Wednesday, 29 May 2024

मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण १३२ व्या सत्राचा प्रवेश कार्यक्रम जाहीर

  मत्स्यव्यवसायनौकानयन व सागरी डिझेल इंजिन

देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण

१३२ व्या सत्राचा प्रवेश कार्यक्रम जाहीर

 

            मुंबईदि. २८ : सन २०२४-२०२५ या चालू होणाऱ्या वर्षातील दिनांक ०१ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३२ व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवामुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

            मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा येथे देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्वेसागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्तीमासेमारीची आधुनिक साधनेप्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.

            या प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थींकडून प्रतिमहिना ४५० रुपये व दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थींकडून १०० रुपये शुल्क आकारले जात असून या प्रशिक्षणासाठीपात्र प्रशिक्षणार्थी निकष पुढीलप्रमाणे आहेत.

            प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहेप्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक / आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थींचा अर्ज विहित नमुन्यात परिपूर्ण असावा व त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यासअर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्रसंबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

            या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडुरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई- ६१ येथे दिनांक २० जून २०२४ पर्यंत सादर करावेत.

            अधिक माहिती करिता सचिन भालेराव, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारीवर्सोवामो. 9920291237 व जयहिंद सूर्यवंशीयांत्रिकी निर्देशक मो. 7507988552 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi