Sunday, 2 February 2025

आनंदे वंदावा गणनायक* *तो मंगलदायकबुध्दीदात्याला वंदन करणारी* *श्रीगणेश जयंतीच्या आनंदाची* *🔆ॐ गं गणपतये नमः🔆*

 ⚜🌹⚜🚩🕉🚩⚜🌹⚜


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻


      *बुध्दीदात्याला वंदन करणारी*

    *श्रीगणेश जयंतीच्या आनंदाची*


      *🔆ॐ गं गणपतये नमः🔆*


⚜🌺🔆🌸🙏🌸🔆🌺⚜


    *ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः।*

    *भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः।*

    *स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागँसस्तनूभिः।*

    *व्यशेम देवहितं यदायूः।*

    *...... अथर्वशीर्ष*


        *जीवन आनंदी तेव्हाच होते जेव्हा दशदिशांनी सतत केवळ सकारात्मक आनंद वार्ताच ऐकू येतात. हे गणराया, या कानांना सतत आनंदी.. कल्याणकारी अशीच वचने ऐकू येवोत. या आमच्या डोळ्यांना सदैव शुभ अशीच दृश्य दिसोत.*

        *जगात सर्व क्षेत्रात.. शास्त्रात सतत भ्रमीत करणारे वातावरण असते. अगदी विज्ञानातही. ज्ञानींमध्येही एकमत.. एकवाक्यता नसते. प्रत्येकच जण आपल्या मतीने सोईस्कर अर्थ लावतो. त्यासाठी  दुराग्रही असतो. भ्रमीत समाज जीवनात अशावेळी तूच आमचा रक्षणकर्ता आहेस. तू सर्वांना सद्बुद्धी दे.. जगातील वातावरण निर्मळ राहू दे.*

        *हे गणराया, तुम्ही पुज्यनीय आहात. जीवनात मांगल्य निर्माण करणारे आहात. हे आयुष्य उत्तम प्रकृतीने भोगून आमच्याकडून तुमची स्तुती होत राहो.*  

        *आज माघ विनायक चतुर्थी. तिलकुंद चतुर्थी. आज बप्पाला तिळगुळाच्या मोदक.. लाडूचा नैवेद्य अर्पण केला जाणार. विश्व देवता गणेशाची जयंती. श्रीगणेशाची महतीच अशी की या विश्व देवतेचे अनेक देशात त्याचे पूजन होते. श्री गणरायाची विशालकाय मूर्ती ही भारतात नाही तर थायलंडमध्ये असून ती चक्क ३९ मिटर उंचीची आहे. इंडोनेशीयाच्या चलनावरही गणेशाला स्थान दिले होते.*      

        *आज गणेश जयंतीला भक्त मन आनंदलेय. मंदिरे ही रंगीबेरंगी हारफुलांच्या माळांनी.. रोषणाईने सजलीत. आज भक्त श्री गणेशाच्या आराधनेत दंग होणार. मंदिरासमोर गोमयाचा सडासमार्जन होत मोठमोठया रंगीबेरंगी रांगोळीचे रेखाटन होणार. श्री मूर्तीला जास्वंद.. लालफुले.. दुर्वा अर्पण होणार. भक्तीभावाने कुठे गणेश याग, कुठे होमहवन. श्री गणेशाच्या स्तुती स्त्तोत्र पठन.. श्रीसुक्त, अथर्वशीर्ष पठनाचे सहस्त्रावर्तन, महाआरती होणार.* 

        *मनुष्याला आपला पुर्वजन्म आठवत नाही. पण देवतांच्या अवतारांचे स्मरण सदैव राहते. कारण त्यांनी भक्तांवरील विघ्ने दूर करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेतला. मनुष्यातील दोष निवारण करुन.. सुबुद्धी देत कल्याण केलेय. आजही करताहेत.*

        *राक्षसांचा.. मनामनील राक्षसी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी श्री गणेशाने जे ३२ अवतार घेतलेत. श्री गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला. यामुळे या चतुर्थीला विनायकी चतुर्थी पण म्हणतात.. जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी पण म्हणतात.*

        *श्री गणेश अवतार कथाभागात राक्षसांची असलेली नावे वेगवेगळी आहेत. त्या राक्षसात दडलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार तसेच अज्ञानाचा नाश करणारे.. त्यांना सद्बुद्धी देत उद्धार करणारे हे श्री गणरायाचे सर्व अवतार आहेत. जे आजही मनुष्यातील दोषांचा नाश करतात.*

        *सर्वच मंगलकार्यात प्रथम पूजनाचा मान असलेल्या श्री गणेशाला निर्मळ अंतःकरणाने शरण जात जीवनात विकास, सुखसमृद्धी, शांती, समाधान, आनंद, सुबुद्धीचे वरदान मागण्यासाठी साद घालू या. आपणांस श्रीगणेश जयंतीच्या शुभेच्छा !!.* 


🌺🥀🌸🔆🛕🔆🌸🥀🌺


  *ॐ आनंदे वंदावा गणनायक*

  *तो मंगलदायक*


  *रुंड मथन करि जननि जनक*

  *निज रुंड मालधर*

  *अमल कुंड तो तृतिय नयन*

  *परि तनय विनय*

  *विभु वक्रतुंड निज धुंडिराज*

  *करि शुंड सरळ मुनि*

  *धुंडिति जनि वनि झुंड*

  *निकाबहु विकट तुंड गण*

  *पुंडरीक मणि हार प्रलंबित*


  *कुंडलीश कटिबंध तनुद्भव पुंड*

  *दमन मणि कुंडल*

  *श्रुति युगि गंडस्थळि अळि*

  *चंद्रखंडधर गुणगण*

  *कीर्ति अखंडित खंड दुरित*

  *चय पंडित गामिनि*

  *तांडव करि जो पद्म भवांडी*

  *मंडलाकृति चंड पराक्रम*


  *विदण्ड खंडन विपक्ष दंडन*

  *स्वभक्त मंडन सुरवर मुनिवर*

  *सकल चराचर पावनकरि निज*

  *प्रसाद देवुनि पुरवि मनोरथ*

  *विघ्नविनाशक तो..* 


  *परम कृपालय भालविलस दलि*

  *मालदान रसपान करिति कलि*

  *काल कापती परनिर्दाळण*

  *करित समरि जो*


  *पालन करि सुर चालक त्रिभुवनि* 

  *शंभुबाल भवजाल तेच जंजाळ*

  *कटन कर सप्तस्वर*

  *मुखी भेद आलापित*


  *स्वर वर्तुनिया वेष्टन संगित*

  *तननम् तननम् राग रागिणी*

  *ध्रुपद त्रिवट गति*

  *गद्य पद्य विभुरुद्य सद्य करि*


  *प्रबंध निबंध जगतल लगबग* 

  *विसरुनि तटस्थ मौन्य मुद्रा पुरवी*

  *सादर समुदायसवे आयकतो..*


  *आनंदे वंदावा गणनायक*

  *तो मंगलदायक*


🌹🥀🔆🌸🙏🌸🔆🥀🌹


  *रचना : संतकवी अमृतराय*  ✍️

  *संगीत आणि निरूपण :*

  *डॉ. अशोक दा. रानडे*

  

  🎼🎶🎼🎶🎼   🎧

 

        *!! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ !!*

        *!! निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा !!*


    ‼ *गणपती बाप्पा मोरया* ‼


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *०१.०२.२०२५*

           

🌻🌺🌿🔆🌺🔆🌿🌺🌻


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi