महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी
२७ फेब्रुवारी रोजी निवडणूक
मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या या जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२४ आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, या निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. दिनांक १५ फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून १६ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार. दिनांक २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार असल्याचे अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment