*माझ्या निवृत्त मित्रांनो🥰*
आपण सारे आता वयाच्या एका सुंदर वळणावर पोहोचलो आहोत, आपण आता अधिकच आकर्षक दिसू लागलो आहोत. आपण लहान असताना आपल्यापाशी जे जे काही हवं असं आपल्याला वाटायचं ते ते सगळं काही आज आपल्यापाशी आहे
आपण आता शाळेत जात नाही किंवा कामालाही जात नाही आपल्याला आता दरमहा एक ठराविक रक्कम निवृत्ती भत्ता म्हणून मिळायला लागलेली आहे.
घरून बाहेर पडल्यानंतर आपल्याला एका ठराविक वेळेतच घरी परतायची अट आता असत नाही. आपल्यापैकी काही जणांपाशी अजूनही वाहन चालवण्याचा परवाना असेलच आणि त्यांच्यापाशी स्वतःची चार चाकी किंवा स्कूटर तरी असतेच.
म्हणजे आपलं आयुष्य आता सुंदर झालेलं आहे!
आता आपण विश्वास बसणार नाही इतके चुणचुणीत आलो आहोत. आता आपली बुद्धी काहीशी मंद झाल्या सारखी वाटते कारण आपल्या डोक्यात भरपूर माहिती साठवल्या गेली आहे.
आपल्या डोक्यात आजवरच्या बऱ्याच गोष्टी साठवल्या गेल्या असतात त्यामुळे आपल्या कानाच्या आतील बाजूस दबाव येत असतो. या दबावामुळे आता आपल्याला कधी कधी ऐकण्याचा त्रास होऊ लागतो. हे म्हणजे संगणकातल्या हार्ड डिस्क सारखं असतं. संगणकातली हार्ड डिस्कवर जेव्हा बऱ्याच फाइल्स त्यात जमा होतात तेव्हा तिचा वेग मंदावतो तसंच आहे हे.
आपली बुद्धी मंद झालेली नसते परंतु आपल्या मेंदूत प्रचंड माहिती संकलित झालेली असते. आपल्या वयाच्या काही लोकांना असा अनुभव येतो की कधीकधी आपण आपल्या खोलीमध्ये नुसत्याच येरझाऱ्या मारत राहतो आणि आपण काहीतरी शोधत असतो परंतु ते कुठे ठेवलेलं आहे ते आपल्याला आठवत नाही.
याचा स्मृति गमावण्याशी कुठलाही संबंध नाही!
आपण अधिक काळासाठी कार्यरत राहावं या हेतून निसर्गानंच ती व्यवस्था केलेली असते.
साठ वर्षावरील प्रत्येकासाठी:
कुठलं अन्न आहारात असावं:
१. फळे आणि हिरव्या भाज्या.
२. समुद्री खाद्य. विशेषत्वाने मासे,
३. काजू
४. अंडी
५. बदाम
६. शुद्ध ऑलिव्ह तेल
७. चिकन
8. आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे स्वास्थ्यवर्धक अन्न.
पुढील तीन गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करायचा:
१. वय
२. भूतकाळ
३. संताप
चार महत्त्वपूर्ण गोष्टी:
१. परिवार
२. मित्र
३. सकारात्मक विचार
४. वर्तमानात जगणे
करायलाच हव्या अशा गोष्टी:
१. भरपूर हसा.
२. खेळा पण झेपेल इतकच.
३. मित्रांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. (फक्त लहान मुले किंवा नातवंडे यांच्या सोबतच नव्हे).
४. कुठलाही कार्यक्रम चुकवू नका.
सहा अत्यावश्यक गोष्टी:
१. खूप तहान लागेपर्यंत वाट पाहू नका. वरचेवर पाणी पीत रहावे.
२. पहाटे मुळीच धडपडत उठू नका, पुरेशी झोप घ्या.
३. थकवा येईपर्यंत काम करू नका.
४. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घेत चला. आजारी पडेपर्यंत थांबू नका.
५. देवावर विश्वास असू द्या. चमत्कार घडतात बरं.
६. नेहमी सकारात्मक रहा आणि आशावादी असा.
"आपल्या जवळच्या सर्व मित्रांना हा संदेश जरूर अग्रेषित करा. त्यांना वाईट वाटणार नाही परंतु त्यांना एवढं कळू द्या की ते सुद्धा किती खास आहेत ते"👌👌🙏🙏
No comments:
Post a Comment