहात बालविवाह होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनात आले आहे. मजूर आणि कामगारांच्या बालकांना त्याच ठिकाणी राहता यावे यासाठी क्षेत्रातील बालगृहांबाबत माहिती व जनजागृतीसंदर्भात मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. जनजागृतीसाठी बालिका पंचायत सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
बालविवाह रोखण्याच्या उपाययोजनासंदर्भात, बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणेसंदर्भात, दि चिल्ड्रेन एड सोसायटी संदर्भात, विधवा महिलांच्या कृती दलासंदर्भात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मदत कक्ष कामाचा आढावा मंत्रालयात बैठकीत घेण्यात आला. आयुक्त नयना मुंडे, उपायुक्त राहूल मोरे, उपसचिव श्री. भोंडवे, उपसचिव श्री. कुलकर्णी आदिसह अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment