Friday, 27 December 2024

सांस्कृतिक, सामाजिक प्रबोधनाबरोबरच रोजगार निर्मितीमी

 सांस्कृतिक, सामाजिक प्रबोधनाबरोबरच रोजगार निर्मिती

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

सांस्कृतिक कार्य विभागाचा घेतला आढावा

मुंबईदि. 26 : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत असून विभागांच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमहाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटीलसह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकरउपसचिव महेश वाव्हळउपसचिव नंदा राऊतअवर सचिव बाळासाहेब सावंतअवर सचिव परसराम बहुरेसांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरेदर्शनिका विभागाचे संपादक डॉ.दिलीप बळसेकरपु.ल. महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकररंगभूमी प्रयोग परिनिरीक्षणचे सचिव संतोष खामकरराज्य साहित्य अकादमीचे सहसंचालक सचिन निंबाळकरपुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित कुमार उगले आदी उपस्थित होते.

या बैठकीत आगामी 100 दिवसात करावयाचे उपक्रमयोजनाप्रकल्पकार्यक्रम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यात एक खिडकी योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली महाराष्ट्रभर लागू करणेपु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा पुनर्विकास करून उद्घाटन सोहळा आयोजित करणेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष प्रकाशन सोहळा आयोजन करणेमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा अशा विविध विषयांसंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी आढावा घेतला.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi